अल्बर्ट आइनस्टाइन

Wikiquote कडून
विकिक्वोट
विकिक्वोट
अल्बर्ट आइनस्टाइन हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा
अल्बर्ट आइनस्टाइन, 1947

अल्बर्ट आइनस्टाइन (मार्च १४, इ.स. १८७९ - एप्रिल १८, इ.स. १९५५) हे एक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात.

  • Subtle is the Lord, but malicious He is not.
    • भाषांतर: परमेश्वर तरल आहे, परंतु विद्वेषपूर्ण नाही.
  • Do not worry about your difficulties in Mathematics. I can assure you mine are still greater.
    • भाषांतर: तुझ्या गणितातील समस्यांची काळजी करू नकोस. मी तुला खात्री देऊ शकतो की माझ्या (समस्या) अधिक आहेत.
  • Generations to come, it may well be, will scarce believe that such a man as this one ever in flesh and blood walked upon this Earth. (Referring to Mahatma Gandhi)
    • भाषांतर: भावी पिढ्या कशाबशा विश्वास ठेवतील की असा कोणी एक हाडामांसाचा माणूस पृथ्वीतलावर अस्तित्वात होता.
  • The most incomprehensible thing about the world is that it is at all comprehensible.
    • भाषांतर: या विश्वाविषयक सर्वात अनाकलनीय गोष्ट ही आहे की हे विश्व काही प्रमाणात का होईना पण आकलनीय आहे.
  • Life is like riding a bicycle. To keep your balance you must keep moving.
    • भाषांतर: आयुष्य हे दुचाकी चालविण्यासारखे आहे. तुमचा तोल सांभाळण्याकरता तुम्हाला पुढे जात राहीले पाहिजे.
  • I have no special talents. I am only passionately curious.
    • भाषांतर: माझ्याकडे कोणतीही विशेष प्रतिभा नाही. मी केवळ उत्कटतेने चौकस आहे.
  • Try to become not a man of success, but try rather to become a man of value.
    • भाषांतर: यशस्वी मनुष्य होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा उपयुक्त मनुष्य होण्याचा प्रयत्न करा.
  • That is simple my friend: because politics is more difficult than physics.
    • भाषांतर: ते सोपे आहे माझ्या मित्रा: कारण राजकारण हे भौतिकशास्त्रापेक्षा अवघड आहे.
  • Never memorize what you can look up in books.
    • भाषांतर: जे तुम्ही पुस्तकात पाहू शकता ते कधीही स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करू नका.
  • Education is what remains after one has forgotten everything he learned in school.
    • भाषांतर: शाळेत शिकलेले सगळे विसरल्यानंतर जे उरते ते शिक्षण.