अज्ञातांची अवतरणे
Appearance
- प्रत्येक विवादाला तीन बाजू असतात - तुमची बाजू, माझी बाजू आणि खरी बाजू.
- कठोर परिश्रमांमुळे कोणी मेले नाही, पण तशी परीक्षा का घ्या?
- प्रत्येकाला स्वर्गात जावेसे वाटते, पण मरण्यास कोणी तयार नसतो.
- यशाकडे नेणार्या मार्गाच्या दुरुस्तीचे काम नेहमी सुरूच असते.
- निराशावादी माणसाला पैसे उसने मागावे - त्याला ते परत मिळण्याची आशा नसतेच.
- लग्ने स्वर्गात ठरतात पण वीजही तेथेच निर्माण होते.
- कोणतेही यश किंवा अपयश हे शेवटचे नसते.
- सुरक्षित किनारा सोडून जायची तयारी नसेल तर नवे महासागर शोधता येणारच नाहीत.