Jump to content

छत्रपती शिवाजीराजे भोसले

Wikiquote कडून
विकिक्वोट
विकिक्वोट
छत्रपती शिवाजीराजे भोसले हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा

छत्रपती शिवाजीराजे भोसले (फेब्रुवारी १९, १६३० - एप्रिल ३, १६८०) हे मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून सर्वत्र ओळखले जातात.

१ - जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत.

विचार

[संपादन]
  • स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
  • कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
  • सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.
  • एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.
  • कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.
  • ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही मातीचा गोळा वाटतो.
  • असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,खरी विरता विजयात आहे.
  • जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.
  • सर्वप्रथम राष्ट्र,नंतर गुरु,मग पालक, मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.
  • शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.
  • अंगात हवी रग… रक्तात हवी धग… छाती आपोआप फुगते…. एकदा जय शिवराय बोलून बघ
  • हे बघ भाऊ! महिलेची सुरक्षा असो किंवा आतंकवाद राजे असते तर परिस्थिती वेगळी असती.
  • ‘छत्रपती शिवराय’ हेच आमचे गुरु!
  • शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो.. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी..अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा
  • मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती.. तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’
  • जिथे शिवभक्त उभे राहतात.. तिथे बंद पडते भल्या भल्याची मती.. अरे मरणाची कुणाला भीती.. कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती
  • शूरता हा माझा आत्मा आहे… ‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे… क्षत्रिय हा माझा धर्म आहे… छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे… जय शिवराय
  • जाती धर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य
  • मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल. मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.
  • लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र.. एकाकी लढला होता.. भिनलेले बाळकडू रक्तात जिजाऊंनी शेर घडवला होता.
  • शिवबांचे रक्त आमचे, जन्म आमुचा या जातीचा.. रगारगात आमच्या माणुसकी… अभिमान आम्हाला मातीचा
  • पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात.पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे मराठेच असतात.
  • जातीपेक्षा मातीला.. अन् मातीपेक्षा जास्त आम्ही छत्रपतीला मानतो.
  • जिथे महाराजांचा घाम पडला, तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले…जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या.. तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला.
  • पुत्र जिजाऊंना झाला..पुत्र शहाजी राजेंना झाला…पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला.. माझा शिवबा जन्माला आला.
  • लोकं म्हणतात हे विश्व देवानं बनवलं आहे…पण मी म्हणतो….आम्हा मराठ्यांना छत्रपतींनी बनवले आहे.
  • दगडालाही पाझर फुटला वाराही शांत झाला…आणि 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ शिवबा जन्मला.
  • एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही…आमच्या राजाची शिकवण आहे… अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही.
  • जगणारे ते मावळे होते…जगवणारा तो महाराष्ट्र होता….स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेकडे मायेने हात फिरवणारा फक्त शिवबा होता.
  • स्वराज्यात पेटवून मशाली शौर्याची.. निघाले शिवबा नाश करण्या शत्रूंचा, लपला होता दुर्जन भगव्याच्या उडवला सडा…शिवबांनी त्याच्या रक्ताचा
  • असा एकच राजा मिळाला आहे या महाराष्ट्राच्या मातीला…. मावळा म्हणून शोधले त्यांनी अठरा पगड जातींना
  • कपाळी लावतो आम्ही भगवा गंध.. आम्हाला फक्त छत्रपतींचा छंद
  • तुझ्या किर्तीच्या कथांना आम्ही पुसलं केव्हाच….तुझ्या गडांचे दगड येऊन कधी तू वाच
  • लहानपणापासून असे संस्कार मिळाले आहे की, मंदिर आणि महाराज दिसले की, आपोआपच नतमस्तक होते.
  • ना चिंता ना भिती…ज्यांच्या मनात छत्रपतींची नीती
  • चांगल्या विचारांचा धर्म केला की, धर्माचा विचार उरत नाही…
  • ज्यांचे आदर्श महाराज आहेत. त्यांना लढायचे कसे हे शिकवावे लागत नाही.
  • जो जो शिवरायांच्या विचाराने पुढे जाईल… पुरा आसमंत त्याचा होईल.
  • भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही…भगवा म्हणजे सह्याद्री,भगवा म्हणजे स्वराज्य… भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती
  • माणसाने माणूस जोडावा हीच शिकवण आमच्या शिवबाची
  • प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस… सिहांसनाधीश्वर… योगीराज…श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
  • हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!
  • शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा.. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
  • झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा… गर्जा महाराष्ट्र माझा… जय शिवराय
  • ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची
  • झाले बहू .. होतील बहू… पण शिवरायांसारखा कोणीच नाही
  • सह्याद्रीच्या कडेकपारीतून केवळ एकच आवाज गुंजतो… तो म्हणजे छत्रपती
  • ना शिवशंकर…. ना कैलासपती… ना लंबोदर तो गणपती.. नतमस्तक तया चरणी .. ज्याने केली स्वराज्य निर्मिती… देव माझा तो राजा छत्रपती
  • सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
  • वैकुंठ रायगड केला… लोक देवगण बनला… शिवराज विष्णू झाला.. वंदन त्याला…
  • शौर्यवान योद्धा… शूरवीर… असा एकच राजा जन्मला …. तो आमुचा शिवबा
  • निश्चयाचा महामेरु… बहुत जनांसी आधारु…अखंड स्थिती निर्धारु श्री छत्रपती.
  • अतुलनीय… अलौकीक… अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती
जय भवानी.. जय शिवाजी!
  • छत्रपती आमचा मान तोची आमुचा सन्मान
  • औरंगजेबाचा कोथळा निधड्या छातीने काढला… तो शिवबा आमचा कितीही काळ लोटला तरी आम्हा रयतेचा शिवबाच राजा छत्रपति शिवराय’… शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाचीकाळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा “शिवसुर्य “…!!!!
  • प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी। .. जय शिवाजी, हर हर महादेव
  • विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.
  • ना शिवशंकर… तो कैलाशपती,ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,ज्याने केली स्वराज्य निर्मिती देव माझा एकच तो.. राजा शिवछत्रपती
  • मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली….जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली….नगारा वाजला, शाहिरी साज चढला..डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार….!!!!
  • मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार….इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत…….
  • दुर रहा पडु नका आमच्या फंदात..छत्रपति बाप आहे आमचा..सगळ्या जगला धाक आहे त्यांचा..खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा..
  • जाऊन बघा ती औरंग्याची कबर मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते चळाचळा..मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा..आरं अजूनही वेळगेली नाही बाळा..सांभाळुन राहाआम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा…
  • पुन्हा सुदूर पसरवू,महाराष्ट्राची कीर्ति ।शिवरायांची स्मरुन मुर्ती,शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।एकच ध्यास,जपू महाराष्ट्राची संस्कृती! शिवजयंतीच्या शुभेच्छा
  • निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अनमनात शिवतेजाची आग आहे…..भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,वर्तमानकाळ उलटा टांगून ,भविष्य घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक थेंबाकडून….त्रिवार मानाचा मुजरा…..
  • किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं…..पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं………आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं…..
  • काळजाने वाघ…डोळ्यात आग…छातित फौलाद…हि मराठ्याची औलाद…

बाह्यदुवे

[संपादन]