रामचंद्र वामन पटवर्धन
Jump to navigation
Jump to search
- "या प्रश्नांची उत्तरं शोधायची गरज काय? साहित्याला माणसाच्या आयुष्यात स्थान असलं पाहिजे आणि नसलंही पाहिजे. साहित्याबद्दल कसलाही विचार न करता अतिशय समृद्ध जीवन जगलेली पुष्कळ मंडळी आहेत. त्यामुळे साहित्यवादी मंडळींनी यांच्याकडे तुच्छतेने बघू नये आणि यांनीही त्यांच्याकडे तुच्छेतेने बघू नये. या जगामध्ये सगळ्यांना जागा आहे आणि सगळ्यांनी राहावं."
- ‘‘आम्ही प्रत्येक कथेला भरपूर वेळ देत असू. अन् तोही लेखकावर बळजबरी न करता. हे काढा, ते काढा, असं आम्ही कधी केलं नाही. संपादन असं नसतं. ते फुलवणं असतं. आतमध्ये गुदमरलेली थीम फुलून आली पाहिजे.’’
- ‘‘थोडक्यात मी कलाकृती घेऊन बसतो. त्यात कुठलाही अहंकार नसतो. ते सगळं लेखक आणि माझ्या एक्सचेंजमधून होत असतं. या लेखकाचा कोअर अनुभव काय? त्या अनुभवाला या लिखाणातून बळ मिळतंय का? की पुरेसं मिळत नाहीये?त्या दृष्टीनं मी संबंध कथा वा लेख वाचत असे. संपादन म्हटलं की, थोडासा मास्तरकीचा वास येतो. चुका काढणं वगैरे. पण संपादन म्हणजे संगोपन.’’ [१]