म्हणी

Wikiquote कडून

[संपादन] स्वर

 -  -  -  -  -  -  -  -  -  - अं -  अः

[संपादन] मिश्र

 - ॠ - लृ - लॄ

[संपादन] व्यंजन

क वर्ग -     
च वर्ग -
ट वर्ग -
त वर्ग -
प वर्ग -
य वर्ग - क्ष ज्ञ




[संपादन] स्वर अ

  • अंगापेक्षा बोंगा जास्ती.
  • अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
  • अंथरूण पाहून पाय पसरावेत.
  • अंधेर नगरी चौपट राजा.
  • अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
  • अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
  • अडला हरी गाढवाचे पाय धरी.
  • अडली गाय खाते काय.
  • अती झालं अन् हसू आलं.
  • अती तेथे माती.
  • अती परिचयात अवज्ञा.
  • अती शहाणा त्याचा बैल रिकामा.
  • अत्युच्च पदी थोरही बिघडतो.
  • अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
  • अळवाची खाज़ अळवाला ठाऊक.
  • असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
  • असतील चाळ तर फीटतील काळ.
  • असतील शिते तर जमतील भुते.
  • असून अडचण नसून खोळंबा.
  • असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
  • असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.
  • अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य.

[संपादन] स्वर आ

  • आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी.
  • आडात नाही तर पोहर्‍यात कोठून येणार.
  • आधी पोटोबा मग विठोबा.
  • आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास.
  • आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
  • आपला तो बाळू दुसऱ्याचा तो कार्टा.
  • आपला हात जगन्नाथ.
  • आपलेच दात आणि आपलेच ओठ.
  • आयजीच्या जीवावर बायजी उदार.
  • आयत्या बिळात नागोबा.
  • आलीया भोगासी असावे सादर.
  • आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय.
  • आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन.
  • आधी लगीन कोंढाण्याचं.
  • आवडतीचा शेंबूड गोड आणि नावडतीचे मीठ अळणी.
  • आपलंच घर आणि हगून भर.
  • आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.
  • आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास.

[संपादन] स्वर इ

  • इकडे आड, तिकडे विहीर.

[संपादन] स्वर ई

[संपादन] स्वर उ

  • उचलली जीभ अन् लावली टाळ्याला.
  • उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग.
  • उथळ पाण्याला खळखळाट फार.
  • उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी.

[संपादन] स्वर ऊ

[संपादन] स्वर ए

  • एक घाव दोन तुकडे.
  • एक ना धड भाराभर चिंध्या.
  • एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत.
  • एकादशीच्या घरी शिवरात्र.
  • एका कानावर पगडी घरी बाईल उघडी.
  • एकटा जिव सदाशिव.
  • एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ

[संपादन] स्वर ऐ

  • ऐकावे जनाचे करावे मनाचे.
  • ऐट राजाची अऩ वागणूक कैंकाड्याची.
  • ऐन दिवाळीत दाढदुखी.

[संपादन] स्वर ओ

[संपादन] स्वर औ

[संपादन] स्वर अं

[संपादन] स्वर अः

[संपादन] मिश्र ऋ

  • ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये.
  • ऋषीपंचमीचा बैल.

[संपादन] मुळाक्षर क

  • कर नाही त्याला डर कशाला?
  • करावे तसे भरावे.
  • काखेत कळसा गावाला वळसा.
  • कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी.
  • कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ.
  • कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ.
  • कोल्ह्याला द्राक्षे आंबट.
  • कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही.
  • क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
  • कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
  • कशात काय अन फाटक्यात पाय.
  • केवड्याचे दान वाटले आणि गावात नगारे वाजले.
  • करून गेला गाव आणि कांदळकराचे नाव.
  • कुठे इंद्राचा ऐरावत,अन् कुठे शामभट्टाची तट्टाणी?
  • केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.
  • काम नाही घरी अन् सांडून भरी.
  • कण्हती कुथती, मलिद्याला उठती.
  • करायला गेलो एक अऩ झाले भलतेच.
  • काजव्याकडून सुर्याची समीक्षा.
  • काम ऩ धंदा, हरी गोविंदा.
  • काय करु अऩ कस करु?
  • कावळ्याचे दांत शोधण्यासारखे.
  • कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा.
  • केला जरी पोत बरेच खाली, ज्वाळा तरी ते वर उफाळी.
  • कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही.
  • कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं.
  • कोल्हा काकडीला राजी.

[संपादन] मुळाक्षर ख

  • खाई त्याला खवखवे.
  • खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी.
  • खाणा-याचे खपते, कोठाराचे पोट दुखते.
  • खायला काळ भुईला भार.
  • खायला कोंडा अन निजेला धोंडा.
  • खाली मुंडी, पाताळ धुंडी.

[संपादन] मुळाक्षर ग

  • गरज सरो,वैद्य मरो.
  • गरजवंताला अक्कल नसते.
  • बोलेल तो करेल काय अन् गर्जेल तो पडेल काय?
  • गवयाचं पोर सुरात रडतं.
  • गाढवाला गुळाची चव काय?
  • गाता गळा, शिंपता मळा.
  • गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.

[संपादन] मुळाक्षर घ

  • घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात.
  • घरोघरी मातीच्या चुली.
  • घरचं झालं थोडं अन् व्याह्यांनी धाडलं घोडं.
  • घर पाहावं बांधून.
  • घरात नाही दाणा तरी मला बाजीराव म्हणा.
  • घर पाहवं बांधून आणि लग्न पहावं करुन.

[संपादन] मूळाक्षर च

  • चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे.
  • चोर सोडून सन्यासाला फाशी.
  • चोराच्या उलट्या बोंबा.
  • चोराच्या मनात चांदणे.
  • चोराच्या हातची लंगोटी.

[संपादन] मुळाक्षर छ

  • छडी लागे छमछम विद्या येई घमघम.

[संपादन] मुळाक्षर ज

  • जात्यातले रडतात सुपातले हसतात.
  • जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
  • जे न देखे रवी ते देखे कवी.
  • ज्याचे करावे भले, तो म्हणतो आपलेच खरे.
  • ज्याचं जळतं त्यालाच कळतं.
  • जशास तसे.
  • जाईचा डोळा नि आसवांचा मेळा.
  • जाळाशिवाय नाही कढ अऩ माये शिवाय नाही रड.
  • जावई पाहुणा आला म्हणून रेडा दुध देईल काय?
  • जावई माझा भला आणि लेक बाईलबुध्या झाला.
  • जावयाचं पोर हरामखोर.
  • जिच्या घरी ताक तिचे वरती नाक.
  • जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उध्दारी.
  • जुने ते सोने.
  • जेथे पिकतं तिथे विकतं नाही.
  • जो गुण बाळा तो जन्म काळा.
  • जोवरी पैसा तोवरी बैसा.
  • ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी.
  • ज्याचा त्याला चोप नाही आणि शेजारला झोप नाही.
  • ज्याच्या हाती ससा तो पारधी.
  • ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं.

[संपादन] मुळाक्षर झ

  • झाकली मुठ सव्वा लाखाची.
  • झालं गेलं गंगेला मिळालं.
  • झोपून हागणार उठून बघणार

[संपादन] मुळाक्षर ट

  • टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.
  • टाळी एका हाताने वाजत नाही.

[संपादन] मुळाक्षर ठ

  • ठकास महाठक.

[संपादन] मुळाक्षर ड

[संपादन] मुळाक्षर ढ

  • ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, गुण नाही पण वाण लागला.
  • ढुंगणाला नाही लंगोटी आणि मला म्हणा दिपुटी.

[संपादन] मुळाक्षर ण

[संपादन] मुळाक्षर त

  • तळे राखील तो पाणी चाखील.
  • तुपात तळले, साखरेत घोळले तरी कारले कडू ते कडूच.
  • तेलही गेले, तुपही गेले, हाती आले धुपाटणे.
  • ताकाला जाऊन भांडे लपवू नये.
  • त वरून ताकभात.
  • तेरड्याचा रंग तिन दिवस.
  • तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्‍या झाल्या हरण्या.

[संपादन] मुळाक्षर थ

  • थेंबे थेंबे तळे साचे.
  • थांबला तो संपला.

[संपादन] मुळाक्षर द

  • दगडापेक्षा वीट मऊ.
  • दाम करी काम.
  • दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत.
  • दिव्याखाली अंधार.
  • देखल्या देवा दंडवत.
  • देव तारी, त्याला कोण मारी.
  • देवाची करणी आणि नारळात पाणी.
  • देश तसा वेष, राजा तशी प्रजा.
  • दैव देते आणि कर्म नेते.
  • दुधाने पोळलेला ताकही फुंकून पितो.
  • दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही.
  • दुभत्या गायीच्या लाथा गोड.
  • दूरून डोंगर साजरे.
  • दुष्काळात तेरावा महिना.
  • दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ.
  • दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.
  • दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसली कापूस वेचीत.
  • दिसतं तस नसतं म्हणून तर जग फसतं.
  • दुःख रेड्याला न डाग पखालीला.
  • दुखणे हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जाते.*
  • दृष्टी आड सृष्टी.
  • देवाचं नावं अऩ स्वताच गावं.
  • दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी.
  • देणं न घेणं आणि कंदील घेऊन येणं.
  • दिवस गेला उठारेटी चांदण्याचे पोहे कुटी.

[संपादन] मुळाक्षर ध

  • धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय.

[संपादन] मुळाक्षर न

  • न खाणार्‍या देवाला नैवेद्य.
  • नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.
  • नकटे असावे पण धाकटे असू नये.
  • नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा.
  • नावडतीचं मीठ अळणी.
  • नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे.
  • निंदकाचे घर असावे शेजारी.
  • न्हाणीला बोळा अन् दरवाजा मोकळा.
  • नाकापेक्षा मोती जड.
  • नवर्‍याने मारलं आणि पावसाने झोडपलं तरी तक्रार कुणाकडे करायची?
  • न कर्त्याचा वार शनिवार.
  • नरो वा कुंजारोवा.
  • नव्याची नवला‌ई.
  • नव्याचे न‌ऊ दिवस.
  • नाकपेक्षा मोती जड.
  • नागड्या कडे उघडा गेला आणि हिवाने मेला.
  • नागोबा म्हसोबा पेंश्याला दोन, पंचमी झाल्यावर पुजतयं कोण?
  • नाचता ये‌ईना म्हणे अंगण वाकडे, स्वयंपाक ये‌ईना म्हणे ओली लाकडे.
  • नात्याला नाही पारा, निजायला नाही थारा.
  • नाव गंगुबा‌ई अऩ तडफडे तान्हेने.
  • नाव मोठे लक्षण खोटे.
  • नाव सुलोचना आणि डोळ्याला चष्मा.
  • नेमीच येतो मग पावसाळा
  • नाज़ुक नार चाबकाचा मार
  • नाव सोनुबाई हाती कथिलाचा वाळा

[संपादन] मुळाक्षर प

  • पदरी पडले आणि पवित्र झाले.
  • पळसाला पाने तीनच.
  • पडतील स्वाती तर पिकतील मोती.
  • पडत्या फळाची आज्ञा.
  • पडलो तरी नाक वर.
  • पहिले पाठे पंच्चावन्न.
  • प्रथमग्रासे मक्षिकापातः
  • प्रयत्नांती परमेश्वर.
  • प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेलही गळे.
  • पाण्यात राहून माशाशी वैर करु नये.
  • पालथ्या घडयावर पाणी.
  • पाचामुखी परमेश्वर.
  • पादा पण नांदा.
  • पाचही बोटं सारखी नसतात.
  • पाटलाचं घोडं महाराला भुषण.
  • पाण्यात राहून माशाशी वैर?
  • पाण्यात म्हैस वर मोल.
  • पाण्यावाचून मासा झोपा घे‌ई केसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
  • पादऱ्याला पावट्याचे निमित्त.
  • पानामागून आली अऩ तिखट झाली.
  • पी हळद अन् हो गोरी.
  • पुढच्यास ठेच मागचा शहाणा.
  • पुढच्यास ठेच मागचा शहाणा.
  • पुरूषाचे मरण शेती, बायकांचे मरण वेती.
  • पेरावे तसे उगवते.
  • दोन मोत्ये गळाली. २७ मोहरा हरवल्या आणि रुपये व खुर्दा किती गेला, याची तो गणतीच नाही

[संपादन] मुळाक्षर फ

[संपादन] मुळाक्षर ब

  • बैल गेला अन् झोपा केला.
  • बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.
  • बारा लुगडी तरी बाई उघडी.
  • बडा घर पोकळ वासा.
  • बळी तो कान पिळी.
  • बाईल गेलीया अऩ झोपा केला.
  • बाईल वेडी लेक पिसा, जावई मिळाला तोहि तसा.
  • बाजारात तुरी भट भटणीला मारी.
  • बाप दाखव नाही तर श्राध्दं कर.
  • बाबा गेला आणि दशम्याही गेल्या.
  • बाळाचे पाय पाळ्ण्यात दिसतात.
  • बुडत्याचे पाय खोलात.
  • बुडत्याला काडीचा आधार.
  • बेशरमाच्या ढुंगणाला फुटले झाड तो म्हणतो मला सावली झाली.
  • बोलण्यात पट्टराघू, कामाला आग लावू.
  • बोलाचीच कढी अऩ बोलाचाच भात.
  • बोलेल तो करेल काय? गरजेल तो पडेल काय?

[संपादन] मुळाक्षर भ

  • भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी.
  • भरवशाच्या म्हशीला टोणगा.
  • भीक नको पण कुत्रा आवर.
  • भित्यापाठी ब्रह्मराक्षस.
  • भुकेला कोंडा, निजेला धोंडा.
  • भरल्या ब्राह्मणाला दही करकरीत.
  • भित्यापाठी ब्रम्हराक्षस.
  • भुकेच्या तापे करवंदीची कापे.
  • भुकेला पिकलं काय? अऩ हिरवं काय?

[संपादन] मुळाक्षर म

  • मरावे परी कीर्तीरुपे उरावे.
  • मातीचे कुल्ले वाळले कि पडायचेच.
  • मनी चिंती ते वैरीही न चिंती.
  • मनी वसे ते स्वप्नी दिसे.
  • मला नं तुला, घाल कुत्र्याला.
  • मला पहा अऩ फुले वहा.
  • माकड म्हणतं माझीच लाल.
  • माकडाच्या हातात कोलीथ.
  • माणूस पाहून शब्द टाकावा, अऩ जागा पाहून घाव मारावा.
  • माय मरो पण मावशी उरो.
  • मिया मुठभर, दाढी हातभर.
  • मी नाही त्यातली अऩ कडी लावा आतली.
  • मेल्या म्हशीला शेरभर दुध.
  • मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही.
  • मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही.
  • मोडेन पण वाकणार नाही.
  • मोह सुटेना अऩ देव भेटेना.
  • म्हननाऱ्यानं म्हण केली, अऩ जाननाराले अक्कल आली.
  • म्हसोबाला नव्हती बायको अऩ सटवीला नव्हता नवरा.
  • म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो.

[संपादन] मुळाक्षर य

  • येरे माझ्या मागल्या.
  • यथा राजा तथा प्रजा.

[संपादन] मुळाक्षर र

  • रंग झाला फिका आणि दे‌ईना कुणी मुका.
  • राजा उदार झाला अऩ हाती भोपळा दिला.
  • राजा तशी प्रजा.
  • राजा बोले अऩ दल चाले.
  • राजाला दिवाळी काय ठा‌ऊक?
  • रात्र थोडी अन् सोंग फार.
  • रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.
  • रोज मरे त्याला कोण रडे.
  • राम राम ठोकणे.
  • रत्रिचा दिवस करणे.

[संपादन] मुळाक्षर ल

  • लंकेत सोन्याच्या विटा.
  • लग्न बघावे करून अऩ घर पहावे बांधून.
  • लबाडाचे आमंत्रण जेवल्याबिगर खोटे.
  • लहान तोंडी मोठा घास.
  • लाखाचे बारा हजार.
  • लाथ मारेन तिथे पाणी काढीन.
  • लेकी बोले सुने लागे.
  • लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.

[संपादन] मुळाक्षर व

  • वराती मागून घोडे.
  • वळ ऊठला पण संशय फिटला.
  • वाचेल तो वाचेल.
  • वाजे पाउल आपले म्हणे मागून कोण आले.
  • वासरात लंगडी गाय शहाणी.
  • विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
  • वेळना वखत आऩ गाढव चाललय भुकत.
  • वेळेला केळं अऩ वनवासाला सिताफळं.

[संपादन] मुळाक्षर श

  • शहाण्याला शब्दाचा मार.
  • शिजे पर्यंत दम धरवतो, निवे पर्यंत धरवत नाही.
  • शितावरून भाताची परीक्षा.
  • शिर सलामत तर पगड़ी पचास.
  • शुभ बोल नाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली.
  • शेरास सव्वाशेर.
  • शेळी जाते जीवनाशी, खाणारा म्हणतो वातड.

[संपादन] मुळाक्षर ष

[संपादन] मुळाक्षर स

  • सगळं मुसळ केरात.
  • सतरा पुरभय्ये अऩ अठरा चुली.
  • सरड्याची धाव कुंपणापर्यंत.
  • साखरेचे खाणार द्याला देव देणार.
  • साठी बुध्दी नाठी.
  • सात सुगरणी, भाजी अळणी.
  • साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण.
  • साप म्हणू नये आपला, नवरा म्हणू नये चांगला.
  • सासू न सासरा जांच करे तिसरा.
  • सासू नाही घरी, नणंद जाच करी.
  • सासू मेली ठीक झाले, घरदार हाती आले.
  • सासू सांगे सुने बोध, आपण पी ऊन ऊन दुध.
  • सासू सुनेची भांडणं, सगळ्या गावाला आमंत्रणं.
  • सुंठेवाचून खोकला गेला.
  • सु‌ईण आहे, तो बाळंत हो‌ऊन घ्यावे.
  • सुसरबा‌ई, तुझी पाठ म‌ऊ.
  • सोन्याहून पिवळे.
  • स्वामी तिन्ही जगाचा आ‌ईविना भिकारी.

[संपादन] मुळाक्षर ह

  • हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.
  • हत्ती गेला आणि शेपूट राहिली.
  • हा सूर्य हा जयद्रथ.
  • हात फिरे तिथे लक्ष्मी वसे.
  • हातचे सोडून पळत्याच्या मागे.
  • हाताची पाची बोटे सारखी नसतात.
  • हातच्या कंकणाला आरसा कशाला?
  • हात दाखवून अवलक्षण कशाला?

[संपादन] मुळाक्षर ळ

[संपादन] मुळाक्षर क्ष

[संपादन] मुळाक्षर ज्ञ

वैयक्‍तिक साधने