Jump to content

परिनिरीक्षण

Wikiquote कडून
विकिक्वोट
विकिक्वोट
Look up परिनिरीक्षण in
विकिपीडिया, the free marathi encyclopedia.
परिनिरीक्षण हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा


सेंसॉरशीप म्हणजे शासन नियुक्त अथवा स्वयंघोषित गटास संवेदनशील, आक्षेपार्ह अथवा धोकादायक किंवा गैरसोयीच्या वाटणाऱ्या संवादाचे, संभाषणाचे अथवा मजकुराचे दमन होय. सेंसॉरशीप या शब्दास मराठीत अभ्यवेक्षण अथवा परिनिरीक्षण असे पारिभाषिक शब्द योजले जातात. हा लेख विविध व्यक्तींची सेंसॉरशीप या विषयावरील अवतरणे उधृत करतो.

अवतरणे[संपादन]

पुस्तक जाळण्याचे एकापेक्षा अधिक मार्ग आहेत, आणि हे जग जळत्या आगकाड्या घेऊन पाळणाऱ्या लोकांनी भरलेले आहे. प्रत्येक अल्पसंख्यांक, मग तो... असा कुणीही असो, त्याला असे वाटते की, केरोसीन ओतून पेटवण्याची, ठिणगी लावण्याची इच्छाशक्ती, हक्क आणि कर्तव्य आपल्यापाशीच आहे. स्वतःला कंटाळवाणे, लापशीसारखा बेचव, सपक आणि शुष्क साहित्याचा स्त्रोत समजणारा प्रत्येक मूर्ख संपादक हा, कुजबुजण्यापेक्षा मोठ्या आवाजात बोलणार्‍या किंवा लहान मुलांच्या बडबड गीता पेक्षा अधीक लिहिणार्‍या प्रत्येक लेखकाच्या मानगुटावर नजर रोखून असतो आणि शीरच्छेदकरण्याचे यंत्र चाटून साफ ठेवतो. ~ Ray Bradbury
जर आपण तिरस्कृत लोकांकरीता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास ठेवत नसू, तर आपण त्यात आजीबात विश्वास करत नाही. ~ Noam Chomsky
संगीनीधारी सैनिक आणि दंडूका घेतलेल्या पोलिसांसमवेत उच्चस्थानीवर बसलेले हुकुमशहा तुम्ही पहात असता. पण त्यांच्या मनात न बोललेली- न बोलण्यासारखी! भिती असते. त्यांना शब्द आणि विचारांची भिती वाटते! परदेशात बोललेले शब्द, घरी घोंघावणारे विचार, अधिक शक्तिमान असतात कारण ते प्रतिबंधीत असतात. त्यांनी त्यांना घाबरे सुटते. एक छोटा उंदीर- एक छोटा उंदीर! विचारांच्या खोलीत शीरतो आणि मग प्रबळ सामर्थ्य्शाली सत्ताधीशांची सुद्धा घबराट उडते. ~ Winston Churchill
पुस्तक जाळणार्‍यांना सामील नका होऊ. ते कधी अस्तीत्वात होते याचा पुरावा दडवून तुम्ही ते विचार दडवू शकता असे समजू नका. ~ Dwight D. Eisenhower
सेंसॉरशीप म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखादे बाळ चावू शकत नाही म्हणून जेवणाचा तुकडा न देण्या सारखे आहे. ~ मार्क ट्वेन
Those whom books will hurt will not be proof against events. Events, not books, should be forbid. ~ Herman Melville
Military Censorship. That is a given in wartime, along with massive campaigns of deliberately-planted "Dis-information." That is routine behavior in Wartime — for all countries and all combatants — and it makes life difficult for people who value real news. ~ Hunter S. Thompson
An idea that is not dangerous is unworthy of being called an idea at all. ~ Oscar Wilde

 • " जेव्हा कुणालाच, 'कुणीही न-वाचणारी पुस्तके' सोडून 'इतर कोणतीही पुस्तके, वाचू दिली जात नाहीत', तेव्हा अभ्यवेक्षण (सेंसॉरशीप) तात्त्विक पूर्णत्वास येते " ~ जॉर्ज बर्नार्ड शॉ

 • "सद्य संकल्पनांना आणि संस्थात्मकतेला आव्हान देण्यापासून, कोणीही असला तरीही प्रतिबंधित करता यावे यासाठीच, सर्व अभ्यवेक्षण (सेंसॉरशीप) अस्तित्वात असतात. सर्व विकासाची रूजवत सद्य संकल्पनांना आव्हान देऊन आणि सद्य संस्थात्मकतेचा त्याग करून होत असते. परिणामी विकासाची पहिली अट अभ्यवेक्षणाचे निर्मुलन (removal of censorship) आहे. " ~ जॉर्ज बर्नार्ड शॉ


 • " समाजाचा स्वत:वरील विश्वासाचा अभाव अभ्यवेक्षणाद्वारे प्रतिबिंबित होतो. " ~ पॉटर स्टूवर्ट

 • " इंटरनेट सेसोरशिपला दोष समजते आणि त्याला वळसा घालून पुढे जाते. " ~ जॉन गील्मोर


 • पुस्तक जाळण्याचे एकापेक्षा अधिक मार्ग आहेत, आणि हे जग जळत्या आगकाड्या घेऊन पाळणाऱ्या लोकांनी भरलेले आहे. प्रत्येक अल्पसंख्यांक, मग तो....... असा कुणीही असो, त्याला असे वाटते की, केरोसीन ओतून पेटवण्याची, ठिणगी लावण्याची इच्छाशक्ती, हक्क आणि कर्तव्य आपल्यापाशीच आहे. स्वतःला कंटाळवाणे, लापशीसारखा बेचव, सपक आणि शुष्क साहित्याचा स्त्रोत समजणारा प्रत्येक मूर्ख संपादक हा, कुजबुजण्यापेक्षा मोठ्या आवाजात बोलणार्‍या किंवा लहान मुलांच्या बडबड गीता पेक्षा अधीक लिहिणार्‍या प्रत्येक लेखकाच्या मानगुटावर नजर रोखून असतो आणि शीरच्छेदकरण्याचे यंत्र चाटून साफ ठेवतो. ~ रे ब्रॅडबर्डी


 • " केवळ सहा आठवडे आधी, मला शोध लागला, गेली कित्येक वर्षे, बॅलंटाईन बूक्सच्या काही संकुचित संपादकांनी तरूण पिढी बिघडण्याच्या भितीने एकएक करून कादंबरीतील जवळपास ७५ उतारे सेंसॉर केले (वगळले). विद्यार्थ्यांनी, ती कादंबरी भविष्यातील सेंसॉरशीप आणि पुस्तक जाळण्याबद्दल होती हा कसा सर्वोत्तम विरोधाभास ते मला लिहून कळवले. या उन्हाळ्यात ज्युडी लीन डेल रे, हा नवीन बॅलेंताईन संपादक सर्व तथाकथित तिरस्कृत जागा पुन्हा भरून संपूर्ण पुस्तक पूर्वस्थितीत पुर्नप्रकाशित करत आहे." ~ रे ब्रॅडबरी


 • "संगीनीधारी सैनिक आणि दंडूका घेतलेल्या पोलिसांसमवेत उच्चस्थानीवर बसलेले हुकुमशहा तुम्ही पहात असता. पण त्यांच्या मनात न बोललेली- न बोलण्यासारखी! भिती असते. त्यांना शब्द आणि विचारांची भिती वाटते! परदेशात बोललेले शब्द, घरी घोंघावणारे विचार, अधिक शक्तिमान असतात कारण ते प्रतिबंधीत असतात. त्यांनी त्यांना घाबरे सुटते. एक छोटा उंदीर- एक छोटा उंदीर ! विचारांच्या खोलीत शीरतो आणि मग प्रबळ सामर्थ्य्शाली सत्ताधीशांची सुद्धा घबराट उडते. " ~ विन्स्टन चर्चील
 • " पुस्तक जाळणार्‍यांना सामील नका होऊ. ते कधी अस्तीत्वात होते याचा पुरावा दडवून, तुम्ही ते विचार दडवू शकता असे समजू नका. " ~ ड्वाईट आयसेनहॉवर

 • " जर मानवी शरीर अश्लील असेल तर त्याची तक्रार निर्मात्याकडे करा माझ्या कडे नको " ~ लॅरी फ्लिंट

 • " जे तात्पुरत्या सुरक्षेकरिता स्वतःचे स्वातंत्र्य घालवतात, ते 'ना स्वातंत्र्यास पात्र असतात, ना सुरक्षीतते करिता' " ~ बेंजामीन फ्रॅंकलीन


 • "If all printers were determined not to print anything till they were sure it would offend nobody, there would be very little printed."

---

 • "Our liberty depends on the freedom of the press, and that cannot be limited without being lost."

---

 • " पुस्तके प्रतिबंधीत राहू शकत नाहीत. ती जळत नाहीत. संकल्पना तुरूंगात जाऊ शकत नाहीत. इतिहासाच्या लांब प्रवासात सेंसॉर आणि inquisitor नेहमीच हरले आहेत. वाईट विचारांच्या (संकल्पनांच्या) विरूद्ध चांगले विचार (संकल्पना) हा एकच विश्वासार्ह मार्ग आहे. चांगल्या संकल्पनांचा(विचारांचा) स्रोत स्वातंत्र्य आहे. बुद्धीमत्तेचा विश्वासार्ह मार्ग मुक्त शिक्षण आहे. " ~ अल्फ्रेड व्हाईटनी ग्रीसवोल्ड

 • " जिथे त्यांनी पुस्तके जाळली, तिथे शेवटी ते माणसेही जळतील. " ~ हेन्रीच हेइन


 • " साहित्यासाठी सेन्सोरशिप तयार करणं ही पहिली गोष्ट असेल, आणि मग सेन्सोर जे चांगलं असेल ते स्वीकारेल, आणि जे वाईट असेल ते नाकारेल; आणि मग माता आणि दाया त्यांच्या मुलांना जे अधिकृत असेल तेच फक्त सांगतील, अशी आम्ही इच्छा ठेवू. " ~ प्लॅटो


 • " ...... यूद्ध्काळात केलेली (बातम्यांची सेंसॉरशीप), जाणीवपूर्वक पेरलेल्या "गैरमाहिती"चा भलामोठा प्रचार .... आता जे येत आहे ते पाहिले तर, विसाव्या शतकाचे शेवटचे अर्धशतक गर्भश्रीमंतमुलांची बेधुंद पार्टी वाटेल. युद्धकाळातील - सर्व देश आणि योद्ध्यांकरीता- हे सर्वसाधारण वर्तन असेल, पण ज्या लोकांना खर्‍या बातमीचे मुल्य समजते त्यांचे जीणे दुर्धर होते.

 • " सेंसॉरशीप म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखादे बाळ चावू शकत नाही म्हणून जेवणाचा तुकडा न देण्या सारखे आहे. "

 • " सत्य हे आहे की, वाचनालय माझे एखादे पुस्तक हद्दपार करते आणि आक्षेपार्ह भाग काढून न सुधारलेले बायबल त्याची जागा घेऊन असुरक्षीत तरूण आणि वयाच्या लोकांच्या हाती जाते तेव्हा खोलवर बेशुद्ध विरोधाभास मला राग आणत नाही प्रसन्न करतो. "


 • " तुमच्या गाळणीतून सुटणार्‍या अब्जावदी अश्लील संकेतस्थळांची काळजी करू नका, उपहास करणारी संकेतस्थळे हे तुमचे प्राथमिक लक्ष्य असले पाहिजे, ........ . मुलांवर लक्ष ठेवण्याची काळजी न घेणारे बेजबाबदार पालक तुम्हाला धन्यवाद देतील. "


 • "एकमेव वाईट अश्लील शब्द म्हणजे सेंसॉ्रशीप बोर्ड(FCC) होय"

 • " नितीमान किंवा अनितीमान अशी कोणतीही गोष्ट अस्तीत्वात नाही. पुस्तके चांगली लिहिलेली असतात किंवा खराब लिहिलेली असतात. एवढेच "

 • " जग ज्या पुस्तकांना अनितीमान म्हणते असते, कि जी जगास त्याची स्वत:चीच लज्जा दाखवत असतात.' "

 • " 'जी कल्पना धोकाधायक नसेल, ती कल्पना म्हणवण्याच्या लायकीचीच रहात नाही. "

 • " मुलांना हवे ते वाचू द्या त्यानंतर त्यांच्याशी त्या बद्दल चर्चा करा. जर पालक आणि मुले परस्परांशी संवाद साधू शकले तर आपल्याकडे तेवढी सेंसॉरशीप राहणार नाही कारण आपणास तेवढी भिती नसेल. "

 • " सेंसॉरशीप ? झक मारा " ~ थॉमस बॅकॉट

 • " हे सेंसॉर करा " ~ अनामिक

 • " आता जे पुस्तक जळतणावर आहे त्याची मला काळजी वाटत नाही. अशी पुस्तके की जी कधीच लिहीली जाणार नाहीत. जी पुस्तके कधी वाचलीच जाणार नाहीत. आणि सर्व सेंसॉरशीपच्या भितीने. नेहमी प्रमाणे, तरूण वाचकवर्गाचा यात खरा मोठा तोटा असणार आहे. " ~ ज्युडी ब्लूम

 • Wikipedia.com सर्व प्रकारच्या माहितीकरिताचा उत्कृष्ट स्रोत हा या पुढे सत्यास वाहीला आहे असे म्हणता येत नाही, कधी काळी तो होता असे गृहीत धरले तरीही.((रलेले भाषाम्तरीत करून हवे आहे.

भारतीय अथवा मराठी विचारवंत[संपादन]

जो जे वांछील तो ते लिहो[संपादन]

 • ... इतिहासाला पूर्णविराम ठाऊक नाही. आद्य शंकराचार्यांनी परमेश्वराला देखील 'गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी' असं म्हटलंय. या गतिमान जीवनात वाङ्मयसुद्धा प्रगतच होत रहाणार. तेव्हा नव्या प्रतिमा, नवे शब्द, नवे अविष्कार, नवे विषय आले, तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. त्यातलं अस्सल असेल तेच टिकेल. आणि बाकीचं कालाच्या प्रवाहात वाहून जाईल असा माझा ठाम विश्वास आहे. कारण निर्मळ मनाने वाचणाऱ्याला साहित्यात जीवनाचं दर्शन कुठे घडतंय आणि नुसतंच प्रदर्शन कुठे मांडलं गेलंय हे बरोबर कळतं. नव्या युगातल्या नव्या अनुभूतींचं दर्शन हे सौंदर्यासंबंधीच्या नितीविषयीच्या वगैरे जुन्या रुढ कल्पनांशी कधी कधी जुळणारं नसेलही. मग तसल्या लेखनाच्या आड आपल्या नितीमत्तेच्या संरक्षणाची सबब सांगून शासन येईल. विद्यापीठातले पोटार्थी प्राध्यापक आणि विकत घेतलेले पत्रकार त्यांना साथ देतील. म्हणून लेखक जर दुरितांचे तिमीर जावो या भावनेने त्याला जाणवलेले सत्य कलापूर्ण स्वरुपात मांडत असेल, तर 'जो जे वांछील तो ते लाहो' च्या ठिकाणी 'जो जे वांछील तो ते लिहो' अशी आपली धारणा पाहिजे. माणसाच्या सुकृती इतकीच माणासातली विकृती हे ही एक सत्य आहे. अश्या विकृतीची चित्रे साहित्यात आता ह्या विज्ञानयुगात येणं अपरिहार्य आहे. वैज्ञानिक बुद्धीला आपल्या चुका कबूल करायला संकोच वाटत नाही. पण जो जे वांछील तो ते लिहो म्हटल्यावर लगेच आपल्यापुढे माणसांच्या वासना चाळवणारे त्यांच्यातल्या द्वेषभावनांना प्रोत्साहन देणारे असे लिखाण उद्या अधिकाधिक प्रमाणात लिहिले गेले तर त्याचे काय करायचे? हा प्रश्न उभा राहिल ! हे लेखक समाज रसातळाला नेणारे लेखन करतील या भितीचा बागुलबुवा उभा करुनच सरकार सेंसॉर बोर्ड वगैरे स्थापन करीत असते. आणि संस्कृतीसंरक्षणाचा झेंडा घेऊन स्वत:ची संस्कृती तीच खरी संस्कृती असे मानणारे लोक अस्तन्या वर करुन पुढे सरसावतात. साहित्याने पिढी बिघडवण्याची भाषा तर प्रत्येक पिढीत चालू आहे. मार्क ट्वेन ह्या विनोदी लेखकाचे यंग टॉम सॉयर हे शाळकरी वयातल्या पोरांच्या खोडकर लिलांचे अतिशय मजेदार दर्शन घडविणारे पुस्तक आहे. ते वाचून मुले बिघडतील म्हणून अमेरिकेतल्या एक-दोन संस्थानांतल्या संस्कृतीसंरक्षक सरकारांनी त्यांच्यावर बंदी आणली होती. इंग्लिश संस्कृतीसंरक्षकांनी शॉ च्या पिग्मॅलियन नाटकात नुसता डॅम हा शब्द आल्यामुळे सगळी संस्कृती रसातळाला चालली आहे असे समजून नाटक करणाऱ्यांना किती छळले यावर एक ग्रंथ लिहिला गेला आहे. मराठी भाषेत एके काळी संततिनियमन हा शब्द मोठ्याने उच्चारायची भिती होती. त्यासाठी शकुंतलाबाई परांजपे आणि र. धो. कर्वे यांचा किती छळ झाला होता! आता प्राथमिक शाळांच्या भिंतीवर आतल्या बाजूने शिवाजी महाराजांचा फोटो असतो आणि बाहेरच्या बाजूला निरोधची सरकारी जाहिरात असते. म्हणजे एका बाजूला इतिहासाचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला भविष्य सुखाचा जावो म्हणून दिलेला सावधगिरीचा इशारा! आता छत्रपतींच्या मुळे मुलांच्यातली नुसतीच पूर्वजपूजा वाढेल म्हणून ती तसबीर काढून टाकायची की संततीप्रतिबंधक उपायांचे ज्ञान फार लवकर झाले तर पोरांची निती बिघडेल म्हणून जाहिरातीवर डांबर फासायचे? दोन्ही करण्याची आवश्यकता नाही. भिंतीच्या या दोन्ही बाजू सुबुद्धपणाने पहाता कशा येतील याची दृष्टी समजाला मिळणे हे इथे आवश्यक आहे.[१]
~ पु.ल. देशपांडे 'इचलकरंजी साहित्य संमेलन, १९७४: अध्यक्षीय भाषणातून
 • राहता राहिला प्रश्न तो स्वातंत्र्याचा स्वैराचार होण्याच्या शक्यतेचा. हा धोका नक्कीच आहे. हा धोका टाळण्यासाठी काही विषयांवर बंदी घालणे; काही भाषेस आक्षेप घेणे; एखाद्या संघटनेने दायित्व स्वीकारणे; एका सेन्सॉर बोर्डाने यासाठी काम करणे असे प्रकार आहेतच. तत्त्व म्हणून हे मान्य होण्यासारखे आहे. पण एकदा का हे तत्त्व म्हणून स्वीकार केले की कोठे थांबायचे हे समजू शकत नाही. ज्यांनी तत्त्व म्हणून हा विषय तारतम्याने मांडला ते कदाचित योग्य ती दिशा दाखवतील देखील. परंतु दुर्दैवाने बऱ्याचदा गोष्टी त्यांच्या हातात राहत नाहीत. वाघावर स्वार होता येते, पण उतरता येत नाही. अतिरेकी बंधने, सूत्रांचे कर्मठ अर्थ, फतवे यांच्यामध्ये हे मूळ तत्त्व गुरफटून जाते. टोकाच्या भूमिका लादणारे सत्यानाशच करून टाकतात असे दिसते. हिंदू धर्म यांस अपवाद राहील असा आशावाद, युक्तिवाद केला जातो. पण दुर्दैवाने तोही तितकासा खरा नाही. एकूणच नियंत्रणातून मिळणारे फायदे काही असलेच तर तुलनेने खूपच अल्पायुषी आहेत.[२]
~ एकलव्य (मनोगत (संस्थळ) प्रेषक रवि., १४/०५/२००६ - १७:४६)] page as seen on 29 June 2010

सोवळ्यातलं सेन्सॉर बोर्ड[संपादन]

जयंत पवार (महाराष्ट्र टाईम्स Aug 17, 2014, 12.00AM IST) [३]


 • जे लोकांना आवडणार नाही, आक्षेपार्ह वाटेल ते लोक बघणार नाहीत. पण त्या नाटकावरच बंदी आणा, असं सांगणारं सेन्सॉर बोर्ड कोण? ~ जयंत पवार


 • रंगभूमी ही पवित्र जागा असून तिचं मांगल्य जपलं पाहिजे, अशी चुकीची धारणा पूर्वापार नाटक करणाऱ्यांच्या मनात घर करून बसली आहे. वास्तविक कलेच्या क्षेत्रात मंगल, पवित्र या मूल्यांना काही थारा नाही. किंबहुना या मूल्यांच्या अतिरेकामुळे कलेच्या वाढीलाच धोका पोचतो. कला ही सत्याचा सौंदर्याच्या अंगाने शोध घेते. तिथे शिव या तत्त्वाचा उपयोग नसतो. पण हे न उमगल्याने (वा मान्य नसल्याने) अनेक सदस्य स्वयंघोषित नीतिरक्षक बनतात आणि 'मोराल पोलिसिंग' करू लागतात. त्यांना हा आपला सरकारदत्त अधिकार वाटतो आणि हट्टाग्रहातून येणाऱ्या गंडापायी ते नाट्यसंहितांवर कात्री चावलून आपल्या हिंसक कृतीचं समर्थन करत राहतात. यात अनेक कलावंत असतात, जे अडाणीपणातून कलेच्याच मुळावर येतात. याचा फटका नाट्यकृतीकडे गंभीरपणे पाहणाऱ्या लेखक-कलावंतांनाच होतो. ~ जयंत पवार


 • नाटकातली शिवराळ वा तथाकथित अशिष्ट भाषा सेन्सॉर बोर्डाला खटकत असेल तर बोर्डाच्या संवेदनशीलतेत आणि समजशक्तीत काहीतरी कमतरता आहे, असं समजायला हवं. प्रमाणभाषेची बंधनं झुगारून विविध समाजगट आपल्या अस्सल भाषेतून आपले अनुभव साहित्यातून, नाटक आणि चित्रपटातून व्यक्त करू लागल्यालाही आता बराच काळ झाला आहे. हे साहित्य आणि कला समाजही एका समजदारीने पचवतो आहे. ही भाषा व्यक्त करण्यामागची कळकळ, प्रामाणिकपणा आणि ती मांडणाऱ्याचा कलेमागचा हेतू तपासला पाहिजे. त्यात अस्सलपणा असेल तर कुठलीच गोष्ट कुणालाही खटकण्याचं प्रयोजनच उरत नाही. सर्वसाधारण समाजाला तो अनुभव, ती भाषा परकी असेल तर ती स्वीकारून प्रगल्भ होण्याची शहाणीव समाजापाशी असते, यावर विश्वास ठेवला पाहिजे. नाटक करणाऱ्याला त्याच्या भाषेत बोलू द्या, तुमचे आग्रह वा सक्ती त्याच्यावर लादू नका, असं आता सरकारनेच आपल्या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांना सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. ~ जयंत पवार

संदर्भ[संपादन]

 1. पु.ल. देशपांडे 'इचलकरंजी साहित्य संमेलन, १९७४: अध्यक्षीय भाषणातून
 2. manogat प्रेषक एकलव्य (रवि., १४/०५/२००६ - १७:४६) page as seen on 29 June 2010
 3. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/40317428.cms


विकिक्वोट
विकिक्वोट
Look up परिनिरीक्षण in
विकिपीडिया, the free marathi encyclopedia.
परिनिरीक्षण हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा

साचा:Wiktionary