"वसंत पुरुषोत्तम काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Wikiquote कडून
Content deleted Content added
नवीन पान: '''वसंत पुरुषोत्तम काळे''' उर्फ व. पु. काळे ([[मा...
 
No edit summary
ओळ ५०: ओळ ५०:
[[वर्ग:इ.स. २००१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. २००१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]

०५:२५, १९ जून २०१० नुसारची आवृत्ती

वसंत पुरुषोत्तम काळे उर्फ व. पु. काळे (मार्च २५, १९३२ - जून २६, २००१) हे मराठी लेखक, कथाकथनकार होते.


’ज्योत’ म्हटलं की ती झंझावातात विझणारच असं माणलं जातं. सगळ्या ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म. कायम उरतो तो प्रकाश. आणि ज्योतीचा जय होणार नाही असं कशावरून? आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही, झंझावातालाही असतं.


आपत्ती पण अशी यावी, की त्याचाही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं दोन हजार फुटांवरून पडावं. माणूस किती उंचावर पोचला होता, हे तरी जगाला समजेल.


'स्त्री’ ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं, 'तुला बुद्धी हवी का सौंदर्य?’ तेंव्हा ती स्त्री म्हणाली, 'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे!’

'का?’

'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते.’


बायको एक वेळ शरीराने दूर झाली तर चालेल, पण विचारांनी दूर झाली तर फार वाईट. पहिल्या बाबतीतला दुरावा काही काळच अस्वस्थ करणारा असतो, पन दुसरया बाबतीत निर्माण होणारी भिंतं त्याच्यावर डोकं आपटलं तरी सहजी फुटत नाही. पुरूषांचं निम्म आधिक बळ अशा भिंती पाडण्यात खर्च होतं., आणि बायकांकडून कित्येकदा , शरीरासाठीच ही लाडीगोडी चाललेली आहे असा सरसकटं अर्थ घेतला जातो. स्त्री शरीराने दूर झाली म्हणजेच फक्त पुरूष वैतागतो ही त्यांची अशीच गोड समजूत आहे. त्याला तसचं कारण आहे. शरीरसुखासाठी स्त्री राबवली जाते, पुरूष फायदा घेतात. ही किंवा अशा तर्ह्येची शिकवण स्त्री वर्ग परंपरेने घोकत आला आहे.

जीवनाचा साथीदार म्हणुन 'क्ष' व्यक्तिला पसंत करायचं, त्या व्यकितबरोबर आयुष्य घालवायचं, त्याला शरिर अर्पण करायचं, पण मनाची कवाडं उघडी करायला मात्र तिथं वाव नसावा. हीच माणसांची केवढी मोठी शोकांतिका? ह्याला संसार म्हणायचं.

संवाद दोनच माणसांचा असतो त्यात तिसरा आला की त्याच्या गप्पा होतात.

बाह्यदुवे