Jump to content

कॅप्टचा साहाय्य

ज्या संकेतस्थळांवर जसे की हा विकि, सर्वसामान्य लोकांकडून संपादने करण्याची परवानगी असते, तिथे आपोआप होणारी स्वत:च्या संकेतस्थळांचे दुवे देणारी उत्पात संपादने (Spam) कायम होत असतात. अशी संपादने जरी काढता आली तरी ती एक डोकेदुखी होऊ शकते.

काहीवेळा, जेव्हा एखाद्या पानावर नवीन बाह्यदुवा देताना, विकि तुम्हाला एक चित्र दाखवून त्यांतील शब्द भरण्यास सांगू शकतो. हे काम संगणकाकरवी करून घेण्यास अवघड असल्याने, फक्त खरी माणसेच संपादने करू शकतील व स्पॅमर्सना आळा बसू शकेल.

पण खेदाची गोष्ट अशी की ह्यामुळे अर्धांध व्यक्ती तसेच ज्या व्यक्ती फक्त मजकूर दाखविणारा न्याहाळक वापरतात, अशांना असुविधा होऊ शकते. सध्या आमच्याकडे आवाज ऐकण्याची सुविधा नाही. कृपया संस्थळ प्रचालकांशी या बाबतीत संपर्क करावा.

पृष्ठ संपादनाकडे परत जाण्यासाठी आपल्या ब्राउझरची ’Back' ही कळ दाबा.