Jump to content

सदस्य:श्रीनिवास हेमाडे

Wikiquote कडून

नमस्कार मित्रहो , मी श्रीनिवास हेमाडे. व्यवसाय : तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक. नोकरीचा काळ : २५ वर्षे.

भाषा : मराठी, हिंदी, इंग्लिश.

विकिपीडियावर मी ऑगस्ट २०१५ पासून खऱ्या नावाने सदस्य झालो आहे.

यापूर्वी टोपणनावाने काही संपादने केली आहेत. ४७५ पेक्षा अधिक संपादने पूर्ण होत आहेत. मी सर्व सूचनांच्या स्वागतासाठी उत्सुक असेन.

तत्त्वज्ञान, धर्म, स्त्रीवाद, सौंदर्यशास्त्र, दलित अध्ययन, उच्चशिक्षण, माध्यमे, पत्रकारिता, नाटक, सिनेमा आणि इतर काही.

निजलें जग; कां आतां इतक्या तारा खिळल्या गगनाला । काय म्हणावें त्या देवाला ? -- वर जाउनि म्हण जा त्याला. ॥1॥

तेज रवीचें फुकट सांडते उजाड माळावर उघडया । उधळणूक ती बघवत नाही -- डोळे फोडुनि घेच गडया ॥2॥

हिरवी पानें उगाच केली झाडांवर इतकीं कां ही । मातिंत त्यांचे काय होतसें? -- मातिस मिळुनी जा पाही ! ॥3॥

पुराबरोबर फुकटावारी पाणी हें वाहुनि जात । काय करावें जीव तळमळे -- उडी टाक त्या पूरांत ॥4॥

ही जीवांची इतकी गरदी जगांत आहे का रास्त । भरत मूर्खांचीच होत ना ? एक तूंच होसी जास्त ॥ 5॥

देवा, तो विश्वसंसार राहूं द्या राहिला तरी । या चिन्तातुर जन्तूंना एकदां मुक्ति द्या परी ॥ 6॥

गोविंदाग्रज - राम गणेश गडकरी ०९-११-१९०७ पुणे.

प्रताधिकार मुक्त