चर्चा:उखाणे

Wikiquote कडून
Jump to navigation Jump to search

१) नागपंचमीच्या सणी सख्या पुजती वारुळाला


रावांविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला

2) निळया आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे लग्नाच्या दिवशी ----- स वाटे ----- रावांचे नाव घ्यावे

3) श्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान


रावांचे नाव घेते, राखते सर्वांचा मान

4) कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात


रावांचे नाव घेते माझ्या मनात

5) संथ वाहती गंगा, यमुना, आणि सरस्वती


रावांचे नाव हीच माझ्या प्रेमाची महती

6) जीवनात ही घडी अशीच राहू दे


रावांचे प्रीतफुल असेच हसु दे

7) शरदाचे चांदणे, मधुवनी फुले निशी़गंध


रावांचे नाव घेण्यात मला आहे आनंद

8) आला श्रावणमास, पाऊस पडला शेतात


रावांचे नाव घेते धनधान्यसंपन्न घरात

9) अंबाबाईच्या देवळासमोर ह्ळ्दीकुंकवाचा सडा


रावांच्या नावावर भरते लग्नचुडा

10) दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र


रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र

11) वरातीच्या मिरवणूकीत सनईचे करुण सूर


रावांच्या बरोबर जातांना मनात होते हूरहूर

12) सोन्याची घुंगरं, चांदीच्या वाळ्या सोनार घडवी दागिने ----- रावांच्या बाळाला

13) गोकुळात आला क्रुष्ण, सर्वांना झाला हर्ष


रावांच्या बाळाला लागले पहिले वर्ष

14) गुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज


रावांच्या बाळाची आज आहे मौंज

15) फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे


रावांच्या बाळाचे आज आहे बारसे

16) संसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल


रावांना लागली बाळाची चाहूल

17) मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा


रावांच्या संसारात लावीन दिप नवा

18) सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा


रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटा

19) थोर कुळांत जन्मले, सुसंस्कारात वाढले


रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले

20) दिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पंक्ती


रावांना ओवाळते मंगल आरती

नवरदेवासाठी उखाणे,Marathi Ukhane For Groom,अजून उखाणे पाहिजेल असतील तर क्लीक करा