अब्राहम लिंकन

Wikiquote कडून
येथे जा: सुचालन, शोध
अब्राहम लिंकन

अब्राहम लिंकन (फेब्रुवारी १२, १८०९ - एप्रिल १५, १८६५) हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होते. (कार्यकाळ: १८६१ ते १८६५)

 • As I would not be a slave, so I would not be a master. This expresses my idea of democracy.
  • जसे मला गुलाम व्हायला आवडणार नाही तसेच मला मालक व्हायला आवडणार नाही. लोकशाहीची माझी कल्पना यावरून स्पष्ट होते.
 • Avoid popularity if you would have peace.
  • शांतता हवी असेल तर प्रसिद्धी टाळा.
 • Common looking people are the best in the world: that is the reason the Lord makes som many of them.
  • दिसायला सर्वसामान्य असणारे लोक जगात सर्वोत्तम असतात म्हणूनच परमेश्वर त्यांना इतक्या मोठ्या संख्येत निर्माण करतो.
 • Everybody likes a compliment.
  • प्रशंसेचा एक शब्दही सगळ्यांना हवासा वाटतो.
 • Knavery and flattery are blood relations.
  • लबाडी आणि खुशामत यांचे जवळचे नाते आहे.
 • The ballot is stronger than the bullet.
  • बंदुकीच्या गोळीपेक्षा मतपत्रिका श्रेष्ठ असते.
 • When you have got an elephant by the hind legs and he is trying to run away, it's best to let him run.
  • तुम्ही एखाद्या हत्तीचे मागचे पाय धरले असतील आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला पळून जाऊ देणेच योग्य.
विकिक्वोट
अब्राहम लिंकन हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा