केदार जोशी
Wikiquote कडून
केदार जोशी
- The best thing about the world is that it has a mysterious structure and the worst thing is that it has a grievous structure.
- भाषांतर: या जगातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या जगात गूढपणा आहे, आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे या जगात दुःख़ आहे.
- The world exists to let Man philosophize.
- भाषांतर: हे विश्व मनुष्याला तत्त्वचिंतन करता यावं या उद्देशाने अस्तित्वात आहे.
- The world is a contradiction, the universe a paradox.
- भाषांतर: हे जग एक विसंगती आहे, व हे विश्व एक विरोधाभास आहे.
- Truth is orphan without matter, and matter is impotent without truth.
- भाषांतर: सत्य हे पदार्थाशिवाय पोरकं आहे, व पदार्थ हा सत्याशिवाय दुर्बल आहे.
- God would be the strangest thing to exist.
- भाषांतर: परमेश्वर ही या विश्वातील सर्वात वैचित्र्यपूर्ण वस्तू असेल.
- Religions, themselves, are (intellectual) blasphemies.
- भाषांतर: धर्म हे स्वतःच (बौद्धिक) पावित्र्यविडंबने आहेत.
- Philosophy, in principle, could be the best mathematics.
- भाषांतर: तत्त्वज्ञान हे तात्विक दृष्ट्या सर्वोच्च गणित आहे.
- Nature, by its very nature, is very brutal and unequal. However, Man has somehow managed to transform the nature of its brutality and inequality.
- भाषांतर: निसर्ग हा त्याच्या नैसर्गिक प्रव्रुत्तिनुसार अत्यंत पाशवी आणि विषम आहे; आणि मानवाने या ना त्या मार्गाने निसर्गाच्या पाशवीपणा व विषमतेच्या केवळ स्वरुपात बदल करण्यात यश मिळवले आहे.
- Ask a true scientist a very profound question on his science, and he will be silent. Ask a true religious person a very simple question on his religion, and he will be frenzied.
- भाषांतर: एखाद्या सच्च्या वैज्ञानिकाला जर त्याच्या विज्ञानाविषयी एखादा अत्यंत गहन प्रश्न विचारला तर तो वैज्ञानिक निःशब्द होईल, आणि एखाद्या सच्च्या धार्मिक मनुष्याला जर त्याच्या धर्माविषयी एखादा अत्यंत साधा प्रश्न विचारला तर तो धार्मिक मनुष्य कृद्ध होईल.
- An atheist is as religious as a theist.
- भाषांतर: नास्तिक मनुष्य हा आस्तिक मनुष्याइतकाच धार्मिक असतो.
- I - a philosopher - live in the cage of flesh and blood.
- भाषांतर: मी - एक तत्त्ववेत्ता - या हाडामांसाच्या पिंज्र्यात राहतो.
- Solitude is unquenched ego.
- भाषांतर: एकांत म्हणजे अतृप्त अहं होय.
- Pain is a poison; pleasure an intoxicant.
- भाषांतर: दुःख हे विष आहे आणि सुख हे नशील्या पदार्थासमान आहे.
- Painful life is brutal and painless life is superficial.
- भाषांतर: दुःखमय जीवन हे पाशवी आहे आणि दुःखरहित जीवन हे उथळ आहे.
- In the midst of excitement, grief, joy, and solitude, I remind myself every moment that the sole mission of my life is to find "the ultimate questioner" - that unimaginable who has put me in this madness to answer an unanswerable question.
- भाषांतर: क्षोभ, दुःख, आनंद, व एकांत यांच्या मध्यात मी स्वतःला प्रत्येक क्षणी स्मरण करुन देत असतो की माझ्या आयुष्याचं एकमेव ध्येय हे त्या अंतिम प्रश्नकर्त्याचा शोध घेणं हे आहे; तो अकल्पनीय ज्याने मला या भाऊगर्दीत एक अशक्यप्राय असं कोडं सोडविण्यासाठी ठेवलं आहे.