Jump to content

समर्थ रामदास स्वामी

Wikiquote कडून

समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (एप्रिल, इ.स. १६०८, जांब, महाराष्ट्र - इ.स. १६८२, सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते.

विकिक्वोट
विकिक्वोट
समर्थ रामदास स्वामी हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा

१. आधी संसार करावा नेटका। मग घ्यावें परमार्थ-विवेका॥

२. मराठा तितुका मेळवावा। आपुला महारष्ट्रधर्म वाढवावा॥

३. जो दुसऱ्यावरी विश्वासला। त्याचा कार्यभाग बुडाला॥

४. आहे तितुकें जतन करावे। पुढें आणिक मिळवावें॥

५. धटासी आणावा धट। उद्धटासी पाहिजे उद्धट। खटनटासी खटनट। अगत्य करी"॥

६. धर्मासाठी मरावें। मरोनी अवघ्यांसी मारावें। मारितां मारितां घ्यावें। राज्य आपुलें॥

७. केल्याने होते आहे रे आधी केलेंचि पाहिजें॥

८. आधी केलें। मग सांगितलें॥

९. सामर्थ्य आहे चळवळीचें। जो जो करील तयाचें। परंतु तेथे भगवंताचें। आधिष्ठान पाहिजे॥

१०. देव मस्तकीं धरावा। अवघा हलकल्लोळ करावा। मुलुख बडवा कां बडवावा। धर्मसंस्थापनेसाठी॥

११.परमार्थ आहे तो राज्यधारी। परमार्थ नाही तो भिकारी।या परमार्थाची सरी। कोणास द्यावी ?॥

१२.इहलोक साधायाकारणें । जाणत्याची संगती धरणें । परलोक साधायाकारणें । सदगुरु पाहिजे॥

१३.जयांस आहे विचार । ते सुकासनीं जाले स्वार । इतर जवळील भार । वाहातचि मेले॥

१४.आयुष्य हेचि रत्नपेटी।माजी भजनरत्ने गोमटी।ईश्वरी अर्पूनिया, लुटी।आनंदाची करावी॥

१५.असत्याचा अभिमान । तेणें पाविजे पतन । ह्मणोनिया ज्ञाते जन । सत्य शोधिती॥

१६.जेणें संसारीं घातलें । आवघें ब्रह्मांड निर्माण केलें । त्यासी नाहीं वोळखिलें । तोचि पतित॥

१७.उपासनेचा मोठा आश्रयो। उपासनेविण निराश्रयो।उदंड केला तरी तो जयो। प्राप्त नाही॥

१८.जेणे परमार्थ ओळखिला।तेणे जन्म सार्थक केला।येर तो पापी जन्मला।कुलक्षया कारणे॥

१९.मीपणापासून सुटला । तोचि येक मुक्त जाला । मुका अथवा बोलिला । तरी तो मुकत॥

२०.नाहीं उपासनेचा आधार । तो परमार्थ निराधार । कर्मेविण अनाचार । भ्रष्ट होती॥

२१झाले साधनाचे फळ। संसार झाला सफळ। निर्गुण ब्रह्म ते निश्चळ। अंतरी बिंबले॥