"परिनिरीक्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४,६२० बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
*... इतिहासाला पूर्णविराम ठाऊक नाही. आद्य शंकराचार्यांनी परमेश्वराला देखील 'गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी' असं म्हटलंय. या गतिमान जीवनात वाङ्मयसुद्धा प्रगतच होत रहाणार. तेव्हा नव्या प्रतिमा, नवे शब्द, नवे अविष्कार, नवे विषय आले, तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. त्यातलं अस्सल असेल तेच टिकेल. आणि बाकीचं कालाच्या प्रवाहात वाहून जाईल असा माझा ठाम विश्वास आहे. कारण निर्मळ मनाने वाचणाऱ्याला साहित्यात जीवनाचं दर्शन कुठे घडतंय आणि नुसतंच प्रदर्शन कुठे मांडलं गेलंय हे बरोबर कळतं. नव्या युगातल्या नव्या अनुभूतींचं दर्शन हे सौंदर्यासंबंधीच्या नितीविषयीच्या वगैरे जुन्या रुढ कल्पनांशी कधी कधी जुळणारं नसेलही. मग तसल्या लेखनाच्या आड आपल्या नितीमत्तेच्या संरक्षणाची सबब सांगून शासन येईल. विद्यापीठातले पोटार्थी प्राध्यापक आणि विकत घेतलेले पत्रकार त्यांना साथ देतील. म्हणून लेखक जर दुरितांचे तिमीर जावो या भावनेने त्याला जाणवलेले सत्य कलापूर्ण स्वरुपात मांडत असेल, तर 'जो जे वांछील तो ते लाहो' च्या ठिकाणी 'जो जे वांछील तो ते लिहो' अशी आपली धारणा पाहिजे. माणसाच्या सुकृती इतकीच माणासातली विकृती हे ही एक सत्य आहे. अश्या विकृतीची चित्रे साहित्यात आता ह्या विज्ञानयुगात येणं अपरिहार्य आहे. वैज्ञानिक बुद्धीला आपल्या चुका कबूल करायला संकोच वाटत नाही. पण जो जे वांछील तो ते लिहो म्हटल्यावर लगेच आपल्यापुढे माणसांच्या वासना चाळवणारे त्यांच्यातल्या द्वेषभावनांना प्रोत्साहन देणारे असे लिखाण उद्या अधिकाधिक प्रमाणात लिहिले गेले तर त्याचे काय करायचे? हा प्रश्न उभा राहिल ! हे लेखक समाज रसातळाला नेणारे लेखन करतील या भितीचा बागुलबुवा उभा करुनच सरकार सेंसॉर बोर्ड वगैरे स्थापन करीत असते. आणि संस्कृतीसंरक्षणाचा झेंडा घेऊन स्वत:ची संस्कृती तीच खरी संस्कृती असे मानणारे लोक अस्तन्या वर करुन पुढे सरसावतात. साहित्याने पिढी बिघडवण्याची भाषा तर प्रत्येक पिढीत चालू आहे. मार्क ट्वेन ह्या विनोदी लेखकाचे यंग टॉम सॉयर हे शाळकरी वयातल्या पोरांच्या खोडकर लिलांचे अतिशय मजेदार दर्शन घडविणारे पुस्तक आहे. ते वाचून मुले बिघडतील म्हणून अमेरिकेतल्या एक-दोन संस्थानांतल्या संस्कृतीसंरक्षक सरकारांनी त्यांच्यावर बंदी आणली होती. इंग्लिश संस्कृतीसंरक्षकांनी शॉ च्या पिग्मॅलियन नाटकात नुसता डॅम हा शब्द आल्यामुळे सगळी संस्कृती रसातळाला चालली आहे असे समजून नाटक करणाऱ्यांना किती छळले यावर एक ग्रंथ लिहिला गेला आहे. मराठी भाषेत एके काळी संततिनियमन हा शब्द मोठ्याने उच्चारायची भिती होती. त्यासाठी शकुंतलाबाई परांजपे आणि र. धो. कर्वे यांचा किती छळ झाला होता! आता प्राथमिक शाळांच्या भिंतीवर आतल्या बाजूने शिवाजी महाराजांचा फोटो असतो आणि बाहेरच्या बाजूला निरोधची सरकारी जाहिरात असते. म्हणजे एका बाजूला इतिहासाचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला भविष्य सुखाचा जावो म्हणून दिलेला सावधगिरीचा इशारा! आता छत्रपतींच्या मुळे मुलांच्यातली नुसतीच पूर्वजपूजा वाढेल म्हणून ती तसबीर काढून टाकायची की संततीप्रतिबंधक उपायांचे ज्ञान फार लवकर झाले तर पोरांची निती बिघडेल म्हणून जाहिरातीवर डांबर फासायचे? दोन्ही करण्याची आवश्यकता नाही. भिंतीच्या या दोन्ही बाजू सुबुद्धपणाने पहाता कशा येतील याची दृष्टी समजाला मिळणे हे इथे आवश्यक आहे.,<ref>[[पु.ल. देशपांडे]] 'इचलकरंजी साहित्य संमेलन, १९७४: अध्यक्षीय भाषणातून </ref>
**[[पु.ल. देशपांडे]] 'इचलकरंजी साहित्य संमेलन, १९७४: अध्यक्षीय भाषणातून
 
*राहता राहिला प्रश्न तो स्वातंत्र्याचा स्वैराचार होण्याच्या शक्यतेचा. हा धोका नक्कीच आहे. हा धोका टाळण्यासाठी काही विषयांवर बंदी घालणे; काही भाषेस आक्षेप घेणे; एखाद्या संघटनेने दायित्व स्वीकारणे; एका सेन्सॉर बोर्डाने यासाठी काम करणे असे प्रकार आहेतच. तत्त्व म्हणून हे मान्य होण्यासारखे आहे. पण एकदा का हे तत्त्व म्हणून स्वीकार केले की कोठे थांबायचे हे समजू शकत नाही. ज्यांनी तत्त्व म्हणून हा विषय तारतम्याने मांडला ते कदाचित योग्य ती दिशा दाखवतील देखील. परंतु दुर्दैवाने बऱ्याचदा गोष्टी त्यांच्या हातात राहत नाहीत. वाघावर स्वार होता येते, पण उतरता येत नाही. अतिरेकी बंधने, सूत्रांचे कर्मठ अर्थ, फतवे यांच्यामध्ये हे मूळ तत्त्व गुरफटून जाते. टोकाच्या भूमिका लादणारे सत्यानाशच करून टाकतात असे दिसते. हिंदू धर्म यांस अपवाद राहील असा आशावाद, युक्तिवाद केला जातो. पण दुर्दैवाने तोही तितकासा खरा नाही. एकूणच नियंत्रणातून मिळणारे फायदे काही असलेच तर तुलनेने खूपच अल्पायुषी आहेत.<ref>
[http://www.manogat.com/node/5677 manogat प्रेषक एकलव्य (रवि., १४/०५/२००६ - १७:४६)] page as seen on 29 June 2010</ref>
** manogat प्रेषक एकलव्य (रवि., १४/०५/२००६ - १७:४६)] page as seen on 29 June 2010
 
 
===सोवळ्यातलं सेन्सॉर बोर्ड===
Aug 17, 2014, 12.00AM IST <ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/40317428.cms</ref>
 
 
* जे लोकांना आवडणार नाही, आक्षेपार्ह वाटेल ते लोक बघणार नाहीत. पण त्या नाटकावरच बंदी आणा, असं सांगणारं सेन्सॉर बोर्ड कोण? जयंत पवार
 
 
* रंगभूमी ही पवित्र जागा असून तिचं मांगल्य जपलं पाहिजे, अशी चुकीची धारणा पूर्वापार नाटक करणाऱ्यांच्या मनात घर करून बसली आहे. वास्तविक कलेच्या क्षेत्रात मंगल, पवित्र या मूल्यांना काही थारा नाही. किंबहुना या मूल्यांच्या अतिरेकामुळे कलेच्या वाढीलाच धोका पोचतो. कला ही सत्याचा सौंदर्याच्या अंगाने शोध घेते. तिथे शिव या तत्त्वाचा उपयोग नसतो. पण हे न उमगल्याने (वा मान्य नसल्याने) अनेक सदस्य स्वयंघोषित नीतिरक्षक बनतात आणि 'मोराल पोलिसिंग' करू लागतात. त्यांना हा आपला सरकारदत्त अधिकार वाटतो आणि हट्टाग्रहातून येणाऱ्या गंडापायी ते नाट्यसंहितांवर कात्री चावलून आपल्या हिंसक कृतीचं समर्थन करत राहतात. यात अनेक कलावंत असतात, जे अडाणीपणातून कलेच्याच मुळावर येतात. याचा फटका नाट्यकृतीकडे गंभीरपणे पाहणाऱ्या लेखक-कलावंतांनाच होतो.
 
 
* '''नाटकातली शिवराळ वा तथाकथित अशिष्ट भाषा सेन्सॉर बोर्डाला खटकत असेल तर बोर्डाच्या संवेदनशीलतेत आणि समजशक्तीत काहीतरी कमतरता आहे, असं समजायला हवं.''' प्रमाणभाषेची बंधनं झुगारून विविध समाजगट आपल्या अस्सल भाषेतून आपले अनुभव साहित्यातून, नाटक आणि चित्रपटातून व्यक्त करू लागल्यालाही आता बराच काळ झाला आहे. हे साहित्य आणि कला समाजही एका समजदारीने पचवतो आहे. ही भाषा व्यक्त करण्यामागची कळकळ, प्रामाणिकपणा आणि ती मांडणाऱ्याचा कलेमागचा हेतू तपासला पाहिजे. त्यात अस्सलपणा असेल तर कुठलीच गोष्ट कुणालाही खटकण्याचं प्रयोजनच उरत नाही. सर्वसाधारण समाजाला तो अनुभव, ती भाषा परकी असेल तर ती स्वीकारून प्रगल्भ होण्याची शहाणीव समाजापाशी असते, यावर विश्वास ठेवला पाहिजे. नाटक करणाऱ्याला त्याच्या भाषेत बोलू द्या, तुमचे आग्रह वा सक्ती त्याच्यावर लादू नका, असं आता सरकारनेच आपल्या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांना सांगण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
==संदर्भ==
२७७

संपादने

दिक्चालन यादी