Jump to content

सदस्य:कल्याणी अतुल शिवले

Wikiquote कडून
      क-अक्षरवरून म्हणी

कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली. कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी. कळते पण वळत नाही. कर नाही त्याला डर कशाला? संस्कृतपर्यायः -कर्तव्यदक्षस्य कुतो भयं स्यात्?

करावे तसे भरावे. संस्कृतपर्यायः - 1 यथा कर्म तथा फलम्।2 कर्मायत्तं फलं पुंसाम्।

करायला गेले नवस आज निघाली अवस. कशात काय अन फाटक्यात पाय. कण्हती कुथती, मलिद्याला उठती. कळंना ना वळंना, भाजी भाकरी गिळंना. करून गेला गाव आणि कांदळकराचे नाव. काळ आला होता पण वेळ नाही. काखेत कळसा गावाला वळसा. संस्कृतपर्यायः - कटीकलशमन्वेष्टुं नगरे भ्रमणं यथा।

कानामागून आली अन तिखट झाली काट्याने काटा काढावा. संस्कृतपर्यायः - 1 आयसैरायसं छेद्यम्। 2 कण्टकेन एव कण्टकम्।

कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी. संस्कृतपर्यायः -1 कार्यार्थी सर्वलोकोऽयम्।2 सङ्कटे व्यङ्कटेश:

कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. संस्कृतपर्यायः -न काकशापेन म्रियेत धेनु:।

कावळ्याचे दांत शोधण्यासारखे. काडीची नाही खबर म्हणे मी अकबर. काम ऩ धंदा, हरी गोविंदा. काम नाही घरी अन् सांडून भरी. कुडी तशी पुडी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. कुई म्हणलं तर कुल्ला कापीन. कुणी सरी घातली म्हणून आपण फास घेऊ नये./ दोरी घालू नये. कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा. कुठे इंद्राचा ऐरावत,अन् कुठे शामभट्टाची तट्टाणी? संस्कृतपर्यायः -क्व सूर्य: क्व च खद्योत:?

केवड्याचे दान वाटले आणि गावात नगारे वाजले. केल्याने होत आहे रे, म्हणून आधी केलेची पाहिजे. कोणाला कशाचं तर बोडकीला केसाचं. कोल्हा काकडीला राजी. संस्कृतपर्यायः -क्षुद्र: क्षुद्रेण तुष्यति।

कोळसा उगाळावा तितका काळाच. संस्कृतपर्यायः -न निम्बवृक्षो मधुरत्वमेति।

कोल्ह्याला द्राक्षे आंबट. संस्कृतपर्यायः - सत्यमेव जयते।

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. कंड भारी उड्या मारी. कंबरेच सोडला आणि डोक्याला बांधला. कुंभार तसा लोटा. संस्कृतपर्यायः - यथा बीजं तथाङ्कुर:।

कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही./सूर्य उगवायचा राहत नाही.