अब्राहम लिंकन

Wikiquote कडून
अब्राहम लिंकन

अब्राहम लिंकन (फेब्रुवारी १२, १८०९ - एप्रिल १५, १८६५) हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होते. (कार्यकाळ: १८६१ ते १८६५)

  • As I would not be a slave, so I would not be a master. This expresses my idea of democracy.
    • जसे मला गुलाम व्हायला आवडणार नाही तसेच मला मालक व्हायला आवडणार नाही. लोकशाहीची माझी कल्पना यावरून स्पष्ट होते.
  • Avoid popularity if you would have peace.
    • शांतता हवी असेल तर प्रसिद्धी टाळा.
  • Common looking people are the best in the world: that is the reason the Lord makes som many of them.
    • दिसायला सर्वसामान्य असणारे लोक जगात सर्वोत्तम असतात म्हणूनच परमेश्वर त्यांना इतक्या मोठ्या संख्येत निर्माण करतो.
  • Everybody likes a compliment.
    • प्रशंसेचा एक शब्दही सगळ्यांना हवासा वाटतो.
  • Knavery and flattery are blood relations.
    • लबाडी आणि खुशामत यांचे जवळचे नाते आहे.
  • The ballot is stronger than the bullet.
    • बंदुकीच्या गोळीपेक्षा मतपत्रिका श्रेष्ठ असते.
  • When you have got an elephant by the hind legs and he is trying to run away, it's best to let him run.
    • तुम्ही एखाद्या हत्तीचे मागचे पाय धरले असतील आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला पळून जाऊ देणेच योग्य.


  1. आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय.
  2. स्त्री एक अशी गोष्ट आहे. ज्याला मी घाबरतो हे माहीती असून की ती मला काही इजा करणार नाही.
  3. लोकशाही म्हणजे लोकांची, लोकांसाठी, लोकांनीच बनवलेली सरकार होय.
  4. जर कुत्र्याच्या शेपटीला पाय म्हंटले तर कुत्र्याला पाय किती? उत्तर असेल चार. कारण शेपटीला पाय म्हंटल्याने ते पाय होत नाही..
  5. मी आज जेही आहे किंवा होण्यासाठी आशावादी आहे. त्याच श्रेय फक्त आईलाच देईन
  6. नेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे.
  7. शत्रुना मित्र बनवुन, मी माझे शत्रु कमी किंवा नष्ट करत नाहीये का.
  8. जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.
  9. सामान्य दिसणारे लोकच जगात सर्वात चांगले लोक असतात. म्हणूनच देव अश्या लोकांनाच जास्ती निर्माण करतो.
  10. जर कोणी मला झाड तोडायला 6 तास दिले तर त्यातले 4 तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेन.
  11. जर तुम्ही एकदा जनतेचा विश्वास तोेडला तर तुम्हाला परत कधी जनतेचा आदर आणि सम्मान मिळणार नाही.
  12. प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.
  13. जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात रहाण्याचा अधिकार नाही.
  14. मी जिंकण्यासाठी बांधील नाही. पण मी चांगलं आणि वाईट होण्यासाठी बांधील आहे.
  15. अमेरिका कधीही बाहेरून नष्ट होणार नाही. आपण जर अडखळलो आणि आपली स्वातंत्र्य गमावून बसलो, तर असं यामुळे होईल कारण आपण स्वतःचा नाश केला.
  16. जेव्हा मी चांगले करतो, तेव्हा मला चांगले वाटते. जेव्हा मी वाईट करतो, तेव्हा मला वाईट वाटते. तो माझा धर्म आहे.
  17. जर व्यक्ती एखादं काम चांगलं करत असेल तर मी सांगेन ते काम त्याला करू द्या. त्या व्यक्तीला एक संधी द्या.
  18. एक तरुण व्यक्तीला जीवनात पुढे जायचे असेल तर प्रत्येक बाजूने त्याला स्वतःचा विकास करवा लागेल. आपल्याला कुणी मागे खेचेल का? हा विचार त्याच्या मनामध्ये येता कामा नये.
  19. तुम्ही तक्रार करू शकता की गुलाबाच्या झाडाला काटे असतात. पण तुम्ही आनंदी होऊ शकता की काट्याच्या झाडाला गुलाब लागतात.
  20. आपण आज सुटका घेऊन उद्याच्या जबाबदारीतून बाहेर पडू शकत नाही.
  21. जवळजवळ सर्वच माणसे प्रतिकूल परिस्थितीला सामोरी जाऊ शकतात, परंतु एखाद्या माणसाची चारीत्र्याची परीक्षा घ्यायची असेल तर त्याला शक्ती द्या.
  22. यशस्वी खोटे बोलणार होण्यासाठी कोणाकलाही पुरेशी चांगली स्मृतीं नाही.
  23. मी हळुवार चालणारा आहे पण मी मागे कधी चालत नाही.
विकिक्वोट
विकिक्वोट
अब्राहम लिंकन हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा