अब्राहम लिंकन
Appearance
अब्राहम लिंकन (फेब्रुवारी १२, १८०९ - एप्रिल १५, १८६५) हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होते. (कार्यकाळ: १८६१ ते १८६५)
- As I would not be a slave, so I would not be a master. This expresses my idea of democracy.
- जसे मला गुलाम व्हायला आवडणार नाही तसेच मला मालक व्हायला आवडणार नाही. लोकशाहीची माझी कल्पना यावरून स्पष्ट होते.
- Avoid popularity if you would have peace.
- शांतता हवी असेल तर प्रसिद्धी टाळा.
- Common looking people are the best in the world: that is the reason the Lord makes som many of them.
- दिसायला सर्वसामान्य असणारे लोक जगात सर्वोत्तम असतात म्हणूनच परमेश्वर त्यांना इतक्या मोठ्या संख्येत निर्माण करतो.
- Everybody likes a compliment.
- प्रशंसेचा एक शब्दही सगळ्यांना हवासा वाटतो.
- Knavery and flattery are blood relations.
- लबाडी आणि खुशामत यांचे जवळचे नाते आहे.
- The ballot is stronger than the bullet.
- बंदुकीच्या गोळीपेक्षा मतपत्रिका श्रेष्ठ असते.
- When you have got an elephant by the hind legs and he is trying to run away, it's best to let him run.
- तुम्ही एखाद्या हत्तीचे मागचे पाय धरले असतील आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला पळून जाऊ देणेच योग्य.
- आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय.
- स्त्री एक अशी गोष्ट आहे. ज्याला मी घाबरतो हे माहीती असून की ती मला काही इजा करणार नाही.
- लोकशाही म्हणजे लोकांची, लोकांसाठी, लोकांनीच बनवलेली सरकार होय.
- जर कुत्र्याच्या शेपटीला पाय म्हंटले तर कुत्र्याला पाय किती? उत्तर असेल चार. कारण शेपटीला पाय म्हंटल्याने ते पाय होत नाही..
- मी आज जेही आहे किंवा होण्यासाठी आशावादी आहे. त्याच श्रेय फक्त आईलाच देईन
- नेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे.
- शत्रुना मित्र बनवुन, मी माझे शत्रु कमी किंवा नष्ट करत नाहीये का.
- जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.
- सामान्य दिसणारे लोकच जगात सर्वात चांगले लोक असतात. म्हणूनच देव अश्या लोकांनाच जास्ती निर्माण करतो.
- जर कोणी मला झाड तोडायला 6 तास दिले तर त्यातले 4 तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेन.
- जर तुम्ही एकदा जनतेचा विश्वास तोेडला तर तुम्हाला परत कधी जनतेचा आदर आणि सम्मान मिळणार नाही.
- प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.
- जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात रहाण्याचा अधिकार नाही.
- मी जिंकण्यासाठी बांधील नाही. पण मी चांगलं आणि वाईट होण्यासाठी बांधील आहे.
- अमेरिका कधीही बाहेरून नष्ट होणार नाही. आपण जर अडखळलो आणि आपली स्वातंत्र्य गमावून बसलो, तर असं यामुळे होईल कारण आपण स्वतःचा नाश केला.
- जेव्हा मी चांगले करतो, तेव्हा मला चांगले वाटते. जेव्हा मी वाईट करतो, तेव्हा मला वाईट वाटते. तो माझा धर्म आहे.
- जर व्यक्ती एखादं काम चांगलं करत असेल तर मी सांगेन ते काम त्याला करू द्या. त्या व्यक्तीला एक संधी द्या.
- एक तरुण व्यक्तीला जीवनात पुढे जायचे असेल तर प्रत्येक बाजूने त्याला स्वतःचा विकास करवा लागेल. आपल्याला कुणी मागे खेचेल का? हा विचार त्याच्या मनामध्ये येता कामा नये.
- तुम्ही तक्रार करू शकता की गुलाबाच्या झाडाला काटे असतात. पण तुम्ही आनंदी होऊ शकता की काट्याच्या झाडाला गुलाब लागतात.
- आपण आज सुटका घेऊन उद्याच्या जबाबदारीतून बाहेर पडू शकत नाही.
- जवळजवळ सर्वच माणसे प्रतिकूल परिस्थितीला सामोरी जाऊ शकतात, परंतु एखाद्या माणसाची चारीत्र्याची परीक्षा घ्यायची असेल तर त्याला शक्ती द्या.
- यशस्वी खोटे बोलणार होण्यासाठी कोणाकलाही पुरेशी चांगली स्मृतीं नाही.
- मी हळुवार चालणारा आहे पण मी मागे कधी चालत नाही.