अरविंद घोष

Wikiquote कडून
Jump to navigation Jump to search

पूर्वायुष्यात स्वातंत्र्य चळवळीत अग्रस्थानी असणारे [[अरविंद घोष]] पुढे योगी श्रीअरविंद या नावाने ओळखले जाऊ लागले.

  • माणसामध्ये सुप्त असलेल्या क्षमतांच्या आविष्करणाच्या द्वारे,आत्मपूर्णत्वाच्या दिशेने चाललेला पद्धतशीर प्रयत्न हा 'योग' या संकल्पनेचा आमचा अर्थ आहे.

(Collected Works of Sri Aurobindo Vol 23 : Pg 06)

  • भारत स्वतंत्र झाला आहे, पण हे स्वातंत्र्य भेगाळलेले व खंडित आहे. भारताला एकता साध्य झालेली नाही...

कोणत्याही मार्गाने का होईना, पण हे विभाजन नाहीसे झाले पाहिजे आणि तसे ते होईल. (Collected Works of Sri Aurobindo Vol 36 : Pg 475)

  • प्रकृतीचे एक दिवस संपूर्ण रूपांतरण घडून येईल ही केवळ आशा नाही तर तो दृढ विश्वास आहे.
(Collected Works of Sri Aurobindo Vol 29 : Pg 404)
  • अतिमानस हे सत्य आहे आणि वस्तुजाताच्या प्रकृतीमध्येच त्याचे आगमन अनिवार्य झाले आहे.
(Collected Works of Sri Aurobindo Vol 35 : 334)
  • धार्मिक विचारांमधील आणि अनुभवांमधील निम्नता, संकुचितपणा आणि उथळपणा बाजूला सारा. विशाल अशा क्षितिजांपेक्षाही व्यापक व्हा, सर्वोच्च कांचनगंगेपेक्षा देखील उन्नत व्हा, सर्वात खोल अशा समुद्रापेक्षाही अधिक अगाध व्हा.

(Collected Works of Sri Aurobindo Vol 12 : 434)

  • तुमच्यातील एखादा जरी भाग ह्या विश्वाशी निगडित असेल तर आणि तोवरच हे विश्व तुम्हाला त्रास देऊ शकते. जर तुम्ही पूर्णत: ईश्वराचेच होऊन गेलात तरच, तुम्ही मुक्त होऊ शकता.

(Collected Works of Sri Aurobindo Vol 29 : 76)