डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१- ६ डिसेंबर १९५६) हे थोर मानवी हक्कांचे कैवारी, भारतीय संविधानाचे शिल्पकार, बहुश्रुत विद्वान आणि तत्त्वज्ञ होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने सर्वपरिचीत.
विचार
[संपादन]- "मी आणि माझे अनुयायी मुसलमान
झालो असतों तर कोट्यवधी रुपये आमच्या समाजाच्या पायावर ओतले गेले असते हे तुम्ही निश्चयाने समजा! माझ्या मनांत तसा द्वेष आणि सूड असता तर पाच वर्षांच्या आत मी ह्या देशाचे वाटोळे करू शकलो असतो. पण ह्या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून स्वतःच्या नावाची नोंद करून घेण्याची मला मुळीच इच्छा नाही!"[१]
तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.
आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका.
स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे 'हुकूमशाही' आणि माणसां-माणसांत भेद मानणारी 'संस्कृती'.
शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.
लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.
मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारख आहे.
मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभीमान निर्माण केला आहे.
देववर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.
अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.
स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.
सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततही भारतीय ही भूमिका घ्यावी.
चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने.
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.
माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.
करूणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.
शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.
पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.
ग्रंथ हेच गुरू.
वाचाल तर वाचाल.
इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.
मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.
तिरस्कार माणसाचा नाश करतो.
माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल.
एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.
भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.
धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय.
लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.
द्वेषाला सहानूभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.
बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.
बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान.
धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.
मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.
शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !
साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते.
शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याची विचार केला पाहिजे.
सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हेच सर्वात मोठे चूक आहे. धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार.
सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही.
अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.
मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.
जगात म्हणे, सहा विद्वान आहेत. त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत असे एक युरोपियन म्हणाले होते.
ज्यांच्या अंगी धैर्य नाही. तो पुढारी होऊ शकत नाही.
बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. कारण तो केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे.
भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.
सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात झालाच नाही.
बौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याच्या एकमेव असा धर्म आहे.
बुद्ध हेच खरे विचारवंत होते. त्यांच्यासारखा थोर विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही.
शक्तिचा उपयोग वेळ - काळ पाहून करावा.
महामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्ति-स्वातंत्र्याची फुले वाहू नका.
शंका काढण्यास देखील ज्ञान लागले.
आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?
हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.
नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.
जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.
वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.
मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
पती- पत्नि मधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.
जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात.
मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.
जर या देशात शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता.
प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.
मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.
सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरूकिल्ली म्हणजे राजकिय शक्ती हीच होय.
जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.
स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.
माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.
कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही.
बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.
एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.
शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.
अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.
काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.
"
जो प्रतीकुल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो.
"
जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.
"
मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते.
शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.
"
देशाचे भवितव्य बुद्धिवादी वर्गावर अवलंबून
"
थोर माणूस इतिहास घडवितो हा सिद्धांत तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारू नका. तुम्हाला एवढे मान्य करावेच लागेल की, प्रत्येक देशात बुद्धिवादी लोक, सत्ताधारी वर्ग नसला तरी, प्रभावशाली वर्ग असतो.
बुद्धिवादी वर्गास दूरदृष्टी असते, तो सल्ला देऊ शकणारा आणि आणि पुढाकार घेणारा वर्ग असतो."
"
कुठल्याही देशात सामान्य जनसमुदाय स्वबुद्धियुक्त विचार आणि कृती असलेले जीवन जगत नाही. तो बहुतांशी अनुकरण करणारा असून बुद्धिवादी वर्गाचे अनुकरण करतो."
"
देशाचे भवितव्य सर्वस्वी बुद्धिवादी वर्गावर अवलंबून असते असे म्हणण्यात अतिश्योक्ती नाही."
"
हा वर्ग प्रामाणिक, स्वतंत्र आणि निर्लोभी असेल तर संकटसमयी पुढाकार घेऊन तो योग्य दिशा देईल असा भरवसा त्याच्यावर ठेवता येऊ शकतो"
संदर्भ
[संपादन]- ↑ संदर्भ:- नवयुग, पान नं ०५
Quotes
[संपादन]- I was born a Hindu but will not die one.
- Quoted in The bogey of forced conversions, "COMMENT"The Hindu, India (2008-10-26) ]
- Neither god nor soul can save society.
- In an Interview with BBC radio [[१]]