ए.पी.जे. अब्दुल कलाम
Appearance
- आपले ध्येय साधण्याकरिता तुम्हाला त्या ध्येयावर लक्ष केन्द्रित करावे लागेल.
- शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो.
- F.A.I.L. चा अर्थ First Attempt In Learning (शिकण्यामध्ये प्रथम प्रयत्न) असाच आहे.
- कधी कधी वर्ग बुडवून मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले असते कारण आज मी मागे वळून बघतो तर मला माझे मार्क मला हसवत नाहीत पण आठवणी हसवतात.
- या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले आहे, ज्यांना ते यश मिळविण्याची अजिबातच शक्यता नसतांना देखील त्यांनी ते यश मिळविण्यासाठी, त्यांनी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवलेत.
- झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नसून स्वप्ने ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपू देत नाही.
- मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
- पाऊसात इतर पक्षी आसरा शोधत असतात पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो. समस्या एकच असते पण दृष्टिकोन वेगळा असतो.
- सक्रिय व्हा! जिम्मेदारी घ्या ! त्या गोष्टींवर काम करा ज्या वर तुम्हाला विश्वास आहे. जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली (समर्पित) करत आहात.
- काळा रंग हा अशुभ समजला जातो. पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थांचे आयुष्य उजलवत असतो.
- अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत.
- जी इच्छा मनातून आणि शुद्ध अंतकरणातून निघत असते व जे खूप तीव्र देखील असते, त्यात खूपच जास्ती सकारात्मक ऊर्जा समाविष्ट असते.
- आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थीती ह्या काही तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात, ते तर तुम्हाला तुमच्या मधील सुप्त क्षमता आणि ताकतीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या कि तुम्ही देखील खूप कठीण आहात.
- आत्मनिभारते मुळेच आत्मसम्मान मिळत असते याची आपल्याला जाणीव नसते.
- यशस्वी लोकांचे किंवा यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन आयडिया मिळतील.
- आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या दोन पाऊले पुढे असू.
- देवाने आपल्या सर्वांच्या मध्ये महान अशी शक्ती आणि क्षमता दिलेली असते. आणि प्रार्थना त्या शक्ती क्षमता ना बाहेर आणायला मदत करत असते.
- चला आपले आज आपण येणाऱ्या पिढीच्या उज्वल भविष्या साठी त्याग करू.
- जेंव्हा तुमची सही हि ऑटोग्राफ बनते तेंव्हा तुम्ही यशस्वी झालात समजा.
- त्रास हा यशाचा सार आहे.
- देशातील सर्वोत्तम डोके हे सर्वात शेवटच्या बाकावर सापडतात.
- विचार हे भांडवल, उदयोग हे मार्ग तर कठीण परिश्रम हे उत्तर आहे.
- समस्या आणि कठीण परिस्थिती हे देवाने आपल्याला मोठं बनण्यासाठी दिलेली संधी असते या वर माझा ठाम विश्वास आहे.
- स्वप्ने सत्यात उतरवण्या अगोदर प्रथम त्या तुम्हाला बघावे लागतील.
- तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलतील.
- मी हँडसम (देखणा) व्यक्ती नाहीये पण मी माझे हँड गरजू कोणीतरी (someone) ला मदत म्हणून देऊ शकतो. सुंदरता हि मनात असते तोंडावर नव्हे.
- आपल्या सर्वांमध्ये एकसमान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते.
- तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी, तुम्हाला एका मानाने ध्येया कडे समर्पित असायला हवे.
- आकाशा कडे बघा आपण एकटे अजिबात नाही. ससर्व भ्रमंड तुमचं मित्र आहे. पण ते भरभरून त्यालाच देते जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो.
- यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज असते.
- आयुष्य हा खूप अवघड खेळ आहे. तुम्हाला ते माणुसकीच्या जन्मसिद्ध हक्कानेच जिंकता येईल.
- तुमच्या सहभागा शिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही. आणि तुमच्या सहभागा सोबत तुम्ही कधी अपयशी होणार नाही.
- यशाचे रहस्य काय? योग्य निर्णय घेणे.योग्य निर्णय कशे घ्यावे?? अनुभवाने.अनुभव कशे घावे?? चुकीचे निर्णय घेऊन.
- तुमच्या नौकरी वर प्रेम करा पण कंपनी वर करू नका. कारण तुम्हाला कधीच कळणार नाही तुमची कंपनी तुम्हाला प्रेम करणे सोडून देईल.
- एखाद्याला हरवणे खूप सोप्पे आहे, पण त्याला जिंकणे खूप अवघड असते.
- इंगजी शब्द end चा अर्थ शेवट नसून तो “Effort Never Dies” म्हणजेच प्रयत्न कधीच वाया जात नाही असा होतो. तर NO म्हणजे नाही चा अर्थ “Next Opportunity” असा होत जो नवीन संधी असा होतो.
- तुमच्या पहिल्या यशा नंतर अजिबात थांबू नका कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर पहिले यश हे फक्त नशिबामुळे मिळाले हे बोलायला लोक तयारच असतात.
- जर तुम्हाला सुर्या सारखं चमकायचे असेल तर प्रथम त्याचा सारखं जाळावे लागेल.
- तुमच्या जीवनात कसले हि उतार चढाव आले तरी तुमचे विचार हेच तुमचे प्रमुख भांडवल असायला हवे.
- वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते जितके प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेले असते.