पु.ल. देशपांडे
Appearance
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात पु. ल. देशपांडे, (नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ - जून १२, इ.स. २०००) हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, अभिनेते, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीतदिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके बहुरूपी व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात.
स्रोतांतून
[संपादन]- जगण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट मिळावी लागते; ती म्हणजे जगण्याचे प्रयोजन.
- "गणगोत" (इ.स. १९६६)
- इतिहास हा आम्ही कागदपत्रांइतक्याच वयाने आणि त्याहूनही मनाने जीर्ण लोकांच्यावर सोपवलेला विषय समजतो. रुमालात बांधून ठेवायचा, वर्गातही विद्यार्थ्यांच्या अंगी तो न लागता घोकंपट्टीत घुसवायचा.
- "गणगोत" (इ.स. १९६६)
- पेढा करण्याचे कसब असण्यापेक्षा हलवायाची मैतरकी अधिक गोडीची.
- "गणगोत" (इ.स. १९६६)
- मोठ्या लोकांच्या लहानपणीच्या आवडी ह्या मोठेपण लाभल्यानंतरच सोयिस्कर रीतीने रचल्या जातात.
- "गणगोत" (इ.स. १९६६)
- शेवटी काय हो, आपण पत्त्याच्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच.
- जगात काय बोलत आहात ह्यापेक्षा कोण बोलत आहात ह्याला जास्त महत्त्व आहे.
- "असा मी असामी" (इ.स. १९६४)
- प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे.
- "व्यक्ती आणि वल्ली" (इ.स. १९६६) या पुस्तकातील सखाराम गटणे या व्यक्तिचित्रणातल्या 'सखाराम गटणे' या काल्पनिक व्यक्तीच्या तोंडचे अवतरण.
- लग्नापुर्वी शी न लूक्ड सो ... लुकडी!
- "मी आणि माझा शत्रुपक्ष" (इ.स. १९६८)
- मी लंडन मध्ये हमाली करून वजनी पाउंड घटवून चलनी पाउंड कमवावेत, असही सुचवण्यात आलं.
- "अपूर्वाई" (इ.स. १९६०)