सुविचार

Wikiquote कडून
येथे जा: सुचालन, शोध
विकिक्वोट
Look up सुविचार in
विकिपीडिया, the free marathi encyclopedia.
सुविचार हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा

अनुक्रमणिका

स्वर [संपादन]

- - - - - - - - - - अंं - अः

मिश्र [संपादन]

- ॠ - लृ - लॄ

व्यंजन [संपादन]

क वर्ग -
च वर्ग -
ट वर्ग -
त वर्ग -
प वर्ग -
अवर्गीय व्यंजने: य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ ही "अवर्गीय व्यंजने" होत.

क्ष व ज्ञ ही संयुक्त व्यंजने होत.


मूळाक्षर अ [संपादन]

  • अतिथी देवो भव ॥
  • अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा

मूळाक्षर आ [संपादन]

  • आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते
  • आपण जे पेरतो तेच उगवतं
  • आधी विचार करा; मग कृती करा
  • आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका
  • आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका

आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही. आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. • आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका. • आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे. • आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा. • आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. • आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका. • आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. • आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात. • आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं. आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत

मूळाक्षर इ [संपादन]

मूळाक्षर ई [संपादन]

मूळाक्षर उ [संपादन]

मूळाक्षर ऊ [संपादन]

मूळाक्षर ए [संपादन]

  • एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच!

एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही

मूळाक्षर ऐ [संपादन]

मूळाक्षर ओ [संपादन]

मूळाक्षर औ [संपादन]

मूळाक्षर ऋ [संपादन]

मूळाक्षर क [संपादन]

  • कसलीच लाज नसणे हीच एक लाजीरवाणी गोष्ट!
  • काही लोक यशाची फक्त स्वप्ने बघतात. इतर लोक जागे होवून ती स्वप्ने पूर्ण होण्यासाठी धडपडतात.

मूळाक्षर ख [संपादन]

  • खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची
  • खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

मूळाक्षर ग [संपादन]

मूळाक्षर घ [संपादन]

मूळाक्षर च [संपादन]

  • चिंतेसारखे शरिराला जाळणारे दुसरे इतर काहीही नाही. - पंचतंत्र

मूळाक्षर छ [संपादन]

मूळाक्षर ज [संपादन]

  • जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
  • जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही
  • जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे
  • जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते
  • जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही
  • जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते
  • जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
  • जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
  • जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो.
  • ज्याचा शेवट गोड, ते सगळेच गोड!
  • ज्याची चांगुलपणावर श्रद्धा आहे त्याला कशाचेही भय नाही.
  • जगाने माझ्यासाठी काय केले,हे पाहण्याअगोदर मी जगासाठी काय केले हे आगोदर विचारात घ्यावे.

मूळाक्षर झ [संपादन]

मूळाक्षर ट [संपादन]

मूळाक्षर ठ [संपादन]

मूळाक्षर ड [संपादन]

मूळाक्षर ढ [संपादन]

मूळाक्षर ण [संपादन]

मूळाक्षर त [संपादन]

  • तुमचे कर्तुत्व तुम्हाला शिखरावर पोहोचवेल. पण तुमचे चारित्र्य कायम तुम्हाला तिथे ठेवेल.

मूळाक्षर थ [संपादन]

मूळाक्षर द [संपादन]

  • दु:खातसुद्धा एक फार चांगली गोष्ट आहे. दु:ख फार लांबले तर त्यात तीव्रता रहात नाही व दु:ख जर तीव्र असेल तर ते लांबत नाही.
  • द्वेषाने द्वेषाला कधीच जिंकता येत नाही.

मूळाक्षर ध [संपादन]

मूळाक्षर न [संपादन]

  • न मागता देतो तोच खरा दानी

मूळाक्षर प [संपादन]

  • प्रशंसा - स्वीकारायला आणि करायला शिका.

मूळाक्षर फ [संपादन]

  • फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.

मूळाक्षर ब [संपादन]

मूळाक्षर भ [संपादन]

  • भीतीला टाळाल- तर ती वाढत जाते. भीतीचा सामना कराल, तर ती पळून जाते.

मूळाक्षर म [संपादन]

  • माणसान कसं कर्दळीच्या पानासरखं असावं, आयुष्यात कितीही सुखं-दुख: अंगावर पडली तरी ती ओघळून पडावीत अगदी अलिप्त!
  • मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते
  • मूर्ख माणसे,मेल्यानंतर स्वर्गाला जाण्याची वाट बघतात,तर सूज्ञ माणसे या पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

मूळाक्षर य [संपादन]

मूळाक्षर र [संपादन]

मूळाक्षर ल [संपादन]

  • लोक तुमचा "सल्ला" मानत कधीच नाहीत. ते तुमचे "उदाहरण" घेतात.
  • लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म! पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता, हे तुमचे कर्म!

मूळाक्षर व [संपादन]

मूळाक्षर श [संपादन]

मूळाक्षर ष [संपादन]

मूळाक्षर स [संपादन]

  • सत्य हे पाहणार्‍यांच्या वा ऐकणार्‍यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं ! ते नेहमीच जसं असतं तसंच पुढं येतं. उगवत्या सूर्यासारखं !
  • स्वत:ची इच्छा पूर्ण न झाल्याने अस्वस्थ होणारी माणसं किती आहे हे मोजण्याची गरज नाही , आणि दुसर्‍याची इच्छा आणि गरज पुरी करता आली नाही म्हणून अस्वस्थ होणारा विरळाच !
  • संसार हा मोडक्या वस्तू नीट करण्याचा कारखाना आहे. तेथे मोडक्या वस्तू जितक्या जास्त असतील तितकी शिकणार्‍याला संधी जास्त असते.
  • समस्या कोणत्याही दिशेने येवू द्यात, त्या समस्येवरचे समाधान तुमच्याकडुन जावू द्या!
  • सत्याने मिळतं तेच टिकतं
  • सामुदायिक वृत्तीविन, जगी टिकेल प्राणी कोण? जगावे, जगवावे, जीव-वन, ही खरी जीवनकला - संत तुकडोजी महाराज

मूळाक्षर ह [संपादन]

  • हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते
  • ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नये

मूळाक्षर क्ष [संपादन]

  • श्रवण, भाषण, वाचन, निरीक्षण आणि लेखन एवढे दुर्मीळ अलंकार परमेश्वराने दिले असताना इतर आभूषणांची गरजच काय ?

मूळाक्षर ज्ञ [संपादन]

  • ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; ज्ञान तुमचेच रक्षण करते

हे सुद्धा पहा [संपादन]