Jump to content

चर्चा:म्हणी

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
Wikiquote कडून
Latest comment: ४ महिन्यांपूर्वी by 2409:4081:1D87:4210:3DB2:93AF:460E:C0E0 in topic hindi

म्हणी

[संपादन]

01. अंगापेक्षा बोंगा जास्ती.

02. अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी. / आली अंगावर अन घेतले शिंगावर.

03. अंथरूण पाहून पाय पसरावेत.

04. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.

05. अंधेर नगरी चौपट राजा.

06. अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.

07. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.

08. अडला हरी धरी गाढवाचे पाय.

09. अडली गाय खाते काय.

10. अती झालं अऩ हसू आलं

11. अती तिथं माती.

12. अती परीचयात आवज्ञा.

13. अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.

14. अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.

15. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.

16. अळवाची खाज़ अळवाला ठा‌ऊक.

17. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.

18. असतील चाळ तर फिटतील काळ.

19. असतील शिते तर नाचतील भूते.

20. असून अडचण नसून खोळांबा.

21. असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.

22. असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.

23. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.

24. आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही./ आ‌ई जेवू घालत नाही अन बाप भिक मागू देत नाही

25. आ‌ऊचा का‌ऊ तो म्हणे मावसभा‌ऊ.

26. आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.

27. आग लागल्यावर विहीर खणणे./ तहान लागल्यावर विहीर खणणे.

28. आड जीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई. दिसू नये म्हणून मोरीला बोळा अन दार सताड उघडा. चोरून पोळी वाढली तर बोंबलून तूप मागणे.

29. आडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा./ किंवा गावच्या वेशी पाडा.

30. आड्यात नाही तर पोऱ्ह्यात कोठून./ आडातच नाही तर पोहर्यात कुठून येणार.

31. आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.

32. आधणातले रडतात, सुपातले हसतात./ जात्यातले रडतात अन सुपातले हसतात.

33. आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.

34. आधी पोटोबा, मग विठोबा.

35. आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना.

36. आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.

37. आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ./ आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना. अधिक महिना.

38. आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?

39. आपला तो बाळ्या दुसऱ्याचा तो कार्ट्या.

40. आपला हात, जग्गन्नाथ.

41. आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.

42. आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.

43. आपल्या कानी सात बाळ्या.

44. आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते./ स्वताच्या डोळ्यातले कुसळ दिसत नाही पण दुसर्याच्या डोळ्यातले मुसळ तेवढे दिसते.

45. आयजीच्या जिवावर पायजी उधारी. /बायजी/

46. आयत्या बिळात नागोबा.

47. आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.

48. आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला.

49. आळ्श्याला गंगा दूर.

01. इकडे आड तिकडे विहीर

01. उंदराला मांजराची साक्ष.

02. उचलली जीभ लावली टाळूला.

03. उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.

04. उथळ पाण्याला खळखळाट फार.

05. उपट सुळ, घे खांद्यावर.

06. उस गोड लागला म्हणून मुळासगट खावू नये.

07. ऊस झाला डोंगा परी रस नाही डोंगा.

01. एकादशीच्या घरी शिवरात्र.

02. ऐंक ना धड बाराभर चिंद्या.

03. ऐंट राजाची अऩ वागणूक कैंकाड्याची.

04. ऐकटा जिव सदाशिव.

05. ऐकावे जनाचे करावे मनाचे.

To get the latest and funny marathi mhani please visit: Marathi Mhani

अकलेने काम होते, बहुता हाती थोडे येते. शिवानी रमेश माने (चर्चा) १६:४३, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

अकृत्रिमती ही सत्याची माता. शिवानी रमेश माने (चर्चा) १६:४६, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

अकृत्रिम मित्रभाव तो जाणा उत्तम स्वभाव. शिवानी रमेश माने (चर्चा) १६:४९, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

अकलेहून विद्या जास्ती ओझ्याप्रमाने वाढती. शिवानी रमेश माने (चर्चा) १६:५१, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

इकडे आड तिकडे विहीर. शिवानी रमेश माने (चर्चा) १६:५६, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

इकडे बोलणे नाही, तिकडे चालणे नाही. शिवानी रमेश माने (चर्चा) १६:५७, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

इच्छा आवरी खर्च थोडा करी. शिवानी रमेश माने (चर्चा) १६:५८, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

इच्छा कमी ठेविती अगत्य थोडी लागती. शिवानी रमेश माने (चर्चा) १६:५९, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

इच्छा बुध्दीविना आंधळी. शिवानी रमेश माने (चर्चा) १६:५९, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

इच्छा सरळपणाची सरळ वाट ती नीतीची. शिवानी रमेश माने (चर्चा) १७:०१, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

इच्छी परा येती घरा. शिवानी रमेश माने (चर्चा) १७:०२, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकांचे राजे होते. शिवानी रमेश माने (चर्चा) १७:१४, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

इच्छिलेले साधेल तर दारिद्र का बांधेल. शिवानी रमेश माने (चर्चा) १७:१७, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

इच्छे पुरते खाणे, नियमित पिणे. शिवानी रमेश माने (चर्चा) १७:१९, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

इडापिडा जावो आणि बळीचे राज्य येवो. शिवानी रमेश माने (चर्चा) १७:२३, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

इडापिडा टळो , अमंगळ पळो. शिवानी रमेश माने (चर्चा) १७:२४, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

इतना पका के बासी थका. शिवानी रमेश माने (चर्चा) १७:२४, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

इतरांचा गर्व पहावा आपले अंगी न धरावा. शिवानी रमेश माने (चर्चा) १७:२५, १५ डिसेंबर २०२१ (UTC)Reply

म्हणींचे अर्थ

[संपादन]
  • पी हळद हो गोरी - उतावळेपणा दाखविणे
  • मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही - प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
  • बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर - दोनपैकी एक पर्याय निवडणे
  • चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे - प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
  • आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे
  • उंटावरचा शहाणा - मूर्ख सल्ला देणारा
  • अडला हरी गाढवाचे पाय धरी - अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
  • नाचता येईना अंगण वाकडे - स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो
  • तोंड दाबून बुक्क्यांचा मार - विनाकारण जुलूम सहन करावा लागणे
  • नावडतीचे मीठ अळणी - नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही
  • अंथरूण पाहून पाय पसरावे - ऎपत पाहून खर्च करवा
  • छत्तीसाचा आकडा - विरुद्ध मत असणे
  • तेरड्याचा रंग तीन दिवस - एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
  • दुष्काळात तेरावा महिना - संकटात अधिक भर
  • नव्याचे नऊ दिवस - नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही
  • एका हाताने टाळी वाजत नाही - दोष दोन्हीकडे असतो
  • पालथ्या घड्यावर पाणी - सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे
  • वासरात लंगडी गाय शहाणी - अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो
  • रात्र थोडी सोंगे फार - काम भरपूर, वेळ कमी
  • अति शहाणा त्याचा बैल रिकामा - अति शहाणपणाने नुकसान होते
  • शेरास सव्वाशेर - प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ
  • नाकाचा बाल - अत्यंत प्रिय व्यक्ती
  • नाकापेक्षा मोती जड होणे - डोईजड होणे
  • आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना - दोन्ही बाजूंनी अडचण
  • कामापुरता मामा - काम साधण्यापुरते गोड बोलणे
  • आधी पोटोबा मग विठोबा - अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे
  • काखेत कळसा गावाला वळसा - वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे
  • झाकली मूठ सव्वा लाखाची - दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत
  • पायीची वहाण पायी बरी - योग्यतेप्रमाणे वागवावे
  • मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये - एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये
  • उंटावरून शेळ्या हाकणे - आळस, हलगर्जीपणा करणे
  • कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही
  • कोल्हा काकडीला राजी - लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
  • गाढवाला गुळाची चव काय - अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते
  • घोडामैदानजवळ असणे - परीक्षा लवकरच होणे
  • डोंगर पोखरून उंदीर कढणे - जास्त श्रम करून कमी फायदा होणे
  • भरंवशाच्या म्हशीला टोणगा - पूर्ण निराशा करणे
  • वरातीमागून घोडे - एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे
  • पाण्यात राहून माशाशी वॆर - बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे?
  • खायला काळ भुईला भार - ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो
  • तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले - दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे
  • नाव मोठे लक्षण खोटे - कीर्ती मोठी पण कृती छोटी
  • हपापाचा माल गपापा - लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते
  • कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ - आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे
  • गर्जेल तो पडेल काय? - पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही
  • टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही - कष्टाशिवाय यश मिळत नाही
  • वारा पाहून पाठ फिरवावी - वातावरण पाहून वागावे
  • कुंपणानेच शेत खाणे - रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे
  • दगडावरची रेघ- कायमची गोष्ट
  • पळसाला पाने तिन - सर्वत्र सारखी परिस्थिती असणे.
  • घरोघरी मातीच्या चुली - सर्वत्र सारखी परिस्थिती असणे.

hindi

[संपादन]

hindi

2409:4081:1D87:4210:3DB2:93AF:460E:C0E0 ११:२८, ३१ जुलै २०२४ (UTC)Reply