"Wikiquote:नमुना लेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Wikiquote कडून
Content deleted Content added
No edit summary
Replacing page with '* The previous writings or part there of are being deleted being not suitable for the purpose of Wikiquote website. One can visit history of this page to read through previous ...'
 
ओळ १: ओळ १:
* The previous writings or part there of are being deleted being not suitable for the purpose of Wikiquote website. One can visit history of this page to read through previous editions of this page.
'''वारस'''

एका विषयात मनातल्या किती गोष्टी उतरवायच्या असं होतं. खरं तर ह्य विषयी काहीतरी लिहावं हे बरयाच दिवसापासून मनात होतं, आज दादाच्या जिज्ञाच्या झालेल्या आगमनाच्या फोननी त्याला एक नवी जाग दिली.


पित्याची शाल अन मातेची उब घेऊन येणारं हे अर्भक. नक्की ह्या चिमुकल्या जीवाला आपण किती स्वरुपात पाहत असतो. एकमेकांच्या असीम समर्पणाची पावती, घराण्याचा वारस, वंशाचा दिवा, आई वडिलांच्या म्हातारपणाची काठी, सक्षम पालक म्हणवुन घेण्यासाठीची पात्रता कि अजून काही? की फ़क्त निसर्गाचा नियम म्हणुन झालेलं प्रजनन? ह्या सगळ्याचं स्वरुप कालानुसार, प्रसंगानुसार आपण ठरवणार असतो. ज्या ज्या घरातून हा जीव रूपी प्रकाश पडत नाही ती सगळीच घरे अंधाराने भरलेली आहेत असं समजायचं का? काही कारणांमूळे जिथे हा अंकुर फुटत नाही तिथे समर्पणच नाही का, जिथे हा वारस नाही त्या घराणेशाहीचा लौकिक केवळ तो नसल्यानेच नाही का?


आपल्या जीवा सारखा दूसरा जीव निर्माण होणं हा अनुभव लग्नरूपी बंधनातून आलेला दोन जीवांचे बंध अजून घट्ट करतो. पण काही आणि अनेक कारणांमुळे हा जीव जन्म घेत नसेल तर तो बंध अजून घट्ट व्हावा हिच तर काळाची अपेक्षा नसते?


हे इवलेसे रोप रुजविण्याच्या आधीच त्याचे भांडवल करून किती जिव नागविले जातात? मूल होणार नाही हे कळ्ल्यावर सुद्धा किती कुटुंबातले लोक आपल्या सुनेविषयी ती मांडवात होती त्या वेळे इतकेच प्रेम, आदर किंवा कौतूक बाळगतात. शिक्षणाने संपन्न झालेलो अम्ही केवळ ह्या एका गोष्टीला फ़्लॉ समजून/माणून नवीन आई ह्या पर्यायी व्यवस्थे पर्यन्त विचारी मजल घेऊन जातो. " तू त्याला मूल देवू शकत नाही म्हनुणच तो असा वागत असावा" असे सांगणारी सासू जर एखाद्या सासुरवाशिणीचि आई असती तर इतक्या सहज आपल्या मुलाच्या ह्या भावी पराक्रमाचे समर्थन करू शकली असती काय? मूल, सून अन नातवंडांचे वर्षो न वर्षे तोंड न पाहीलेली, एकाच गावांत असून मुलासुनांची वेगवेगळी घरं असणारी जाणकार, बुजुर्ग माणसे देखिल "अजून नाही का काही?" हे असले वयस्कर प्रश्न विचारुन त्या जोड्प्याबद्दलची हीणवनुक वजा काळजी चार चौघात व्यक्त करतात.

हे प्रश्नं आणि मानवी मनाच्या अपेक्षा इथेच संपत नाहीत. अनेक वर्ष अपत्यासाठी प्रतीक्षा करत असलेलं कुटूंब किंवा त्या कुटूंबाचे सो कॉल्ड हितचिंतक आपले जाहिर अन निरागस मत मांडतात....
"काही असो बाबा , लहान मूल घरात आलं, पाळणा हालला म्हणजे पावले.."


मग हाच नियम अंतिम व कायम का जोपासला जात नाही. काल पर्यंत काहीही व्हावं अशी दैवाकडे माफक अपेक्षा करणारे आम्ही... "आता तरी ह्या खेपेला तुम्हाला मुलगा होईल बरं का..." अशी सदिछचा व्यक्त करतो. दुसरयाने सांगण्याचे सोडा काही घरात तर चार चार मुली केवळ मुलगा होत नाही ह्या कारणाने केवळ प्रतीक्षा यादी म्हणुन येतात. ’सरस्वती’ विद्येचे आणि ’लक्ष्मी’ हे संपत्तीचे मुख्य दैवत माणणारया देशात ४८ टक्के * मुलींना आपण मुलगा असायला हवे होते असे वाटायला लावणारी कसलीही पालनशैली. याला काही हौशि किंवा सुज्ञ कुटुंबप्रमुख अपवाद असतीलही पण आज हा प्रश्न नको तेवढा बिकट आणि भयानक होतोय. गर्भलिंग तपासणी करणारे डॉक्टर आणि त्यांच्याभोवती निर्माण होणारी गर्दी पाहून या दोघांच्याही दुटप्पीपणाची चिड येते.


नुकत्याच झालेल्या आरोग्यविभागाच्या पुरस्कार कार्यक्रमात स्वत: उपमुख्यमंत्र्यांनी आणि जाणकारांनी यांवर चिंता व्यक्त करुन आता कठोर पावले उचलण्याची वेळ आल्याचे सांगितले. शिक्षण हे केवळ उदरभरणाचे साधन नसून त्याच्या साह्याने योग्य अणि अयोग्य यांतील भेद ओळखन्याची नवी द्रुष्टी प्राप्त होत असते. आजही आपल्या समाजात डॉक्टर हा शिक्षणातील राजा मानला जातो. दवाखान्यांबाबत सामान्यांमध्ये आदराचे स्थान आहे. स्वत: पालकांच्या सहभागाशिवाय असे प्रकार घडणे शक्य नाही, पण तरीही एक जबाबदार घटक म्हणून डॉक्टरने आपली खरी भूमिका बजावणे क्रमप्राप्त आहे. आपल्या पांढरया अन शुभ्र कोटावर केवळ दोन पैसे जास्त मिळवता येतील म्हणून एवढा मोठा डाग लावून घेणे ही या प्रतिष्टित व्यवसायासाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. सुदैवाने, कानावर बंदूक ठेउन "करता की नाही हे काम" अशी परिस्थिती या शाहू - फुले - आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात डॉक्टरांवर अजून तरी आलेली नाही.

यासाठी कायदा जरी असला तरी खरा संबंध आहे तो भावनेशी. कायद्याने फार तर भिती वा जरब निर्माण होइल, पण त्याने अंतरीच्या जाणीवा जागृत होतीलंच याची शाश्वती नाही. तसे झाले तर बंटी काय किंवा बबली काय.. सारखेच अगदी नशिबाने किंवा नीयतीने दोघांनाही नाकारले तरीही उभयतांमधले नाते हे मात्र राजा-रानीचेच रहावे हीच अपेक्षा.



'''सुनील चोरे - (बेल्हे) '''
sunilchore@rediffmail.com



* संदर्भ :
केंद्रिय महिला व बालविकास मंत्रालय अहवाल - "बालक शोषण : भारत २००७"

१६:४०, ३१ ऑगस्ट २००७ ची नविनतम आवृत्ती

  • The previous writings or part there of are being deleted being not suitable for the purpose of Wikiquote website. One can visit history of this page to read through previous editions of this page.