बेंजामिन फ्रँकलिन
Appearance
बेंजामिन फ्रँकलिन (जानेवारी १७, १७०६ - एप्रिल १७, १७९०) हे एक अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी - असे बहुआयामी व्यक्ती होते.
- Three can keep a secret, if two of them are dead.
- तीन जणे गुपित राखू शकतात, त्यातील दोन मृत असतील तर.
- A countryman between two lawyers is like a fish between two cats.
- दोन वकिलांमधील एक खेडुत म्हणजे जणू दोन मांअजरितील एक मासोळी.
- Gods help those who help themselves.
- जे स्वतःची मदत करतात त्यांना देव मदत करतात.
- Little strokes fell great oaks.
- छोट्या प्रहारांनी मोठाले ओक वृक्ष पडतात.
- Beware of the young doctor and the old barber.
- तरूण वैद्य आणि वयस्कर न्हावी यांच्यापासून सावध रहा.
- Lost time is never found again.
- गेलेली वेळ पुन्हा कधीच (परत) येत नाही.
- घराला घरपण तेंव्हाच येते जेंव्हा त्यात शरीर आणि डोके दोघांसाठी खुराक असेल.
- वीसव्या वर्षात माणूस आपल्या इच्छे ने चालतो, तिसाव्या वर्षी तो बुद्धी ने तर चाळिसाव्या वर्षी अनुमान लावून चालतो.
- नवीन मित्र बनवण्याचा वेग कमी असू द्या, आणि मित्र बदलण्याचा वेग हा त्या पेक्षा कमी असू द्या.
- लहान सहान खर्चां पासून सावध राहा. कारण एक लहान छेद देखील मोठं जहाँज बडवू शकतो.
- अज्ञानी असण्या पेक्षा जास्ती शरमेची गोष्ट असते ती म्हणजे शिकण्याची इच्छा नसणे.
- तयारी करण्यात फेल होणे म्हणजे फेल होणासाठी केलेली तयारी समझा.
- निश्चित पणे या जगात सर्व काही अनिश्चित आहे, शिवाय मरण आणि कर.
- समाधान हे गरिबांना श्रीमंत बनवते तर असमाधान हे मोठा श्रीमंत माणसाला गरीब बनवते.
- ककर्जदारांची स्मरण शक्ती सावकारांपेक्षा चांगली असते.
- परिश्रमच चांगल्या नशिबाची जननी असते.
- एक तर असे लिहा जे वाचण्या लायक असेल किंवा असे काही तरी करा जे लिहण्या लायक असेल.
- काम करून थकणे हेच सर्वात चांगली उशी असते.
- देव देखील त्यांची मदत करतो जे स्वतः ची मदत स्वतः करतात.
- बऱ्याच वेळा अर्धवट-सत्य हे देखील मोठं खोटं असते.
- मासा असेल किंवा अतिथी तीन दिवसा नंतर वास मारायला सुरुवात करतात.
- ज्याचा कडे धैर्य असते त्याला जे हवे ते नक्की मिळत असते.