"समर्थ रामदास स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Wikiquote कडून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विकिपीडिया}}
{{विकिपीडिया}}
{{विकिस्रोत साहित्यिक}}
१. आधी संसार करावा नेटका | मग घ्यावें परमार्थ-विवेका ||
१. आधी संसार करावा नेटका | मग घ्यावें परमार्थ-विवेका ||



०८:३९, २६ मे २०१२ नुसारची आवृत्ती

विकिक्वोट
विकिक्वोट
समर्थ रामदास स्वामी हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा

१. आधी संसार करावा नेटका | मग घ्यावें परमार्थ-विवेका ||

२. मराठा तितुका मेळवावा | आपुला महारष्ट्रधर्म वाढवावा ||

३. जो दुसऱ्यावरी विश्वासला | त्याचा कार्यभाग बुडाला ||

४. आहे तितुकें जतन करावे | पुढें आणिक मिळवावें ||

५. धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट | खटनटासी खटनट | अगत्य करी" ||

६. धर्मासाठी मरावें | मरोनी अवघ्यांसी मारावें | मारितां मारितां घ्यावें | राज्य आपुलें ||

७. केल्याने होते आहे रे आधी केलेंचि पाहिजें ||

८. आधी केलें | मग सांगितलें ||

९. सामर्थ्य आहे चळवळीचें | जो जो करील तयाचें | परंतु तेथे भगवंताचें | आधिष्ठान पाहिजे ||

१०. देव मस्तकीं धरावा | अवघा हलकल्लोळ करावा | मुलुख बडवा कां बडवावा | धर्मसंस्थापनेसाठी ||

११.परमार्थ आहे तो राज्यधारी | परमार्थ नाही तो भिकारी |या परमार्थाची सरी | कोणास द्यावी ?||

१२.इहलोक साधायाकारणें । जाणत्याची संगती धरणें । परलोक साधायाकारणें । सदगुरु पाहिजे ॥

१३.जयांस आहे विचार । ते सुकासनीं जाले स्वार । इतर जवळील भार । वाहातचि मेले ॥

१४.आयुष्य हेचि रत्नपेटी।माजी भजनरत्ने गोमटी।ईश्वरी अर्पूनिया, लुटी।आनंदाची करावी।।

१५.असत्याचा अभिमान । तेणें पाविजे पतन । ह्मणोनिया ज्ञाते जन । सत्य शोधिती ॥

१६.जेणें संसारीं घातलें । आवघें ब्रह्मांड निर्माण केलें । त्यासी नाहीं वोळखिलें । तोचि पतित ॥

१७.उपासनेचा मोठा आश्रयो | उपासनेविण निराश्रयो |उदंड केला तरी तो जयो | प्राप्त नाही ||

१८.जेणे परमार्थ ओळखिला।तेणे जन्म सार्थक केला।येर तो पापी जन्मला।कुलक्षया कारणे।।

१९.मीपणापासून सुटला । तोचि येक मुक्त जाला । मुका अथवा बोलिला । तरी तो मुकत ॥

२०.नाहीं उपासनेचा आधार । तो परमार्थ निराधार । कर्मेविण अनाचार । भ्रष्ट होती ॥

२१झाले साधनाचे फळ| संसार झाला सफळ| निर्गुण ब्रह्म ते निश्चळ| अंतरी बिंबले| |