साचा:मुखपृष्ठ छापण्यायोग्य पीडीएफ आवृत्ती

Wikiquote कडून

'घडवा सुंदर हस्ताक्ष आजच्या संगण युगात देखील सुंदर हस्ताक्षराबद्दल पोट तिडकीनं काम करणारी एक मराठी व्यक्ती निरपेक्ष भावनेने कार्य करीत आहे. या व्यक्तीचे नाव आहे किशोर कुळकर्णी.. किशोर कुळकर्णी हे नाशिक येथील एचपीटी कॉलेजमध्ये १९९४-९५ ला पत्रकारिता अभ्यासक्रम शिकत होते. त्यावेळी त्यांची भेट नागपूर येथील सुंदर हस्ताक्षर प्रचारक नाना लाभे यांच्याशी झाली. पूर्वी किशोर कुळकर्णी यांचे देखील हस्ताक्षर म्हणवावे तितके व्यवस्थित नव्हते. त्यांनी प्रयत्नपूर्वक सराव करून आपल्या अक्षरात कमालीचा बदल घडून आणला. आपले अक्षर सुधारल्यावर किशोर कुळकर्णी यांनी नाना लाभे यांना पत्र लिहून कळविले व आता या कार्यासाठी तू तुझे योगदान दे असे सांगितले. तेव्हापासून किशोर कुळकर्णी इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर कसे काढावे याबाबत निस्पृहपणे मार्गदर्शन करीत आले आहेत. धरणगाव येथील सुमारे २००० विद्यार्थ्यांचे वळणदार अक्षर झाले त्याचे श्रेय धरणगावकर किशोर कुळकर्णी यांना देतात. त्यांचा त्याबद्दल विक्रम वाचनालयात अरुणभाई गुजराथी यांच्याहस्ते सत्कार देखील केला गेला. या अक्षर चळवळ राबविणारे किशोर कुळकर्णी जैन इरिगेशनमध्ये प्रसिद्धी विभागात कार्यरत आहे तरी देखील त्यांनी प्रसिद्धी केली नाही कार्य करीत राहिले. २४ मार्च १२ रोजी जळगाव येथील अजिंठा गेस्टहाऊसमध्ये भारताच्या महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना या कार्याबद्दल त्यांनी माहिती दिली. त्यांनी या स्पृहनिय कार्याचे कौतुक केले. या कार्याबाबत त्यांनी अधिकचा वेळ देत जाणून घेतले.