मिश्र
Appearance
नाचता येईना अंगण वाकडे
बुडत्याला काडीचा आधार
चकाकते ते सारेच सोने नसते
अंथरूण पाहून पाय पसरावे
अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये.
केव्हाच नाही त्यापेक्षा उशीर बरा
गरज सरो नि वैद्य मरो
वासरात लंगडी गाय शहाणी
उथळ पाण्याला खळखळाट फार
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
दिव्या खाली अंधार
आरोग्य हेच आश्चर्य
लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ती आरोग्य भेटे.
ऐकावे जनाचे,करावे मनाचे
दाम करी काम
नवी विटी नवे राज्य
गरज ही शोधाची जननी आहे
काट्या वाचून गुलाब नाही
दृष्टी आड सृष्टी
पेरावे तसे उगवते
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
चुकणे हा मानवाचा धर्म आहे
वराती मागून घोडे
एकी हेच बळ
आपण चिंतितो एक पण देवाच्या मनात भलतेच
बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ
बळी तो कान पिळी
चांगल्या कामाचा शुभारंभ स्वत:च्या घरापासून करावा.