"वसंत पुरुषोत्तम काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Wikiquote कडून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १३: ओळ १३:


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.vapurvai.blogspot.com | शीर्षक = वपुर्वाई ब्लॉग | भाषा = मराठी }}
* [http://www.vapurvai.blogspot.com वपुर्वाई ब्लॉग] (मराठी मजकूर)


{{DEFAULTSORT:काळे,वसंत पुरुषोत्तम}}
{{DEFAULTSORT:काळे,वसंत पुरुषोत्तम}}

१७:०६, २२ मे २०११ नुसारची आवृत्ती

विकिक्वोट
विकिक्वोट
वसंत पुरुषोत्तम काळे हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा

वसंत पुरुषोत्तम काळे उर्फ व. पु. काळे (मार्च २५, इ.स. १९३२ - जून २६, इ.स. २००१) हे मराठी लेखक, कथाकथनकार होते.

स्रोतांतील अवतरणे

  • ’ज्योत’ म्हटलं की ती झंझावातात विझणारच असं माणलं जातं. सगळ्या ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म. कायम उरतो तो प्रकाश. आणि ज्योतीचा जय होणार नाही असं कशावरून? आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही, झंझावातालाही असतं.
  • आपत्ती पण अशी यावी, की त्याचाही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं दोन हजार फुटांवरून पडावं. माणूस किती उंचावर पोचला होता, हे तरी जगाला समजेल.
  • 'स्त्री’ ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं, 'तुला बुद्धी हवी का सौंदर्य?’
    तेंव्हा ती स्त्री म्हणाली, 'बुद्धीची गरज नाही, सौंदर्यच दे!’
    'का?’
    'बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते.’
  • बायको एक वेळ शरीराने दूर झाली तर चालेल, पण विचारांनी दूर झाली तर फार वाईट. पहिल्या बाबतीतला दुरावा काही काळच अस्वस्थ करणारा असतो, पण दुसरया बाबतीत निर्माण होणारी भिंतं

त्याच्यावर डोकं आपटलं तरी सहजी फुटत नाही. पुरूषांचं निम्म आधिक बळ अशा भिंती पाडण्यात खर्च होतं. आणि बायकांकडून कित्येकदा, शरीरासाठीच ही लाडीगोडी चाललेली आहे असा सरसकटं अर्थ घेतला जातो.

  • स्त्री शरीराने दूर झाली म्हणजेच फक्त पुरूष वैतागतो ही त्यांची अशीच गोड समजूत आहे. त्याला तसंच कारण आहे. शरीरसुखासाठी स्त्री राबवली जाते, पुरूष फायदा घेतात, ही किंवा अशा तर्‍हेची शिकवण स्त्री वर्ग परंपरेने घोकत आला आहे.
  • जीवनाचा साथीदार म्हणुन 'क्ष' व्यक्तीला पसंत करायचं, त्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवायचं, त्याला शरीर अर्पण करायचं, पण मनाची कवाडं उघडी करायला मात्र तिथं वाव नसावा. हीच माणसांची केवढी मोठी शोकांतिका? ह्याला संसार म्हणायचं.
  • संवाद दोनच माणसांचा असतो त्यात तिसरा आला की त्याच्या गप्पा होतात.

बाह्य दुवे