म्हणी
'विद्वान माणसाची सर्वत्र पूजा केली जाते'
क वर्ग - क ख ग घ ङ
च वर्ग - च छ ज झ ञ
ट वर्ग - ट ठ ड ढ ण
त वर्ग - त थ द ध न
प वर्ग - प फ ब भ म
य वर्ग - य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ
म्हणी संपादित करणाऱ्यांना नम्र सूचना. वाक्प्रचार व म्हणींमध्ये फरक आहे. वाक्प्रचार वाक्प्रचारांच्या स्वतंत्र लेखात टाकावेत.
स्वर अ
[संपादन]- अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
- स्वतः च्या कृतीमुळे झालेल्या अडचणीसाठी दुसऱ्याला नावं ठेवणे . आपणच म्हशींवर बसून चाललोय तर म्हशीला बोलण्यात काय अर्थ की मला कुठे नेतेस !
- अचाट खाणे मसणात जाणे
- अतिरेक हा वाईटच , जसे भरपूर खाल्ल्यामुळे विविध आजार होऊन अखेर मृत्यू होतो .
- अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
- एखादी संशयास्पद वाईट घटना घडली कि त्याच्याशी संबंधित संशयित कुठेतरी घटनास्थळापासून लांब गेलेले असल्याचे कानावर येते ,पळवाटा काढण्यासाठी तीर्थक्षेत्री गेले आहेत अशा बातम्याही कानावर येतात.
- अडला हरी गाढवाचे पाय धरी.
संस्कृतपर्यायः - वहेदमित्रं स्कन्धेन यावत्कालविपर्यय:।
- शहाण्या माणसांनाही वेळप्रसंगी मुर्खांची मनधरणी करावी लागते. प्रसंगानुरूप वागावे.
- अडली गाय खाते काय.
- गायीला पिल्लू होताना असंख्य वेदना होत असतात अशावेळी ती तहानभूक हरवून बसलेली असते ह्याच अर्थाने एखादी व्यक्ती आधीच संकटात असेल तर त्या व्यक्तीला दैनंदिन गोष्टीत जसे खाणे ,पिणे ह्यात विशेष रस नसतो .
- अहो रूपम अहो ध्वनी.
एखाद्या व्यक्तीचे /प्राण्याचे सर्वच गुण वाखाणण्यासारखे असतात .
- अंधारात अत्तराचे दिवे लावणे.
- अति श्रीमंतीचा बडेजाव मिरवण्याच्या नादात मूळ गरजेकडे दुर्लक्ष होणे ,म्हणजे मूळ गरज अंधार नाहीसा करून दिव्याच्या माध्यमातून प्रकाश पसरवणे पण श्रीमंतीच्या दिखाव्याच्या नादात तेलाऐवजी अत्तर घातले तर ते दिवे कसे प्रकाश देतील ?
- अंगापेक्षा बोंगा जास्ती.
-बोंगा म्हणजे झगा किंवा कपडा . एखादा व्यक्ती स्वतः च्या शरीरापेक्षा , वजनापेक्षा मोठे कपडे घालून मिरवत असेल तर त्याला काय बोलणार ? स्वतःच्या कुवतीपेक्षा / कर्तुत्वापेक्षा मोठी जवाबदारी उचलणे .
- अती झालं अन् हसू आलं.
- कधीकधी सतत येणाऱ्या संकटांमुळे / दु:खामुळे माणूस प्रतिक्रिया देताना हसतो , किती रडणार ? किती शोक करणार ? देव तरी आपली आता किती परीक्षा बघणारे असा वाटून शेवटी जी परिस्थिती उदभवली आहे त्याला तोंड द्यायलाच हवं म्हणून हसणे .
- अती तेथे माती. संस्कृतपर्याय- अति सर्वत्र वर्जयेत् |
- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे वाईटच . कोणतीही सवयीचा / स्वभावाचा अतिरेक झाला तर त्याची निष्पत्ती वाईट गोष्टीतच होते .
- अति परिचयात अवज्ञा
. - एखादी व्यक्ती /प्राणी / वस्तू आपल्या जास्त संपर्कात आली तर हळूहळू आपल्याला त्यातील दोष जाणवायला लागतात आणि मग कधीतरी आपल्याकडून त्यांचा मान राखला जात नाही .
- अती राग भीक माग.
- रागीट व्यक्ती कितीही गुणी असल्या तरी त्यांच्या रागीट वर्तणूकीमुळे लोकं त्यांच्यापासून दूर जातात व दैनंदिन व्यवहार करतानाही त्यांना खूप अडचणींना तोंड द्यावे लागते . त्यांनी वेळीच रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे अन्यथा त्यांच्यावर वाईट वेळ येऊ शकते .
- अती शहाणा त्याचा बैल रिकामा.
- एखादा माणूस स्वतःच्याच बढाया मारत असेल किंवा स्वतःच स्वतःचे गोडवे गात असेल , तर जवळपासच्या व्यक्ती त्याच्यापासून चार हात लांबच राहतात . गावात नांगरणीसाठी किंवा प्रजननासाठी बैल मागण्याची जुनी पद्धत आहे पण स्वतः स्वतःची कौतुकं करण्याची सवय असेलेल्या माणसाकडे कोणीही मदतीसाठी किंवा कामासाठी संपर्क करत नाहीत .
- अंथरूण पाहून पाय पसरावे. संस्कृतपर्यायः - विभवानुरूपम् आभरणम्
- भोवतालची परिस्थितीचे भान ठेउनच आपल्या पुढच्या कामाचे नियोजन करावे . जर आपण झोपण्यासाठी घातलेली सतरंजी आखूड म्हणजे कमी लांबीची असेल तर आपले पाय झोपल्यावर जमिनीवर येतील हा शब्दशः अर्थ झाला .
- असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. संस्कृतपर्यायः - १. न मूर्खजनसम्पर्क: सुरेन्द्रभवनेष्वपि। २. पावको लोहसङ्गेन मुद्गरैरभिहन्यते।
- वाईट किंवा चुकीच्या माणसांच्या संगतीने आपलाच सर्वनाश ओढवू शकतो . हत्यार जवळ बाळगल्याने आपल्याला सुद्धा इजा होऊ शकते कारण हत्याराला समजत नाही कोण आपले कोण परके हे !
- असतील चाळ तर फिटतील काळ.
- सतत कष्ट करून मार्ग शोधण्याच्या प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीसमोर कोणतेही संकट फारकाळ टिकू शकत नाही .नेहमी योग्य मार्गाने विवेकाने वागणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातील वाईट काळही निघून जातो .
- असतील शिते तर जमतील भुते. संस्कृतपर्याय- द्रव्येण सर्वे वशा:।
- फुकटात मेजवान्या (पार्ट्या) देणाऱ्या व्यक्तीजवळ त्याचे पैसे संपेपर्यंत भरपूर लोभी लोकांचा गोतावळा असतो , एकदा पैसा अडका संपला कि हे कोणीही फुकटे मदतीला येत नाहीत .
- असतील फ़ळे तर होतील बिळे.
- एखाद्या झाडाला भरपूर फळे येत असतील तर त्या झाडाच्या जवळपास खूप प्राणी बिले करून किंवा घर करून राहतात . अशाच तऱ्हेने एखादी व्यक्ती जर खूप उपयोगाची आहे अस लोकांना जाणवलं तर त्या व्यक्तीचा फायदा घेणारे लोक त्याच्याशी जास्तीतजास्त संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात .
- असतील मुली तर पेटतील चुली.
- घरतील आया बहिणी , सुना मुलींच्यामुळे घरात नीटनेटकेपणाने अन्न शिजवले जाते, घरची नीट देखभाल केली जाते . स्त्रियांच्या बद्दल असणाऱ्या विविध गैरसमजुतीमुळे समाजात नवीन मुलगी जन्माला आली तर तिचं स्वागत होत नाही (स्त्री भृणहत्या)ह्या विषयावर लोकांची कान उघडणी करण्यासाठी हि म्हण वापरली जाते . स्त्रियांचा सुद्धा समाजबांधणीमध्ये पुरूषाइतकाच सहभाग आहे .
- असून अडचण नसून खोळंबा.
- एखादी गोष्ट /अवयव /माणसे आपल्या जास्त संपर्कात आली तर आपल्याला त्याची अडचण होते पण ते च नसेल तर आपल्याला त्यची कमतरता जाणवते . उदाहरणार्थ -(अवयव )आपला हात जेव्हा आपण कुशीवर झोपतो तेव्हा त्याच हाताची आपल्याला अडचण होते पण एखाद दिवशी तो हात न वापरता काम करायची ठरवली तर तसा करताना कितीतरी अडचणी येतात .(वस्तू )पैसे भरपूर असतील तर कुठे ठेवायचा प्रश्न पडतो व जवळ अजिबात पैसे नसतील तर सगळीच कामे अडतील . (माणूस )एखाद्या व्यक्तीचा समजा आपल्या आईच्या ओरडण्याचा आपल्याला कधीकधी खूप राग येतो पण आईच जवळ नसेल तर आपल्याला कितीतरी अडचणींना तोंड द्यावे लागते .
- असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
- जवळ असणाऱ्या व्यक्तींमधील तंटा /भांडणे मिटवावी आणि जे एकेमकांपासून लांब /दूर गेले आहेत त्यांना एकत्र आणावे
- असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.
- जर खरच मी देवावर नीट मनापासून भक्ती केली असेल तर मी जिथे आहे तिथे तो देव माझ्यासाठी सगळ निर्माण करेल . कधीतरी अतिशयोक्ती मध्ये हे म्हण वापरली जाते . देवावर असलेल्या असीम भक्तीपायी देव सुद्धा भक्तासाठी मदतीला धावून आल्याची उदाहरणेदेखील आहेत.
- अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य.
- अवघड जागी म्हणजे सर्वसाधारणपणे जे अवयव आपण झाकून ठेवतो तिथे जखम असेल आणि वैद्य म्हणून जावई ( परिचित असूनही परका )असेल तर अडचण सांगताना अवघडलेपण येईल अशा अर्थाने म्हण . आपल्या अडचणी ज्या आपण कोणाला बोलून दाखवू शकत नाही त्याचा इलाज करायला आपल्याच परिचयातील व्यक्तीची मदत घेताना काय अवस्था होईल ह्याची कल्पना सुद्धा करणे कठीण आहे .
- अती झाले मसणात गेले.
- एखाद्या दुःखाचा अतिरेक झाला कि त्या अडचणीबाबत वाटणारी सहानभूती सुद्धा कधीतरी संपून जाते .दुःखाची जाणीवही संपून जाते .
- अंगावरचे लेणे , जन्मभर देणे
- कोणतीही वस्तू नवीन विकत घेतली तर त्यची जपणूक व देखभालीसाठी बराच पैसा खर्च होत असतो मात्र हे बर्याचवेळा आपल्या नंतर लक्षात येते . उदाहरणार्थ समजा कोणी नवीन वाहन विकत घेतले तर त्यासाठी लागणारे इंधन , दुरुस्ती असे अनेक खर्च त्याबरोबर वाढत जातात . वाहन नसते तेव्हा आपला खर्च कमी असतो त्यापेक्षा वाहन घेतल्यावर जास्त खर्च येतो असेही अनेकदा लक्षात येते .
- अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ.
- अंगात पुरेसे त्राण नसताना कोणाची तरी खोडी काढण्यासाठी (चिडवण्याच्या उद्देशाने) एखाद्या सुदृढ व्यक्तीला चिमटा काढायचा आणि तो पकडेल आणि मारेल म्हणून लांब पळण्याचा प्रयत्न केला तर अंगात बळ नसलेला माणूस सुदृढ माणसापेक्षा किती लांबवर पळू शकेल ?
- अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
- शाब्दिक अर्थ घेताना आपल्या अंगाला खाज यायला लागली तर लोकांसमोर आपण काय कृती करतो ह्याचा संयम राहत नाही . एखाद्या चुकीच्या गोष्टीची सवय लागली तर पुढे लोकं काय म्हणतील ह्याचा विचार केला जात नाही .चुकीच्या गोष्टींचेही समर्थन करायची सवय लागते .
- अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
- एखादे संकट / काम अचानक अंगावर आले तर अंगातील सगळ बळ,शक्ती वापरून त्या संकटाचा सामना करायला हवा .
- अंधळं दळतं आणि कुत्र पीठ खातं.
- आंधळा माणूस धान्य दळत असेल आणि जवळ बसलेला कुत्रा ते पीठ खात असेल तर त्या कुत्र्याला ओरडणार कोण ? आंधळ्या व्यक्तीमुळे कुत्र्याचा फायदाच होतो . असंच समाजात उच्च पदावरील व्यक्तीला आपली जवाबदारी समजत नसेल तर हाताखालची लोकं त्याचा अवास्तव फायदा घेताना दिसतात .
- अंधारात केले पण उजेडात आले.
- एखादे कृत्य / गुन्हा अंधारात लपवून केले तरी कधीतरी ते उघडकीस येतेच .
- अंधेर नगरी चौपट राजा.
- एखाद्या नगरावर पूर्णपणे काळोख पसरला आहे आणि राजा त्या अडचणीत अजून भर टाकताना कोणतेतरी आचरट हुकुम देतो ज्यामुळे प्रजा अजून बेजार होते अशी अवस्था . आधीच एक संकट असताना उगाच अजून जास्त अडचणींचा समान करावा लागणे .
- अक्कलखाती जमा.
- एखादी गोष्ट नवीन शिकताना काही नुकसान झाले तर ते सोडून द्यावे . कोणतीही गोष्ट मिळवताना त्याच मोल द्यावं लागते , एखादी चूक झाली तर अक्कल मिळवण्यासाठी एवढ मोल दिले असे मानावे .
- अक्कल नाही काडीची नाव सहस्रबुद्धे.
- एखाद्या व्यक्तीचे आडनाव सहस्रबुद्धे आहे ज्याचा अर्थ हजार व्यक्तीच्या एवढी बुद्धीमत्ता असलेला , पण प्रत्यक्षात त्याला अजिबात अक्कल नाही अशा प्रसंगात नाव किंवा आडनावाचा अर्थ व विरुद्ध वागणूक / सवयी असणे . गंमत करताना एकमेकांना चिडवण्यासाठी कोणत्याही थराला जाणे . (सहस्रबुद्धे आडनावाच्या कितीतरी हुशार व्यक्ती समाजात आहेत . चिडवताना आपल बोलण कोणाच्या जिव्हारी लागत नाही ना ! ह्याची अवश्य काळजी घ्यावी .
- अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
- किशोर वयातील मुलीना पुढे येणाऱ्या संसारातील अडचणींची कल्पना नसते त्यांना फक्त वरवरचे दिखावा आकर्षक वाटत असतो . तिचा तो वेडा हट्ट पूर्ण करायचा तर वडिलांना त्यातील धोके जाणवत असतात . अशा वेळेस तिची समजूत घालताना थोडंसं चिडून घरचे तिला सांगत असतात .
- अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
- घरोघरी पुरुष बायकोशी बोलताना हेच म्हणतात कि जे काही सगळ आहे ते तुझंच आहे , पण प्रत्यक्षात मात्र सगळे व्यवहार बऱ्याचदा पुरुषांच्या मताप्रमाणेच होताना दिसते . असो , नवीन काळानुसार संदर्भ बदललेले सुद्धा आढळतात .संसाराची गोडी दोन चाकांवर चलते दोन्हीही तितकीच महत्वाची . मजेमजेत बोलतानाच्या म्हणीपैकी एक हि आहे .
- अघळ पघळ अन घाल गोंधळ.
- प्रत्येकाचं म्हणणे ऐकून त्या नुसार बदल करणे , काटेकोर नियोजन नसणे , समस्यांवर साजेसे उपाय न शोधणे अशा वागण्यातील कमतरतेमुळे कामाचा गोंधळ उडू शकतो .
- अठरा विश्व दारिद्र्य तर त्याला छत्तीस कोटी उपाय.
- पिढ्यानपिढ्या भरपूर गरिबी असेल तर त्या घरातील व्यक्तींनी मिळून केलेले व्यवसाय /शोधलेले उपाय मोजायचे ठरवले तर ते अगणित असतील . गरिबी दूर करण्यासाठी माणूस हरतऱ्हेचे प्रयत्न करून बघतो .
- अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
- अडाणी किंवा मूर्ख माणूस काय आज्ञा देईल ह्याचा काही भरवसा नाही त्याला गाडी फिरवायची हौस आली म्हणून तो हेही सांगू शकेल कि जरा वाटेत येणारी शेते जराशी बाजूला सरकवून ठेवा .
- अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
- एखादी मूल्यवान वस्तू / गोष्ट आपल्या हातून हरवली तर ती ज्याला मिळते त्यला त्य्पासून अचानक फायदा होतोच . एखाद्या अडाणी माणसाने भरपूर कष्ट करून जंगलातून लाकडे जमवून त्याची मोळी बनवली व ती गप्पांच्या नादात / इतर धुंदीत वाटेत विसरल्यामुळे ती मोळी जायला मिळते त्यला कष्ट न करताही फायदा मिळतो .
- अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
- खोटेपणा करताना छोटीशी देवीची मूर्ती थाळीत ठेवायची तिला पिंजर / कुंकू , हळद लावून ठेवायचं , थोडी पुढ्यात नाणी ठेवायची असे बनावटी भक्त फिरताना आपण सर्रास बघतो . पैशांसाठी देवाचा असा वापर करणारे तेवढे विश्वासार्ह असतात का ?
- अढीच्या दिढी सावकाराची सढी.
- गावातील सावकार गरीब लोकांना आर्थिक हिशोब न समजल्यामुळे कसा फायदा घेतो . मुळ रकमेच्या अडीचपट , तीनपट इ. चढ्या भावाने व्याजदर लावून दामदुपटीने वसुली करतो व स्वत: श्रीमंत होतो , गरीब बिचारा सावकाराचा कर्ज फेडताना देशोधडीला लागतो .
- अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
- गावातील लोकांच्या नानातऱ्हा , वागणे , समस्या , अपराध माफ करून/ बघून / ऐकून बिचाऱ्या देवाचे सुद्धा पोट भरून जात असेल आणि एवढ्या सगळ्यांच्या गोष्टी पोटात साठवताना देवाचं पोट सुद्धा फुगत असेल . बरेच जण आपली छोटी मोठी सुखं दु:ख देवाला हक्काने सांगतात , तो बिचारा पोटात साठवून घेईल सगळ आणि करतोच काय ?
- अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
- मोठ पद मिळालं किंवा प्रसिद्धी मिळाली कि भलेभले सदगृहस्थ सुद्धा क्षणिक मोहाला /मायेला बळी पडतात हा अनुभव खरा आहे .
- अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
- कोणत्याही गोष्ट / काम पूर्णत्वास नेताना काही ठरविक साच्यातील अनुभवांना /टप्प्यांना सामोरे जावे लागते . जसे तोंडातून चावल्याशिवाय इतर कोणत्याही मार्गाने आपण नेहमी अन्नग्रहण करू शकत नाही .
- अपयश हे मरणाहून वोखटे.
- अपयशी माणसाचे दु:ख हे खूप बोचरे असते कधीकधी या यातनांपेक्षा मरण सोपं असेल , असे नको ते विचारही मनात येऊन जातात . अशा वेळी खंबीरपणे अपयशाला मात देऊन पुढे जावे.
- अपापाचा माल गपापा.
- एका व्यक्तीच्या मालकीची वस्तू दुसऱ्याने पहिल्या व्यक्तीच्या सहमतीशिवाय परस्पर दुसऱ्याला विकून टाकणे व त्यातून मिळालेल्या संपत्तीचा यथेच्छ उपभोग घेणे / त्यावर मजा मारणे .
- अपुऱ्या घड्याला डबडब फार.
- घडा म्हणजे मातीचं मडके तो जर रिकामा असेल किंवा कमी भरलेला असेल आणि तो बाहेरून टिचकी देऊन वाजवला तर जास्त आवाज येतो ,तेच मडके जर भरलेले असेल तर त्याचा आवाज छोटा येतो . त्याप्रमाणेच ज्या माणसांना व्यावहारिक बुद्धिमत्ता कमी असते ती व्यक्ती स्वत:चे गुणगान स्वत:च करत असताना दिसते .
- अप्पा मारी गप्पा.
- एखाद्या व्यक्तीचा वेळ जात नसेल किंवा दुसरे काही काम नसेल तर मोठेपणा दाखवून मोठमोठ्या गप्पा मारणारी मंडळी आपल्या आजूबाजूला आढळतात .
- अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
- अर्धवट माहितीमुळे केलेली वाटणी मुर्खपणाचीच असते . कोंबडीची समान वाटणी करायची असा ठरवल्यावर अर्धी कोंबडी खायला ठेऊन अर्ध्या कोंबडीने अंडी द्यावी म्हणून तिची मागची बाजू ठेऊन देणे असा विचारही करणे म्हणजे शुद्ध मूर्खपणाचे लक्षण आहे .
- अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
- एखाद्या विषयाची /गोष्टीची सखोल माहिती नसतना फक्त त्या घटनेच्या वेळेस हजर आहोत म्हणून बरोबरीचा हक्क सांगणे .
- अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
- छोट्याश्या हुशारीचा गर्व होऊन त्याचा बडेजाव मिरवणे .
- अल्प बुध्दी, बहु गर्वी.
- पुस्तकी बुद्धिमत्ता पुष्कळ असेल आणि अनुभवातून येणारे व्यावहारिक शहाणपण नसेल तर त्या व्यक्तीला आपल्या छोट्याश्या बुद्धिमत्तेचा गर्व होतो , हळूहळू इतरांमधील बुद्धिमत्ता जाणवायला लागली कि गर्व गळून पडतो .
- अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
- चहापेक्षा किटली गरम असते त्याप्रमाणे लहान वयात अधिक राग येतो पण मनुष्य विचारी झाला कि त्याच्या रागावर तो नियंत्रण मिळवतो.
- अळवाची खाज़ अळवाला ठाऊक.
- फरसाण विकतात त्या दुकानात मिळते ती अळूवडी ज्या पानापासून बनते ते अळूचे पान . त्या पानामध्ये असलेल्या रासायनिक पदार्थांमुळे अळू चिरल्यावर त्वचेला खाज येणे किंवा खाल्ल्यावर घशात खवखवणे असं होऊ शकते . ह्या म्हणीचा शब्दशः अर्थ घेताना अळू खाणाऱ्या/ बनवणाऱ्या व्यक्तीला जशी खाज येते तसं प्रत्यक्ष अळूच्या झाडाला काय त्रास होत असेल हे कोण सांगेल ? थोडक्यात ज्याचं दु:ख त्यालाच ठाऊक .
- अळी मिळी गुपचिळी.
- कधीकधी सगळ्यांनी मिळून एखाद्या गोष्टीवर अधिक चर्चा न करणे किंवा समस्या विकोपाला जाऊ नये म्हणून गाजावाजा न होऊ देणे . एकमेकांच्या सहमतीने एखादी गोष्ट/बातमी/माहिती लपवून ठेवणे .
- अव्हढासा पोर, घर राखण्यात थोर..
- एखादी व्यक्ती वयाने,अनुभवाने लहान असूनही कधीकधी मोठ्या जवाबदाऱ्या पेलताना आढळते .
- असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
- पैसे असतील तर भरपूर खर्च करायचा नाहीतर पैसे नाहीत म्हणून सगळ्यांना स्पष्टपणे सांगत सुटायचे .(शिमगा /होळी च्या दिवशी होळी पेटवल्यावर कोणाच्याही नावाने मस्करी करत मोठमोठ्याने बोंबा मारायची पद्धत आहे .तिथे स्पष्ट बोलण्याचा कोणी राग मनात नाही.)
- असेल दाम तर होईल काम.
- कोणत्याही गोष्टीचे काम करण्याचा योग्य मोबदला दिला कि कोणतीही कामे चटकन होतात .
- अकिती आणि सणाची निचिती.
- वसंतऋतु मध्ये सगळीकडे फळ, भाज्या, धान्य विपुल प्रमाणात उपलब्ध असते , त्यानंतर अक्षय तृतीया येते.पूर्वी ग्रामीण भागात अक्षय तृतीया नंतर सणांची खऱ्या अर्थाने सुरुवात व्हायची.अक्षय तृतीयेला बोलीभाषेत आखिती /अकिती म्हणतात. त्यामुळे आकिती नंतर सणांची निश्चिती असे या म्हणीतून म्हणायचे असावे.
- अन्नछत्रे जेवणे, मिरपूड मागणे.
- गरिबाने श्रीमंती चोचले करू नये.
- अकलेहून विद्या जास्ती ओझ्याप्रमाणें वाढती.
- कुवती पेक्षा जास्त मिळालेलं शहाणपण वापरता येत नाही.
- अकृत्रिमता ती सत्याची माता.
- नैसर्गिक वागणे म्हणजे सत्य
- अकृत्रिम मित्रभाव तो जाणा उत्तम स्वभाव.
-
- अक्कल बडी का लक्ष्मी बडी.
-
- अकाळीं जें करणें, तें सर्व विपरीत होणें.'
- जर गोष्टी वेळेवर केल्या नाहीत तर त्याचे परिणाम चांगले होत नाहीत
- अकाळीं जें फळ येतें तें लौकर गळून पडतें.
-
- अग्नि काड्यांनी पेटतो, मोठ्या लाकडे विझतो.
-
- अग्नि ज्वाळेवांचून, तैशी उत्कंठा ज्ञानावीण.
-
- अग्नि न विझे कापसानें, क्रोध न शमे क्रूर भाषणें.
-
- अग्नी सारखा प्राणी, शत्रुमित्र न जाणी.
- अडचणीच्या कामांत पडतो तो आपला.
- जी व्यक्ती कठीण समयी आपल्याला मदत करते ती आपली आहे म्हणजेच आपली हितचिंतक आहे.
- अडेलपण हट्टीपण अल्पबुद्धीचे लक्षण.
- अतिशय शोक अवकाशानें मारतो, अकस्मात् हर्ष त्वरित प्राण घेतो.
- अतिशय शोक करणें देह मनाचा नाश होणें.
-अति विचार करणे, चिंता करणे, मानसिक त्रास करून घेणे हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. त्यानी आपली हानी होते.
- अति राग भीक माग, त्याहून राग देशत्याग.
- अति सर्व कोणतेही उपयोगी पडत नाही.
-कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. उ.दा :कितीही रुचकर जेवण असले तरी जर अति प्रमाणात जेवलो तर अजीर्ण होते म्हणजेच शरीरास त्याचा त्रास होतो.
- अनुभव आपला आपण घ्यावा त्यापेक्षा दुसऱ्याचा पाहून शिकावा.
- अनुभवाची साउली, तीच विद्येची माउली.
- अनुभवानुसार, चातुर्य तें वाढतें फार.
- अनेक लहान, होती महान.
- अपराध आणि वयोमिती, सर्व थोडीच सांगती.
- अपराध कबूल केला, म्हणून अर्धा दोष गेला.
- अपराध नसतां काही, क्षमेचे कारण नाहीं.
- अपराधाची क्षमा करी, मनांतले न जाय तरी.
- अपराधाच्या ओळी, नाही दिसत कपाळीं.
- अपराधीं सूड न घेणें, त्वरित क्षमा करणें.
- अपराध्यास नाही शासन हेच त्यास आश्वासन.
- अपराध्यास शासन हेच दुसऱ्यास शिक्षण.
- अपाय करून घेणें, मग उपाय शोधणें.
- अपायीं उपाय करावा, त्यापेक्षा तो होऊ न द्यावा.
- अभिमान आणि अज्ञान, तरुणपणी नासाडी जाण.
- अल्प अपराध जरी घडे, केल्या चाकरीवर पाणी पडे.
- अल्प बुद्धी, मोठ्या मसलती, अर्थात करणारे फसती.
- अल्प ज्ञानी, मूर्खांत मोठा मानी.
- अवकाश नाही मला, निमित्त हे सांगण्याला.
- अंगी न लागे चोरीचा ठाव तोवरी चोर दिसे साव.
....................................................................................................
स्वर आ
[संपादन]- आईचा काळ बायकोचा मवाळ.
- लग्न झालेल्या पुरुषाला स्वत: च्या आईतील दोष जाणवतात व बायकोच्या स्वभावातील गुण दिसतात . आपल्या आयुष्यात नवीन माणूस आला कि आपल्याला त्या व्यक्तीचे गुण जास्त जाणवतात व जुन्या सहवासातील व्यक्तीचे दोष जास्त जाणवत राहतात . (प्रत्येक माणूस हा गुण व दोष याचं मिश्रण असतो ,कोणीही पूर्ण बरोबर नव्हे किंवा कोणीही पूर्ण चूक नव्हे .)
- आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. संस्कृतपर्याय-क्व रोग: क्व च भेषजम्?
- एखाद्या ठिकाणी दुर्घटना घडली आणि मदतीचे पथक पत्ता शोधताना चुकले आणि दुसऱ्याच ठिकाणी पोहोचले तर काय होईल ? जिथे अपाय झाला आहे तिथे त्या जागेवरच उपाय झाला पाहिजे .
- आचार भ्रष्टी सदा कष्टी.
- एखाद्या व्यक्तीने / आपण जर एखादी चुकीची गोष्ट केली असेल तर त्याच /आपल अंतर्मन त्याला / आपल्याला सतत जाणीव करून देत असतं ,त्या व्यक्तीच्या /आपल्या मनाला शांतता नसते .
- आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली .
- उच्च नीच / गरीब श्रीमंत /देखणा कुरूप इत्यादी भेदभावाचा अनुभव जीवन जगत असताना आपल्याला येतो पण प्रत्यक्ष परमेश्वराच्या दरबारात जन्म मृत्यू च्या बाबतीत कोणताही भेदभाव नसतो .प्रत्येक जण देवाघरी जाताना लाकडाच्या सरणावर जातो .
- आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार. संस्कृतपर्याय-कूपे नास्ति कुत: कूप्याम्?
- जर विहिरीत ( आडात ) च पाणी नसेल तर ( पोहऱ्यात ) पाणी काढण्यासाठी विहिरीत टाकलेल्या / रहाटाला जोडलेल्या भांड्यात पाणी कुठून येईल ? जसा प्रत्येक माणूस उत्तम चित्रकार /गायक होऊ शकत नाही ,उत्तमता येण्यासाठी मुळात तो गुण आपल्यामध्ये असावा लागतो . जर एखादा गुण असेल तर योग्य प्रशिक्षण व मेहनतीने त्य उत्तमता गाठू शकतो .
- आयजीच्या जीवावर बायजी उदार .
- एखाद्या व्यक्तीने मिळवलेली विद्वत्ता /संपत्ती / मिळकतीवर दुसऱ्याच व्यक्तीने त्या इतरांना वाटून त्याबद्दलचा मोबदला / श्रेय मिळवले तर ! एकाच्या मेहनतीवर दुसरा व्यक्ती मजा मारत असेल अशी परिस्थिती निर्माण होणे .
- आधी शिदोरी मग जेजूरी.
- प्रत्येकाने आधी आपापल्या कुटुंबासाठी , चरितार्थासाठी पैसे कमवायला हवे .आपल्या घरातील /जवळच्या व्यक्तीच्या दैनंदिन गरजा पूर्ण करून मगच तीर्थयात्रा किंवा बाहेर देवदर्शनासाठी वेळ द्यावा .
- आधी पोटोबा मग विठोबा. संस्कृतपर्यायः - उदरार्चामनु वेदे चर्चा
- प्रत्येकाने आधी आपापल्या कुटुंबासाठी , चरितार्थासाठी पैसे कमवायला हवे .आपल्या घरातील /जवळच्या व्यक्तीच्या दैनंदिन गरजा पूर्ण करून मगच देवदर्शनासाठी वेळ द्यावा .
- आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास.
- एखाद्या माणसाला मुळातच नवीन काम सुरु करायचा उत्साह नसेल आणि त्या वेळी त्याने चांगली वेळ , महुर्त बघून काम सुरु करायचं म्हटलं , तर फाल्गुन म्हणजे मराठी शेवटच्या महिन्यापासून कशाला सुरुवात करायची ? नवीन वर्ष सुरु झाल कि चैत्र महिन्यापासून सुरवात करू असे मनात वाटेल . थोडक्यात चालढकल करण्याची वृत्ती असल्याने काम लगेच न करता काहीतरी कारणे शोधून ते पुढे ढकलणे किंवा ढकलावे लागले अशी परिस्थिती निर्माण होणे .
- आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
- स्वत: कष्ट केल्याशिवाय आपल्याला स्वर्गसुख मिळत नाही . स्वत:च्या कर्तुत्वाने , मेहनतीने मिळवलेले शंभर रुपये सुद्धा लाखमोलाचे असतात .
- आपला तो बाळू /बाब्या, दुसऱ्याचा तो कार्टा.
- एकच चूक दोन मुलांनी केली असेल तरी आपण आपल्या मुलाची चूक नाही असे मानून दुसऱ्याच्या मुलाला बोल लावतो , भरपूर नावे ठेवतो .
- आपला हात जगन्नाथ. संस्कृतपर्यायः - 1 आत्मायत्तौ वृद्धिविनाशौ। 2 आत्मैव ह्यात्मनो बन्धु:
- कोणत्याही कामाची सुरुवात आपल्यापासूनच करावी , बाहेरून मदत मिळेल म्हणून वाट बघत बसू नये . कोणतेही काम छोटे नसते , आपणच आपली मदत करायची असते . परमेश्वर आपल्यातच आहे ह्यावर विश्वास ठेवावा . आपले हात म्हणजे देवाचेच हात आहेत असं मानून मनोभावे कामाला सुरुवात करायची .
- आपलेच दात आणि आपलेच ओठ.
- आपण बोलत असताना जर चुकून जीभ चावली गेली तर आपण आपल्या दात आणि ओठांना मारतो का ? दुसऱ्यांनी कोणी इजा केली तर आपण त्याच्या अंगावर धावून जाऊ पण आपल्याच दात व ओठांना मारू काय ? नाही न ! आणि जरी मारलं तरी लागणार कोणाला ?आपल्यालाच न ! तसेच जवळच्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्याला शिक्षा देण अवघड होते .
- आयजीच्या जिवावर बायजी उदार आणि सासूच्या **वर जावई सुभेदार.
- कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या कमाईचा फायदा तिसऱ्या व्यक्तीने घेऊन दानधर्म केला असं आढळणे . सासूच्या कर्तृत्वाचा फायदा घेऊन जावई सुभेदार झाला तर काय बोलणार ते त्याचं कर्तुत्व थोड्च होणारे ?
- आयत्या बिळात नागोबा.
- दुसऱ्याच्या मेहनतीवर / कर्तुत्वावर आयता ताबा मिळवणे व हक्क सांगणे .
- आयत्या पिठावर रेघोट्या.
- दुसऱ्याच्या मेहनतीवर / कर्तुत्वावर आयता ताबा मिळवणे व हक्क सांगणे .
- आलीया भोगासी असावे सादर. संस्कृतपर्यायः - निर्वाह: प्रतिपन्नवस्तुनि सताम्।
- आपल्या नशिबात् जे भोग / त्रास आहे तो न कटकट करता सहन करायचा .
- आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय.
- आंधळा माणूस जर जात्यावर धान्य दळायला बसला असेल आणि कुत्र्याने पीठ खायला सुरुवात केली तर आंधळ्या व्यक्तीला ते दिसू शकेल का /समजेल का ? रोजच्या आयुष्यात जर अननुभवी व्यक्तीला मोठ्या पदावर ठेवलं तर त्याच्या हाताखालच्या माणसांनी त्यला जाणूनबुजून फसवायचं ठरवलं तर त्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला ज्या कुरापती सुरु असतील त्याची कल्पना हि येऊ शकत नाही .
- आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन.
- एखाद्या आंधळ्या माणसावर देव प्रसन्न झाल्यावर देवाने त्याच्या इच्छेवरून त्याला अर्दन म्हणून एक डोळा न देता दोन डोळे दिले तर त्याला किती आनंद होईल ? अचानकपणे अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं तर आनंद गगनात मावणार नाही .
- आधी लगीन कोंढाण्याचं.
- हाती घेतलेलं काम आधी पूर्ण करायचं मगच आपल्या वैयक्तिक कामाकडे लक्ष द्यायचं .तानाजीराव यांचा सिंहगडासंबंधी गोष्ट तर सगळ्यांनाच माहित असेल त्यांनी मुलाच्या लग्नापेक्षा स्वराज्याचा कामाला प्राणापेक्षा अधिक महत्व दिले .
- आवडतीचा शेंबूड गोड आणि नावडतीचे मीठ अळणी.
- आवडत्या व्यक्तीने काहीही केल तरी चालते पण नावडत्या व्यक्तीने केलेली साधी खरी गोष्ट सुद्धा नजरेला खुपते.एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपले मत चुकीचे झालं तर त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट चुकीचीच वाटते .
- आपलंच घर आणि हगून भर.
- एखादी गोष्ट आपल्याच मालकीची आहे तर तिचा चुकीचा वापर करणे योग्य नव्हे. शब्दशः अर्थ घेताना आपलच घर आहे म्हणून घरभर घाण करून ठेवली तर ते वागण योग्य होईल का ?
- आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.
- आपल्या वाईट गोष्टी लपवून ठेवायच्या आणि दुसऱ्याच्या वाईट गोष्टी शोधून बसायचं हे योग्य आहे का ? उदाहरणार्थ - सगळ्यांच्याच घरी भांडण होतात पण नेहमी शेजारच्या किंवा लांबच्या नातेवाइकांमध्ये भांडण झाली तर आपण चवीने ते सगळ ऐकतो , पण स्वत:च्या घरची भांडणे लोकांना मुद्दामून सांगायला जातो का ?
- आले देवाजिच्या मना तेथे कोणाचे चालंना.
- एखादी वाईट घटना घडली तर त्यावर कोणाचा ताबा नसतो . देवाच्या मनात काय आहे हे कोणी सांगू शकत नाही . काळ हे च औषध उरते शेवटी .
- आई जेवायला घालीना आणि बाप भीक मागु देईना.
- एखाद्या कठीण प्रसंगात सर्व बाजूने मनुष्य अडचणीत सापडला तर कोणत्याच बाजूने मार्ग निघू शकत नाही .शब्दशः अर्थ घेताना घरात आई जेवण करून वाढू शकत नसेल आणि वडील बिक मागून अन्न हि मागण्यास मज्जाव करत असतील तर लेकरू पोटातील भूक घेऊन कुठे जाईल ?
- आहे रेडा आणि म्हणे माझी धार काढा .
- एखादा व्यक्ती दिसायला धष्टपुष्ट असेल पण काहीही काम येत नसतील तर काय उपयोग त्याचा ? रेडा कितीही मोठा झाला तरी त्याला कधीच दुध देता येणार नाही .हि म्हण अतिशयोक्तीचे उदाहरण आहे .
- आड जीभ खाई अऩ पडजीभ बोंबलत जाई.
- कधीकधी पदार्थ वाढायची वाटी छोटी असते किंवा पदार्थच कमी प्रमाणत केलेला असतो ज्यामुळे जिभेला चव जेमतेम कळते , मन किंवा पोट काहीच भरत नाही .जिभेला व पडजीभेला पदार्थाचा मनापासून आस्वाद घेता येत नाही अतृप्तीची भावना येते .
- आडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
- अडाणी किंवा मूर्ख माणूस काय आज्ञा देईल ह्याचा काही भरवसा नाही त्याला गाडी फिरवायची हौस आली म्हणून तो हेही सांगू शकेल कि जरा वाटेत येणारी शेते जराशी बाजूला सरकवून ठेवा .
- आधणातले रडतात, सुपातले हसतात .
- तांदुळाच्या दाण्यांबद्दल रूपक अर्थाने हि म्हण आहे तांदुळाचे जे दाणे गरम पाण्यात म्हणजे आधणात जातात ते रडतात म्हणजे त्यांना दुख: होते , त्याचवेळी सुपात पाखडण्यासाठी घेतलेले दाणे त्यांच्याकडे बघून हसत असतात . पण हे करताना सुपातले दाणे विसरतात कि त्यांना हि कधीतरी आधणात जावं लागणारच आहे . बऱ्याच वेळा आपण दुसऱ्याच्या वाईट परिस्थितीकडे बघून क्षणभर आनंदी किंवा समाधानी होतो पण तीच वेळ आपल्यावरही येणारे हे विसरून जातो .
- आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
- नवीन माणूस जेव्हा आपल्या आयुष्यात येतो तेव्हा आपण त्याची कौतुक करतो पण हळूहळू त्या व्यक्तीची सवय झाली कि तिच्य्मधील दोष दिसायला लागतात .मग आपली मते बदलायला सुरुवात होते . नवीन सून आली कि भरपूर वेळा तीच नाव प्रेमाने घेतल जाते पण ती नेहमीची झाली कि तिच्याबद्दल उखाळ्यापाखाळ्या सुरु होतात.
- आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना.
- एक माणूस आधी खंडोबाचा वाघ्या होता ,त्यला खंडोबाचा येळकोट म्हणायची सवय होती त्या व्यक्तीची नेमणूक घोड्याच्या पाग्यावरील अधिकारी म्हणून केली असता जोशपूर्ण आवाजात घोड्यांना युद्धासाठी तयार करायचे असते तिथे तो येळकोट येळकोट च म्हणू लागला .(तळी भरण्याचा विधी असतो ज्यात विषम संख्येने पुरुषांनी येऊन देवाची स्तुती करायची असते तेव्हा ते खंडोबाचा येळकोट असे म्हणतात .) याचा अर्थ मुळ स्वभाव बदलत नाही.
- आपण हसे दुसऱ्याला अन शेंबुड आपल्या नाकाला. संस्कृतपर्यायः - स्वयमशुद्ध: परान् आशङ्कते।
- बऱ्याच वेळेला आपण जेव्हा दुसऱ्याला हसतो तेव्हा आपल्या उणिवांकडे आपण दुर्लक्ष करतो . शब्दशः अर्थ घेताना आपल्याच नाकातून शेंबूड गळत असताना आपण दुसर्या व्यक्तीच्या व्यंगाकडे बघून हसणे कितपत योग्य आहे ?
- आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
- एखादी अंध व्यक्ती / वेंधळी व्यक्ती पाणी भरण्यासाठी गेली व चुकून तिच्याहातून त्या घागरीला भोक पडलं तर तिला ते समजू शकणार नाही व नवीनच प्रश्न उभा राहील .काम माणसाची योग्यता बघून द्यावे .
- आंधळीपेक्षा तिरळी बरी.
- बायको निवडताना किंवा कामासाठी व्यक्ती निवडताना अंध व्यक्तीपेक्षा जिच्या डोळ्यात दोष आहेत पण अंधुक दिसतंय अश्या व्यक्तीची निवड करणे योग्य ठरेल .
- आई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
- एखाद्या कठीण प्रसंगात सर्व बाजूने मनुष्य अडचणीत सापडला तर कोणत्याच बाजूने मार्ग निघू शकत नाही .शब्दशः अर्थ घेताना घरात आई जेवण करून वाढू शकत नसेल आणि वडील बिक मागून अन्न हि मागण्यास मज्जाव करत असतील तर लेकरू पोटातील भूक घेऊन कुठे जाईल ?
- आई म्हणते लेक झाले, भाऊ म्हणतात वैंरी झाले.
- मालमत्तेवरून / संपत्तीवरून भांडणे होतात हे सर्वांनाच माहित आहे . आई ला वाटत कि आपल्याला अजून एक लेक जन्माला आला तर पोटात संपत्तीची हव असलेल्या मुलाला वाटत कि आपल्याला दुसरा भाऊ नाही तर संपत्तीत वाटेकरी म्हणजे वैरी / शत्रूच जन्माला आलाय .
- आईची माया अन पोर जाईला वाया.
- जसे वाईट सांगत लागल्यामुळे मनुष्य वाया जातो तसेच अति लाड केल्यामुळे सुद्धा मुले चुकीच्या वळणाला लागू शकतात .
- आऊचा काऊ तो म्हणे मावसभाऊ.
- आपलं नाव सारखं किंवा आडनाव सारखं म्हणजे आपण नक्कीच एकमेकांचे भाऊबंद असणार अशी मुद्दाम जवळीक साधायला येणारी माणसे आपण आजूबाजूला बघतोच .दुरदुरची नाती जुळवून स्वार्थासाठी जवळीक साधणार्यांपासून सावध राहणे केव्हाही चांगले .
- आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
- प्रत्येक माणसाची खरी किंमत तो ज्या गोष्टीत उत्तम आहे तेथेच कळून येते . कुस्तीच्या मैदानात /आखाड्यावर तो पैलवान किती ताकदीचा आहे हे दिसून येते .
- आग लागल्यावर विहीर खणणे.
- एखाद्या ठिकाणी आग लागली तर ती विझवायला पाणी हवं पण त्यावेळेस पाणी हवं म्हणून विहीर खणायला घेणे योग्य होईल का ? लगेच पाणी मिळेल का ? कठीण परिस्थिती अध्वू शकते ह्याचा विचार करून आधीच तजवीज केलेली योग्य असते आयत्या वेळी संकटाचे नियोजन कसे करायचे ह्यावर उपाय मिळणार नाही.
- आगीशिवाय धूर दिसत नाही.
- आग वरवर दिसत नसली तरी ती धुमसत असेल तर धूर दिसतोच . कोणतेही वाद / गुन्हा /चुकीचं घडल तर त्यामागेही निश्चित काहीतरी कारण असतेच .
- आज अंबारी, उद्या झोळी धरी.
- पैश्यांच योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे काही व्यक्ती महिन्यातील काही दिवस प्रचंड प्रमाणत पैसे खर्च करताना दिसतात व नंतर काही दिवस लोकांकडे उधारी मागायची वेळ त्यांच्यावर येते . शब्दशः अर्थ घेताना कधी हत्तीच्या अंबारीतून फिरताना दिसतात तर कधीतरी झोळी घेऊन पैसे मागताना दिसतात .
- आजा मेला, नातू झाला.
- आजोबा मेल्यावर जर नातू जन्माला आला तर त्यांना कसा काय आनंद होईल ? नातू जन्माला येणे म्हणजे घराण्याचा वारस जन्माला आला अस पूर्वीची लोकं मानत होती तेव्हा आजोबा जिवंत असताना आपली पिढी पुढे चालवणारा जन्मला हा आनंद महत्वाचा . आता मुलगा व मुलगी समान मानावे जो तो आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो व घराण्याचे नाव मोठ करतो .
- आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.
- कधीकधी पदार्थ वाढायची वाटी छोटी असते किंवा पदार्थच कमी प्रमाणत केलेला असतो ज्यामुळे जिभेला चव जेमतेम कळते , मन किंवा पोट काहीच भरत नाही .जिभेला व पडजीभेला पदार्थाचा मनापासून आस्वाद घेता येत नाही अतृप्तीची भावना येते .
- आत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.
- विनोदी ढंगाने आलेली म्हण आहे कधीतरी स्त्री चे वर्णन करताना ऐकताना असं वाटत कि पुरुषाचे वर्णन करत आहेत ,त्याबद्दल विचारणा केली असताना स्पष्टीकरण देताना अस म्हटल गेल असावे कि मला समजत, जर तिला मिश्या असत्या तर मी काका म्हणलो असतो , पण ती बाई च होती .
- आधी करा मग भरा.
- बऱ्याच वेळा मनुष्य स्वभावाप्रमाणे भविष्याबद्दल आधी भरपूर गोष्टी रंगवून /वर्णन करून बोलतो पण प्रत्यक्षात किती काम होत ते महत्वाच . म्हणून म्हणतात आधी करून दाखवावे मग सांगावे .
- आधी करावे मग सांगावे.
- बऱ्याच वेळा मनुष्य स्वभावाप्रमाणे भविष्याबद्दल आधी भरपूर गोष्टी बोलतो पण प्रत्यक्षात किती काम होत ते महत्वाच . म्हणून म्हणतात आधी करून दाखवावे मग सांगावे .
- आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
- एखाद्या गोष्टीत /वस्तुत /व्यक्ती मध्ये आपण खूप जीव लावला आणि काही काळानंतर कः चुकीचे घडलं किंवा आपल्या मनाविरुद्ध झाल तर आपल्याला त्रास होतो व आपण तो त्रास भोगत बसतो .म्हणून आधी कशात एवढा जीव गुंतवायचा नाही कि नंतर आपल्याला त्याबद्दल त्रास भोगावा लागेल .
- आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.
- नेहमी चूक घडली व त्यापासून धडा मिळाला कि मगच माणसाला शहाणपण येते . दुसऱ्याला सल्ले देताना आपल्याला खूप सुचत असते मग स्वत:वर वेळ आली कि शहाणपणा कुठे जातो? सर्वसाधारण मानवी व्यवहारांचे निरीक्षण करूनच म्हणी बनल्या आहेत .
- आधी नमस्कार मग चमत्कार.
- समोरच्या व्यक्तीची स्तुती करा त्यांना मोठेपणा द्या मगच त्या आपली कामे करतात हि जगरहाटी आहे . तुम्ही नमस्कार करून समोरच्या व्यक्तीसमोर वाकलात तर तुम्हाला त्या व्यक्तीकडून फायदा होईल .
- आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.
- बाहेरची परिस्थिती बिकट आहे . दुष्काळ आहे ,पीकपाणी नाही ,नोकरी नाही अश्या वेळेस हातावर हात ठेऊन बसण्यात काय अर्थ आहे ? किंवा अस कोणी असेल जो काहीही हालचाल न करता परिस्थिती बदलण्याची वाट बघेल , तेव्हा अश्या माणसाचा काय उपयोग?
- आधीच नव्हती हौस त्यात पडला पाऊस.
- एखादी गोष्ट नवीन सुरु करताना एखाद्या व्यक्तीला मुळातच त्यात रस नसेल तत्यात काहीतरी छोटं जरी संकट आला तरी तो हातावर हात धरून बसला तर काय बोलणार ? तो माणूस वेगवेगळे बहाणे सांगत बसेल.
- आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
- माकड आधीच भरपूर चाळे करते त्यात मद्य प्यायल्याने काय गोंधळ होईल ह्याचा विचार न केलेला च बरा ! एखादा बिनडोक माणूस जर दारू पिऊन आला तर किती गोंधळ घालू शकेल ?
- आपण आपल्याच सावलीला भितो.
- कोणी एखादी चूक केली असले असेल किंवा गुन्हा /अपराध केला असेल तर त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्ट संशयास्पद वाटायला लागते त्यामुळे त्या व्यक्तीने थोडी जरी हालचाल केली तर त्याची सावली त्यानुसार हलते त्यामुळे सावलीची सुद्धा भीती वाटते वाटू शकते .
- आपण आरे म्हटले की कारे आलेच.
- एखाद्या घटनेबद्दल प्रतिक्रिया म्हणून आपण वाद घालू लागलो तर समोरची व्यक्ती सुद्धा प्रतिवाद करायचा प्रयत्न करते .त्यामुळे विषय वाढत जातो त्यातून काहीही निष्पन्न होत नाही फक्त वादविवाद झाल्यामुळे दोन्ही व्यक्तींना मानसिक त्रास होतो.
- आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार.
- कोणत्याही वेळी एखादंया घटनेमध्ये बोलताना किंवा वागताना आपण जे करतो ते योग्यच आहे यासाठी आपलं मन आपल्याला ग्वाही देत असतं पण त्याच वेळी दुसरी व्यक्ती काही बोलली / वागली तर आपल्याला त्यांनी काहीतरी चुकीचं केलं असं वाटायला लागते .
- आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच.
- एखाद्या घटनेत होते घटनेमध्ये एका व्यक्तीने चूक केली तर स्वतःवर हाय आळ यायला नको म्हणून ती व्यक्ती दुसऱ्या कुणावर तरी संशय व्यक्त करते व दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते .
- आपण सुखी तर जग सुखी.
- एखादा व्यक्ती जर मनातून सुखी असते असेल तर त्याला आजूबाजूचे जग सुद्धा सुखी आणि आनंदी वाटते ,पण ती व्यक्ती दुःखात असेल तर सगळं चुकीचं चाललंय असं वाटू शकत . थोडक्यात आपला आनंद आपल्या मानसिक स्थितीवर अवलंबून असतो .
- आपला आळी, कुत्रा बाळी.
- आपल्या आळीतला / गल्लीतला मालकीचा कुत्रा जरी जोर जोराने ओरडत असेल , कोणाच्या अंगावर जात असेल तरीही तो आपल्याला छोटाच वाटत वाटतो .त्याचे दोष आपल्याला दिसत नाहीत .
- आपलाच बोल, आपलाच ढोल.
- एखाद्या व्यक्तीला सतत आपलं स्वतःचं गुणगान गायची किंवा कौतुक करायची सवय असते . दुसऱ्यातील चांगल्या गुणांची दखल न घेता फक्त स्वतःचा मोठेपणा सांगण् त्यांना आवडत असते .
- आपली पाठ आपल्याला दिसत नाही.
- आपले स्वतःचे दोष आपल्याला दिसत नाही व आपल्या पाठीमागे लोक आपल्याबद्दल काय बोलतात तेही आपल्याला समजत नाही.
- आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.
- एखादी गोष्ट/वस्तू आपल्या मालकीची असून सुद्धा कधीकधी लोकांसमोर उघडपणे ती वापरता येत नाही व लपवून वापरावी लागते.
- आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.
- आपण आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर जर फिरताना दिसलो तर त्याचं समर्थन करताना आपण सांगतो की आपलं त्या व्यक्तीवर प्रेम आहे , परंतु दुसरी व्यक्ती अशी कोणाबरोबर तरी फिरताना आढळली तर आपण त्यांचं लफड आहे असं म्हणून मोकळे होतो .
- आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.
- एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या समारंभात किंवा आनंदात सगळे जण जमले असताना आपण स्वतः काही वावगे बोलू नये किंवा चुकीचं वागू नये. ज्यामुळे चांगल्या प्रसंगाचा विचका होईल .
- आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.
- आधी आपण आपल्या कुटुंबाच्या गरजाकडे लक्ष द्यावे मगच दुसऱ्यांना मदत करायला जावे .
- आपल्या कानी सात बाळ्या.
- आपण स्वतःचा गरजांच्या बाबत कधीच समाधानी नसतो . उदाहरणादाखल एखाद्या व्यक्तीच्या कानामध्ये सात आभूषण असली तरीही कमीच आहेत असं त्याला वाटतं असतं .
- आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.
- आपल्याला स्वतः मधले मोठे दोष दिसत नाहीत आणि समोरच्या व्यक्तीने छोटी चूक जरी केली तरी ती आपल्याला खूप मोठी वाटत असते .
- आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.
- आपल्याला स्वतः मधले मोठे दोष दिसत नाहीत आणि समोरच्या व्यक्तीने छोटी चूक जरी केली तरी ती आपल्याला खूप मोठी वाटत असते .
- आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.
- दगडाला भावना नाहीत त्यामुळे त्याला कोणी उचललं तर त्या व्यक्तीला इजा करायची नाही हे त्याला समजू शकतात शकत नाही . अशावेळी आपण हातात धरलेला दगड चुकून आपल्या हातून निसटला तर त्यामुळे आपल्याला सुद्धा इजा होऊ शकते .आपणच केलेल्या कृतीची शिक्षा आपल्याला मिळते .
- आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?
- एखाद्या वेळेला खूप मोठं संकट आलं तर आपण केलेले छोटे छोटे उपाय या संकटाला घालवू शकत नाहीत किंवा त्याची तीव्रता कमी करू शकत नाहीत .अशा वेळेस न हरता परिस्थिती बदलण्याची वाट बघणे एवढाच उपाय शिल्लक राहतो .
- आय नाय त्याला काय नाय.
- आपल्या कितीतरी चुका सगळ्यात जास्त आईच माफ करू शकते बाकी जगात कोणीही आपल्याशी इतकं चांगलं वागु शकत नाही . त्यामुळे जर आई आपल्या आजूबाजूला नसेल तर आपल्या बाजुने कोणी नाही हेच खरं असं म्हणावं .
- आराम हराम आहे.
- आपलं काम पूर्ण झालेलं नसताना आराम करणे , आळशीपणा करणे चुकीचा आहे .
- आरोग्य हीच धनसंपत्ती.
- सगळ्यात श्रेष्ठ धन आपल्या जवळ आहे ते म्हणजे आपलं शरीर .ते सुदृढ ठेवणे , व्यायाम करणं , योग्य आहार घेणे हेच सगळ्यात महत्वाचा आहे . इतर कोणत्याही धनसंचयाच्या मागे लागण्यापेक्षा शरीरावर लक्ष देणे सगळ्यात महत्त्वाचं .
- आलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा?
- माकडाला कोणतीच सारासार बुद्धी नसते त्यामुळे हातात आलेली वस्तू किंवा एखादं भांड जर का भरलेले असेल तरीही तो ते उलट सुलट करून बघताना त्यातल्या वस्तू सांडून जातात तरीही त्याला ते समजत समजत नाही वस्तू सांभाळून ठेवण त्याला जमत नाही . मग त्याचा संसार कसा काय होणार ? हे रूपक आहे . खऱ्या आयुष्यात काही माणसं जबाबदारीने वागत नाही त्यामुळे त्यांच्या संसारात अडथळे येतात .
- आला भेटीला धरला वेठीला.
- काही काही माणसं वागण्यामध्ये एवढी चलाख असतात ती त्यांना सहज भेटायला म्हणून कोणी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला सुद्धा ते कामाला लावू शकतात .
- आली अंगावर, घेतली शिंगावर.
- एखादी गोष्ट आज अचानक अंगावर आली /अचानक जबाबदारी अंगावर पडली तरीही तिचा स्वीकार करून योग्यप्रकारे तडीस नेणे व काम पूर्ण करणे.
- आली चाळीशी, करा एकादशी.
- सतत भितीच्या छायेत वावरणे .काहीतरी वाईट होईल या भीतीने सतत कोणते ना कोणते उपास तपास करत राहणे .
- आली सर तर गंगेत भर.
- थोडीशी बेफिकीर वृत्ती असणे . म्हणजे जर पाऊस पडला तर काय गंगेतच भर पडेल .
- आलीया भोगासी असावे सादर.
- जे भोग भोगणे आपल्या नशिबात आहे ते आपण स्वीकारायला हवं ! त्याबद्दल कुरकुर करून कसं चालेल ? जी कठीण परिस्थिती समोर आली आहे तिला शांतपणे समजून तोंड देणं व उपाय शोधणे हे करायलाच हवं.
- आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.
- घरामध्ये नवी नवरी आल्यावर तिला स्वयंपाक करायला , घर चालवायला भांडीकुंडीच नसतील किंवा वस्तूच नसतील तर ती संसार कसा करणार ?
- आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला.
- एखादा आळशी मनुष्य काम करायला उठणे हेच मुळात अवघड आहे . त्यातही तो काम करायला उठल्यावर कोणीतरी चुकून शिंकले तर तो आळशी माणूस आता काय काम होणार नाही , शिंकल्यामुळे अपशकून झाला असं म्हणून परत काम करायचं पुढे ढकलतो.
- आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान.
- आळशी माणसाला काम करायचे नसत , सतत फक्त मोठ्या मोठ्या बाता मारून आपल्याला किती ज्ञान आहे हे जगाला ओरडून सांगायचं असतं त्याला प्रत्येक विषय माहीत असतो असं त्याचं मत असतं .
- आळश्याला दुप्पट काम.
- ज्यावेळेस एखादा आळशी मनुष्य कामचुकारपणा करायचं ठरवतो तेव्हा हमखास त्याला दुप्पट काम करावे लागते .
- आळी ना वळी सोनाराची नळी.
- अळी जशी वळत नाही, तसं सोनाराची नळी पण ताठ, एकदा फुंकली की फुंकर विस्तावावरच जाणार .
- आळ्श्याला गंगा दूर.
- एखादी गोष्ट आपल्याला मनापासून बघायची असेल तर त्यासाठी कितीही कष्ट करायची आपली तयारी असते अगदी दुसर्या देशात जाऊनही आपण ती गोष्ट बघतो पण जर एखादी व्यक्ती आळशी असेल तर आपल्या देशातील गंगा सुद्धा त्याला लांब वाटेल .
- आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर.
- एखाद्या व्यक्तीशी स्वतःच्या मर्जीने लग्न केलं व लग्नानंतर असं समजलं किती व्यक्ती नेहमी आजारी असते . त्या व्यक्तीला सकाळी खोकला आणि रात्री ताप येत असेल सदानकदा आजारीच असेल तर कौतुकाने लग्न करण्याला काय अर्थ झाला ?
- आवळा देवून भोपळा काढणे. (आवळा देवून कोहळा काढणे.)
- पूर्वीच्या काळी वस्तूंची देवाणघेवाण करताना चलन करताना चलना ऐवजी वस्तूंचा वापर केला जात असे . अशा वेळेला एका छोट्याशा वस्तू त्या बदल्यात मोठी वस्तू मागणे अशी परिस्थिती निर्माण होणे . एक छोटासा आवळा देऊन त्याच्या बदल्यात मोठा कोहळा घेऊन फसवणे .
- आवसबाई तुझ्याकडे पुनवबाई माझ्याकडे
- एकमेकांच्या विरुद्ध परिस्थिती असणे. दर महिन्याला पौर्णिमा (पुनव ) व अमावस्या (आवस) येतात . त्या वेळेला चंद्राची स्थिती एकमेकाविरुद्ध असते . पौर्णिमेच्या वेळेस चंद्र पूर्ण असतो आणि अमावस्येला चंद्र अजिबात असतो . नेहमीच्या आयुष्यात विरुद्ध परिस्थिती म्हणजे उदाहरणादाखल एखाद्या घरी अति दानशूर व्यक्ती असते व दुसऱ्या घरी अति कंजूष व्यक्ती असते , दोन्ही ठिकाणी स्वभावामुळे होणारे त्रास त्रास वेगवेगळे .
- आशा सुटेना अन देव भेटेना.
- प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी देवाचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं असं वाटत असतं. पण प्रत्येकाला देवाचा दर्शन होतंच असं नाही तरीही मनुष्य त्याची उपासना करणे, प्रार्थना करणे सोडत नाही . देव दिसला नाही तरीही तो आहे या आशेवर आपण जगत असतो.
- आसू ना मासू, कुत्र्याची सासू.
- स्वतःच्या फायद्यासाठी ओढून ताणून नाते संबंध आहेत असे दाखवणे.
- आंधळ्या बहिऱ्याची गाठ.
- दोन निकामी माणसे एकत्र येणे.
- आपला तो बाळ्या, दुसऱ्याचे ते कार्टे.
- स्वतः संबंधी उदार दृष्टीने पाहणे.
- आगीतून निघून फुकटयात.
- लहान संकटातून सुटका होताच मोठ्या संकटात सापडणे.
- आडला हरी गाढवाचे पाय धरी.
-
स्वर इ
[संपादन]- इकडे आड, तिकडे विहीर. संस्कृतपर्याय-इतो व्याघ्र इतस्तरी
- प्रश्न सोडवताना दोन पर्यायांपैकी कोणताही पर्याय योग्य नसेल तर / दोन्ही बाजूने नुकसान अशी परिस्थिती तर असे म्हणतात . आड म्हणजे विहिरीप्रमाणेच पाणी साठवण्याची जागा . जिथे लपायला जागा नाही. - इच्छा तेथे मार्ग
एखादी गोष्ट पूर्ण करायचं अस मनात ठरवलं असेल तर त्या व्यक्तीला अडचणीतून सुटण्याचा मार्ग मिळतोच . - इच्छिलेले जर घडले असते तर भिक्षुकांते राजे होते.
प्रत्येकाच्या इच्छेनुसार जर घडले असते तर भिक्षुकीही नुसती इच्छा मनात धरून राजा झाला असता.म्हणजेच नुसती इच्छा करून कोणतीही गोष्टं साध्य होत नाही.
स्वर ई
[संपादन]- ईडा पीडा बला टळो
- आपल्यावर /जवळच्या व्यक्तींवर / इतर कोणावरही येणारे कोणतंही संकट संपू दे किंवा दूर जाऊ दे अशा अर्थाने - ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो.
- ईश्वरी कृपा शाश्वत मानवी ती अशाश्वत.
- ईश सर्वांकडे पाहे असे म्हणून स्वस्थ राहे.
स्वर उ
[संपादन]- उचलली जीभ अन् लावली टाळ्याला संस्कृतपर्याय - मुखमस्तीति वक्तव्यम्
- पुढचा मागचा सारासार विचार न करता मनात येईल ते बोलणे .
- उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग.
- लग्नासाठी अधीर झालेला मुलगा कोणत्याही परिस्थितीचा सारासार विचार न करता लग्नाला तयार असतो .ही म्हण रूपक अर्थाने एखादी व्यक्ती सर्व परिस्थिती समजून न घेता अधीरतेने निर्णय घेते तेव्हा अस म्हटले जाते .
- उथळ पाण्याला खळखळाट फार. संस्कृतपर्याय - अर्धो घटो घोषमुपैति नूनम्।
- समुद्रमध्ये प्रचंड पाण्याचा साठा असतो तरीही तो शांत असतो पण छोटासा ओहोळातील /झर्यातील पाणी वाहताना त्या पाण्याचा भरपूर आवाज होत असतो . रूपक अर्थाने विचार करताना एखादी व्यक्ती जर हुशार आणि बुद्धिमान असेल तर ती व्यक्ती शांत असते आणि मूर्ख /कमी बुद्धिमान माणूस भरपूर बडबड करतो या अर्थाने ही म्हण वापरली जाते .
- उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. संस्कृतपर्याय - 1उद्योगिनं पुरुषसिंहम् उपैति लक्मीः। 2 पुरुषकारम् अनुवर्तते दैवम्।
- जी व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असते ,मेहनत करत असते किंवा विद्या संपादन करत असते अशा व्यक्तीच्या घरी लक्ष्मी सरस्वती सुखाने नांदत असतात . म्हणजे त्यांना आर्थिक किंवा इतर कमतरता जाणवत नाहीत .
- उघडीला भेटले लुगडे, मग हे झाकू की ते झाकू.
- गरजू व्यक्तीला एखादी गोष्ट /पैसे अचानक मिळाली तर त्या व्यक्तीला प्रश्न पडतो की नक्की कोणती गरज पहिल्यांदा भागवावी ? उदाहरणार्थ मिळालेल्या पैशातून अन्न घ्यावं की वस्त्र घ्यावं असे साधे प्रश्न सोडवताना सुद्धा तिला अडचण येते .
- उठता लाथ बसता बुक्की
- एखादा काम सांगितल्यावर ते काम करत आता चुकलं मी पाठीवर लाथ बसायची किंवा मार मिळायचा आणि ते काम जमत नाही म्हणून नुसतं बसून राहिलं कि पाठीत बुक्का मिळायचा .कडक शिस्तीत वाढवणे .
- उधारीचे पोते सव्वाहात रिते
- आपण पैसे देऊन जर माल विकत घेतला तर दुकानदार खुशीने थोडीशी वस्तू आपल्याला सूट म्हणून देतो पण जर आपण उधारीवर मागे घेत असू तर दुकानदार नाराजीमुळे देत असलेल्या मालातील भाग कमी करून आपल्याला देतो .
- उंदराला मांजर साक्ष
- दोन विरुद्ध मतांच्या व्यक्ती सुद्धा एखाद्या विशिष्ट स्वार्थासाठी एकमेकांची बाजू घ्यायला तयार असतात .एकमेकांच्या चांगुलपणाची साक्ष द्यायला सुद्धा तयार असतात . - उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक.
- . - उंट पाण्यात बुडालाय नि शेळी म्हणतीय मी येऊ काय.
- . - उंटावरून शेळ्या हाकणे
- कामात हलगर्जीपणा असल्यास काम नीट होत नाही. - उपट सुळ घे खांद्यावर
- नसते लचांड मागे लावून घेणे. - उभारले राजवाडे तेथे आले निकवडे.
- उधारीचे पोते , सव्वा हात रिते.
- सतत उधारी मागून जगणाऱ्या माणसाचे हात नेहेमीच रिकामे असतात. त्याला सगळंच अपुरं पडत. - उसना पसारा,देवाचा आसरा.
- उशिराने उठे काम साठे .
- जी व्यक्ती उशिराने उठते तिचे कुठलेच काम वेळेवर होत नाही. वेळेचे व्यवस्थापन करता येत नाही जेणेकरून सगळी कामे साठत जातात. - उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी.
स्वर ऊ
[संपादन]- ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.
- कोणत्याही गोष्टीचा /वागण्याचा /बोलण्याचा अतिरेक करू नये . ऊस गोड असतो म्हणून तो मुळापाशी सुद्धा तेवढाच गोड असतील असं नाही .
- ऊसाच्या पोटी काऊस
-
स्वर ए
[संपादन]- एक घाव दोन तुकडे.
- एखाद्या गोष्टीवर किंवा प्रश्नावर तिथल्यातिथे त्वरित निर्णय देणे व चांगलं-वाईट जे असेल ते समोरासमोर न लपवता मांडणी करणे .
- एक ना धड भाराभर चिंध्या.
- एका वेळी अनेक कामं अंगावर घेतली तर कोणतच काम नीट होत नाही आणि कोणत्याही कामांमध्ये उत्कृष्टता गाठता येत नाही त्यामुळे कोणतच काम सर्वोत्कृष्ट होत नाही , सर्व कामे अर्धवट होतात .
- एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत.
- दोन तडफदार प्रभावी व्यक्तिमत्व एकाच ठिकाणी काम करणं थोडा अवघड असतं कारण मतभेद असतील तर ते तीव्रपणे मांडण्याची सवय असते थोडक्यात दोन माणसं एकमेकांना छेद देऊ शकतात दुखवू शकतात .
- एकादशीच्या घरी शिवरात्र.
- आधीच घरामध्ये आर्थिक किंवा इतर अडचणी आहेत त्यात अजून वेगळेच संकट आलं किंवा वेगळी परिस्थिती सामोरी आली तर कठीण प्रसंगात तोंड देणं खूपच अवघड होऊन जातं .नेमकी अशी परिस्थिती निर्माण होणे .
- एका कानावर पगडी, घरी बाई उघडी.
- बाहेरच्या लोकांसमोर श्रीमंतीचा रुबाब दाखवणे आणि आणि त्याच वेळेला स्वतःच्या घरामध्ये नैमित्तिक खर्चाला पैसे नसणे .
- एका हाताने टाळी वाजत नाही. संस्कृतपर्यायः - नैकेन चक्रेण गती रथस्य।
- जसा आपण एका हाताने टाळी वाजवू शकत नाही त्याकरता दोन हातांची गरज असतेच . त्याप्रमाणे कोणतीही चुकीची किंवा वेगळी घटना घडली तर ती कोणा एकट्याची चूक नसून त्या प्रसंगात उपस्थित असणाऱ्या दोन्ही व्यक्तींच्या वागणुकीचा परिणाम असतो .
- एका माळेचे मणी.
- काही विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या व्यक्ती त्या साधारणपणे सारख्याच पद्धतीने वर्तणूक करतात उदाहरणार्थ -वर्गातली मुलं सर्वसाधारणपणे सगळेजण मस्ती करतात .
- एकटा जीव सदाशिव.
- आपण ज्या वेळेस इतर चार माणसांबरोबर राहत असतो त्यावेळेला आपल्याला त्या लोकांच्या सवयीशी , स्वभावाशी जुळवून घ्यावं लागतं पण जर एखादी व्यक्ती एकटीच राहत असेल तर त्या व्यक्तीला फारसा कोणाशी जुळवून घ्यावे लागत नाही . त्यामुळे तो व्यक्ती त्या बाबतीत सुखी असतो .
- एकमेकां सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ|
- आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत करून अडीअडचणीतून मार्ग काढला पाहिजे . जसं एखाद्या अनोळखी रस्त्यावर चालताना आपण एकमेकांच्या असल्याने आणि विचाराने मार्ग काढतो तसंच नियमित जीवनात असं वागणं आचरणात आणायला हवं .
- एकाने गाय मारली म्हणून दुसर्याने वासरू मारू नये.
- एखाद्या माणसाने आपलं नुकसान केलं तर त्याचा राग मनात धरून आपण त्या माणसाचे नुकसान करतो आणि मग हा एकमेकांचा बदला घेण्याचा मार्ग असाच पुढे चालत राहतो यातून कोणीही सुखी होत नाही . आपलं नुकसान झाल्यावर राग येणं जरी स्वाभाविक असलं तरीही समोरच्या व्यक्तीला माफ करून जमायला हवं .
- एका कानाने ऐकावे दुसऱ्या कानाने सोडून द्यावे
- न आवडणारे बोलणे विसरून जावे.
- एकाची जळते दाढी, दुसरो पेटवतो विडी
- दुसऱ्याच्या संकटात मदत करण्याऐवजी स्वतःचा क्षुल्लक फायदा करून घेणे. - एकादशी अनं दुप्पट खाशी.
- एकादशीच्या दिवशी उपास असल्याने उपासाचे विविध पदार्थ केले जातात पण तेच खुप आवडीने आणि जास्त प्रमाणात खाल्ले जातात.म्हणजेच पोटाला विश्रांती देण्याऐवजी दुप्पट खाणे होते. - एक पंथ दोन काज.
- एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात.
- एकाचवेळी दोन वेगवेगळ्या गोष्टी करणे.एकाच निर्णयावर ठाम नसणे.द्विधा मनास्तिथी.
- एक वेळ जेवायचे ताट द्यावे पण पाट देवू नये.
- दुसऱ्याला मदत करताना आपल्याकडील मौल्यवान किंवा महत्वाची गोष्टं जरूर द्यावी पण आपलं सर्वस्व देऊ नये जेणेकरून आपलं अस्तित्वच धोक्यात येईल.
स्वर ऐ
[संपादन]- ऐकावे जनाचे करावे मनाचे. संस्कृतपर्यायः - प्रमाणम् अन्त:करणप्रवृत्तय:
- एखाद्या घटनेबाबत उपस्थित परिस्थितीतील सर्व लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे व नंतर बुद्धीचा व मनाचा वापर करून योग्य निर्णय घ्यावा. सर्व आधी ऐकून घेण्याची मनाची तयारी हवी.
- ऐट राजाची अऩ वागणूक खेकड्यांची.
- राजाप्रमाणे मोठेपणाचा आव आणून दिखावा करणे पण प्रत्यक्षात खेकडयाप्रमाणे एकमेकांचे पाय खेचून मागे आणणे.
- ऐन दिवाळीत दाढदुखी.
- दिवाळीच्या सर्वांच्या घरात वेगवेगळे चविष्ट पदार्थ तयार होतात आणि अशाच वेळेला अचानक धाड दुखायला लागले तर कोणत्याच पदार्थाचा आस्वाद घेता येणार नाही. - ऐकून घेत नाही, त्याला सांगू नये काही .
- एखादी व्यक्ती जर काही ऐकून घेण्यास तयार नसेल तर त्याला काही सांगायला जाऊ नये.
स्वर ओ
[संपादन]- ओळखीचा चोर जीवे न सोडी/ जिवानिशी मारी.
- ओसाड गावी एरंडी बळी.
- ओठी ते पोटी.
- ओल्या बरोबर सुके जळते.
- ओळख ना पाळख अनं मला म्हणा लोकमान्य टिळक.
- ओठात एक आणि पोटात एक -
बोलण्यात आणि कृतीत फरक असणे. - ओळखीचा चोर जीवे न सोडी -
निकट परिचित मनुष्य उलटला तर अनोळखी शत्रूपेक्षा जास्त नुकसान करतो.
स्वर औ
[संपादन]- औट घटकेचे राज्य.
- औषधा वाचून, खोकला गेला.
- औषध नाही मृत्यूस काही.
स्वर अं
[संपादन]- अंथरूण पाहून पाय पसरावेत.
- आपली परीस्थिती बघून वागावे किंवा कृती करावी. - अंगावर आल्या गोणी, तर बळ धरले पाहिजे तुनी.
- अंधेर नगरी चौपट राजा.
- अंगापेक्षा बोंगा मोठा.
स्वर अः
[संपादन]स्वर ऋ
[संपादन]- ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये.
- ऋषी पंचमीचा बैल.
- ऋण काढून तूप प्यावे.
- ऋण फिटले पण हीन नाही फिटतं.
मुळाक्षर क
[संपादन]- कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली.-
मुखवटा घेऊन रहाणे. आत एक बाहेर एक वागणे - कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी.-
- कळते पण वळत नाही.--
समजते पण आचरणात आणता येत नाही. - कर नाही त्याला डर कशाला? - संस्कृतपर्यायः -कर्तव्यदक्षस्य कुतो भयं स्यात्?
ज्याने काही ही चूक किंवा अपराध केलेलाच नाही, त्याला कशाची ही भीती बाळगण्याचे कारण नाही. - करावे तसे भरावे.- संस्कृतपर्यायः - 1 यथा कर्म तथा फलम्। 2 कर्मायत्तं फलं पुंसाम्।
'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ।' चांगले काम केले तर फळही चांगलेच मिळते. आणि वाईट कामाचे फळ वाईटच असते. - करायला गेले नवस आज निघाली अवस.-
चांगले काम करायचे ठरवले पण मुहूर्त चांगला नाही असे होणे. - कशात काय अन फाटक्यात पाय.-
कोणत्या ही प्रकारची तयारी झालेली नसताना काम केल्यामुळे सर्व काम वाया जाते. - कण्हती कुथती, मलिद्याला उठती. -
'खायला आधी, झोपायला मधी अन् कामाला कधीमधी ।' काम करायची वेळ आली की कुरकुर करायची, सबबी सांगून काम करणे टाळायचे आणि कामाचे फळ मिळायची वेळ आली की ताबडतोब तयार व्हायचे. - कळंना ना वळंना, भाजी भाकरी गिळंना.-
गोंधळून गेल्यामुळे काहीही न सुचणे. - करून गेला गाव आणि कांदळकराचे नाव.-
- काळ आला होता पण वेळ नाही.-
प्राणघातक अपघातातून वाचणे - काखेत कळसा गावाला वळसा.- संस्कृतपर्यायः - कटीकलशमन्वेष्टुं नगरे भ्रमणं यथा।
जवळच असलेली वस्तू सगळीकडे शोधल्यावर जवळच सापडते. - कानामागून आली अन तिखट झाली.-
मागाहून येऊन शिरजोर होणे. एखादी व्यक्ती अनुभवाने कमी असून सुद्धा इतरांपेक्षा वरचढ ठरते. - काट्याने काटा काढावा.- संस्कृतपर्यायः - 1 आयसैरायसं छेद्यम्। 2 कण्टकेन एव कण्टकम्।
एखाद्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला त्रास देऊनच दूर करावे. - कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी.- संस्कृतपर्यायः -1 कार्यार्थी सर्वलोकोऽयम्।2 सङ्कटे व्यङ्कटेश:
जो पर्यंत एखाद्याची गरज असेल तो पर्यंत तिच्याशी सलगीने, प्रेमाने वागणे. काम झाले किंवा गरज संपली की त्या व्यक्तीशी कोणताही संबंध ठेवला जात नाही. - कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ.-
एखादी वाईट गोष्ट घडण्यासाठी एखादी व्यक्ती आपसूक कारण ठरते. - कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.- संस्कृतपर्यायः -न काकशापेन म्रियेत धेनु:।
कुवत किंवा अधिकार नसलेल्या व्यक्तीच्या दुष्ट इच्छेमुळे काम व्हायचे थांबत नाही. - कावळ्याचे दांत शोधण्यासारखे.-
- काडीची नाही खबर म्हणे मी अकबर.-
राजाला आपल्या राज्यातील घटनांची पुरेपूर माहिती असणे आवश्यक असते. मात्र एखादा माणूस स्वतःला श्रेष्ठ अधिकारी (राजा) समजत असतो, पण त्याला कामाविषयी, जबाबदारीविषयी माहिती नसते. - काम ऩ धंदा, हरी गोविंदा.-
- काम नाही घरी अन् सांडून भरी.-
कोणताही उद्योग नसताना निरर्थक काम करत वेळ काढणे. - कुडी तशी पुडी
जशी शरीरयष्टी असेल तसा त्या व्यक्तीचा आहार असतो. (जाड माणसाचा आहार भरपूर असतो, तर बारीक अशक्त माणूस कमी जेवतो.)
- कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.-
ज्या कुटुंबात-कुळात जन्मलो, त्याच कुटुंबाच्या-कुळाच्या विनाशाला कारण ठरणे. - कुई म्हणलं तर कुल्ला कापीन. -
- कुणी सरी घातली म्हणून आपण फास घेऊ नये./ दोरी घालू नये.-
कोणी उगाच स्तुती केली म्हणून फुशारून जाऊ नये, कारण त्यामुळे आपलाच घात होण्याची शक्यता असते. - कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा.-
ज्याची कटकट टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करावा, तोच सतत आपल्या मागे लागलेला आहे असे अनुभवाला येते. - कुठे इंद्राचा ऐरावत,अन् कुठे शामभट्टाची तट्टाणी? - संस्कृतपर्यायः -क्व सूर्य: क्व च खद्योत:?
गुणसंपन्न किंवा ऐश्वर्यसंपन्न व्यक्तीच्या गुणांची किंवा ऐश्वर्याची तुलना सामान्य व्यक्तीच्या गुणांशी/संपत्तीशी करू नये. - केवड्याचे दान वाटले आणि गावात नगारे वाजले.-
- केल्याने होत आहे रे, म्हणून आधी केलेची पाहिजे.-
कोणते ही काम प्रत्यक्ष केल्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून ते पूर्ण झाल्याशिवाय त्या विषयी बोलू नये. - कोणाला कशाचं तर बोडकीला केसाचं.-
प्रत्येक व्यक्तीच्यासाठी महत्वाच्या/प्रधान्याच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. केस नसलेल्या स्त्रीला केसांचं फार अप्रूप असतं, जे इतरांना अगदीच क्षुद्र वाटतं. - कोल्हा काकडीला राजी.- संस्कृतपर्यायः -क्षुद्र: क्षुद्रेण तुष्यति।
अगदी क्षुल्लक गोष्टीने सुद्धा समाधान पावणे. - कोळसा उगाळावा तितका काळाच.- संस्कृतपर्यायः -न निम्बवृक्षो मधुरत्वमेति।
पुनः पुन्हा बोलण्याने परिस्थिती बदलत नसते. - कोल्ह्याला द्राक्षे आंबट.- संस्कृतपर्यायः - सत्यमेव जयते।
वस्तू प्राप्त न झाल्यास त्या वस्तूलाच नावे ठेवणे, दोष देणे. - क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.-
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. काम न करता फक्त बडबड करणे, बढाया मारणे उपयोगाचे नसते. - कंड भारी उड्या मारी.
- कंबरेच सोडला आणि डोक्याला बांधला. -
निर्लज्जपणे वागणे. - कुंभार तसा लोटा.- संस्कृतपर्यायः - यथा बीजं तथाङ्कुर:।
- कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही./सूर्य उगवायचा राहत नाही.-
एखादी गोष्ट गुप्त ठेवायचा किती ही प्रयत्न तरी जे घडायचे ते घडतेच. - कोठेही गेला तरी पळसाला पाने तीनच.-
सगळीकडे परिस्थिती सारखीच असते. - कोणी पाण्यात पाहती, कोणी आरशात पाहती.-
कोणी इतरांचा द्वेष, मत्सर करण्यात आनंद मानतो, तर कोणी स्वतः चेच कौतुक करण्यात मग्न असतो. - कुणब्याला जो म्हणेल आप, त्याचा गाढव बाप.-
- कुडास कान, ठेवी ध्यान.-
आपल्याच कामात मग्न असल्याचे दाखवायचे मात्र सारे लक्ष इतरांच्या हालचालींवर ठेवायचे - कपाळाला कपाळ घासल्याने दैव येत नाही.-
- कान आणि डोळे यांमध्ये चार बोटांचे अंतर -
घडलेली घटना प्रत्यक्ष पाहणे व त्या विषयी बातमी ऐकणे यांत फरक असतो. - कसायला गाई धार्जिणी -
मवाळ मनाच्या धन्यापेक्षा कठोर धन्यालाच नोकर ऐकतात. - कडू कारले तुपात घोळले, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच -
जन्मस्वभाव सुधारण्याचे प्रयत्न वाया जातात. - करीन तो पूर्व -
अधिकाराच्या जोरावर वाटेल ती गोष्ट मान्य करणे. - काप गेली भोके राहिली -
श्रीमंती गेली पण त्याच्या खुणा शिल्लक राहिल्या. - कोरड्याबरोबर ओले जळते -
अपराध्याबरोबर निरपराधी भरडला जातो. . - कुंपणाने शेत खाल्ले -
ज्याने रक्षण करावयाचे तोच भक्षक बनला. - कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच -
देहस्वभाव बदलतच नाही.
- कर्ज काढून करणें सण, हे दुःखाचें कारण.
ऐपत नसताना कर्ज काढून एखादी गोष्ट केली आणि कर्ज जर फेडता आले नाही तर आपण अडचणीत सापडतो आणि तेच दुःखाचे कारण बनते. - कर्ज घेऊन आपण विसरतो, पण सावकार सदा स्मरतो.
कर्ज घेणारा माणूस ते परत करणे विसरेल पण कर्ज देणारा सावकार ते कधीही विसरत नाही.
- कपट आपलें आपण, करितें विष प्राशन.
- कपट गुप्तपणें राहतें, सत्य उघडें वागतें.
- कपटी मित्राचें मन, अधिक दुष्ट सर्पाहून. करी हिताचें शिक्षण, खरें मित्रत्व लक्षण.
- करी ज्ञानाचा अभ्यास, होय सुखोपभोग त्यास.
खरोखरीचे ज्ञान ज्याने प्राप्त केले आहे त्याला सुख प्राप्ती होते. - करून दाखवावें, बोलून दाखवू नये.
नुसते बोलण्यापेक्षा ती गोष्टं प्रत्यक्ष करून दाखवावी. - करूं जावें एक आणि होतें भलतेंच.
कधीकधी एका विशिष्ठ उद्देषाने आपण एखादी कृती करतो पण त्याचे परिणाम वेगळेच होतात.उदिष्ट साध्य होत नाही. - करूं जातां अतिचेष्टा, स्नेहांत पडे फांटा.
आपल्या जवळच्या किंवा आप्तेष्टांची अति चेष्टा मस्करी केली तर कधी कधी आपल्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.
मुळाक्षर ख
[संपादन]- खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं
- खाऊ जाणे ते पचवू जाणे. -
एखादी गोष्ट केली तर तिचे परिणाम भोगण्याची तयारी ही ठेवावी लागते. जर काही खाल्लं तरबते पचवता हे यावे लागते. - खाऊन माजवे टाकून माजू नये.-
कोणत्याही गोष्टीचा योग्य उपयोग करावा, चांगल्या प्रकारे उपभोग घ्यावा आणि आनंद साजरा ही करावा. पण वस्तूचा चांगल्या प्रकारे उपयोग न करता ती वाया घालवून आनंद व्यक्त करू नये. - खाई त्याला खवखवे.-संस्कृतपर्यायः - सुन्दरी वा दरी वा। -
जर एखादी चूक केली असेल तर ती उघडकीला येण्याची भीती मनात राहतेच. - खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी.-
उत्तम वस्तू, गोष्टींचाच उपभोग घ्यायचा अन्यथा त्या वस्तुशिवाय राहण्याची तयारी ठेवयाची. - खाण तशी माती. -संस्कृतपर्यायः - यथा बीजं तथाङ्कुर:। -
बी मध्ये जे गुणधर्म असतात तेच फलात उतरतात. मातीत जे खनिज सापडतं, त्यावरून त्या ठिकाणी खोदल्यास तेथे त्या खनिजाचे साठे सापडतात. म्हणून मातापित्यांचे गुण मुलांमध्ये दिसून येतात असे म्हटले जाते. - खाणा-याचे खपते, कोठाराचे पोट दुखते.
- खायला काळ भुईला भार.- संस्कृतपर्यायः - पुरुषार्थहीना: भुवि भारभूता: -
कामधंदा,उद्योग न करता केवळ आळसात दिवस वाया घालवणे - खायला कोंडा अन निजेला धोंडा.-
दरिद्री माणसाची परिस्थिती अशी असते. त्याला खायला निकृष्ट अन्न मिळते आणि जमिनीवर झोपावे लागते. - खाली मुंडी, पाताळ धुंडी. -
नम्रतेचा आव आणून आपला मतलब शोधण्याची वृत्ती. - खिशात नाय जाट पण इस्त्री मात्र ताठ
- खिळ्यासाठी स्वार गेला -
थोड्याशा हयगयीमुळे फार मोठे नुकसान होणे. - खोट्याच्या कपाळी गोटा -
खोटे बोलणाऱ्याला कधी न कधी तरी शिक्षा होतेच.
मुळाक्षर ग
[संपादन]- गरज सरो,वैद्य मरो.- संस्कृतपर्यायः - 1 कार्यार्थी सर्वलोकोऽयम्।2 सङ्कटे व्यङ्कटेश:-
आपले काम झाले की ते करून देणाऱ्याशी काहीही संबंध न ठेवणे. - गरजवंताला अक्कल नसते.-
ज्याला गरज असते त्याला इतरांचे मानहानीकारक बोलणे ही ऐकून घ्यावे लागते. - गर्जेल तो पडेल काय? -संस्कृतपर्यायः -गर्जन्त: नैव वर्षन्ति। -
जो फक्त बोलतो, बढाया मारतो तो काम करत नाही. - गर्वाचे घर खाली.-संस्कृतपर्यायः - अतिदर्पे हता लङ्का।
गर्विष्ठ माणसाला एक ना एक दिवस अपमान सहन करावा लागतो. त्याचे गर्वहरण होतेच. - गवयाचं पोर सुरात रडतं.-
गवई माणसाचे गाण्याचे संस्कार त्याच्या मुलांवर आपोआप झालेले असतात. त्यामुळे असे म्हटले जाते की, ती मुले रडताना सुद्धा सुरात रडतात. - गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.- संस्कृतपर्यायः - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। -
एखादी संधी अशी मिळवायची की, ती साधता नाही आली तरी वेगळ्या प्रकारे त्या संधीचा उपयोग करून घेता येईल. - गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा.- संस्कृतपर्यायः - पुष्पमालानुषङ्गेण सूत्रं शिरसि धार्यते।
मोठ्या माणसाबरोबर छोट्या माणसांचे ही काम आपसूक होऊन जाते. - गाता गळा, शिंपता मळा.-
सतत रियाज करत राहिल्यास सूर पक्के होतात, गाणे गाता येते. तसेच नियमित पाणी मिळाल्यास मला फुलता राहतो. सरावाने परिपक्वता येते. - गाढवाला गुळाची चव काय? -संस्कृतपर्यायः -काक: पद्मवने रतिं न कुरुते।
व्यक्तीची योग्यता नसल्यास त्याला मिळालेल्या वस्तूची खरी किंमत त्याला कळत नाही. - गाढवी प्रेम अन लाथांचा सुकाळ / गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ -
सर्व मूर्ख माणसे एकत्र येतात तेव्हा फक्त गोंधळच होतो. - गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.-संस्कृतपर्यायः - काक: पद्मवने रतिं न कुरुते।
मूर्ख माणसाला तत्वज्ञान सांगून काही ही उपयोग नसतो. - गाढवाच्या पाठीवर गोणी -
एखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा. - गाढवाचा गोंधळ लाथाचा सुकाळ -
मुर्खा कडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा करू नये. - गाढवांच्या गावात गाढवी सवाष्ण -
लहान गावात क्षुद्र माणसालासुद्धा महत्त्व मिळते. - गावचा तो पांड्या, बाहेरचा तो देशपांड्या -
- गाव करी ते राव न करी.-संस्कृतपर्यायः - 1 तृणैः गुणत्वम् आपन्नैः बध्यन्ते मत्तदन्तिन:।2 संहति: कार्यसाधिका।
एकजुटीने जी कामे होतात, ती एकटा माणूस, तो कितीही कार्यक्षम असला तरी करू शकत नाही. - गुलाबाच्या झाडाला वडाचा पार, आन वासराच्या पाठीवर नांगराचा भार -
- गुलाबाचे काटे, तसे आईचे धपाटे.-
ज्या प्रमाणे काट्यामुळे गुलाबाचे रक्षण होते, त्या प्रमाणे आईने शिक्षा केली तरी त्यामुळे मुलाचे कल्याणच होते. - गुरूची विद्या गुरूस फळली.-
आपलीच युक्ती आपल्याच अंगाशी येणे. - गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य.
ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे. - गोगल गाय पोटात पाय.-संस्कृतपर्यायः - विषकुम्भ: पयोमुख:-
साळसूदपणाचा आव आणून आपले हित साधून घेणे. - गोरागोमटा कपाळ करंटा.-
बाह्यांग सुंदर असले तरी अंतरंग चांगले असेलच असे नाही. वरकरणी चांगला दिसणारा माणूस मनाने चांगला असेलच असे नाही.
मुळाक्षर घ
[संपादन]- घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात.
प्रतिकूल परिस्थिती आल्यास एरवी अनुकूल असलेल्या गोष्टी ही प्रतिकूल होतात. - घरोघरी मातीच्या चुली.
सर्वत्र परिस्थिती सारखीच असते. - घरचं झालं थोडं अन् व्याह्यांनी धाडलं घोडं.
आधीच अडचणींनी घेरलेले असताना घरच्या लोकांनी त्यात आणखी भर घालणे. - घर पाहावं बांधून.
- घरात नाही दाणा तरी मला बाजीराव म्हणा.
खिशात नाही आणा अन मला बाजीराव म्हणा.
ऐपत नसताना बडेजाव मिरवणे. - घर पाहवं बांधून आणि लग्न पहावं करुन.
या दोन्ही गोष्टी करायला आणि निभावून न्यायला अवघड आहेत, परंतु तरी ही माणूस त्या करतोच आणि नंतर पस्तावतो. - घरची करते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा.
घरच्या लोकांकडे दुर्लक्ष करून बाहेरच्यांना जवळ करणे. - घर ना दार देवळी बिर्हाड.
कोणत्याही गोष्टीत स्थिरता नसणे. - घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते.
सावध करण्याचे काम घटिका आणि घड्याळ दोघेही चोख पार पाडतात. कर्तव्यदक्ष माणसे आपल्या कामांत - कर्तव्यात कसूर करत नाहीत. - घेतला वसा टाकू नये.
संस्कृतपर्यायः - प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति।
अंगिकारलेले काम अर्धवट टाकू नये. - घोडा मैदान जवळच आहे.
निर्णयाची वेळ येऊन ठेपणे. - घोडं मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाट्यानं
गाढव मेलं ओझ्यानं, शिंगरू मेलं हेलपाट्यानं.
गाढव ओझी वाहून दमते तर त्याचे पिल्लू (शिंगरू)आईबरोबर हेलपाटे घालून दमते. विनाकारण इतरांबरोबर आपली दमणूक करून घेऊ नये. - घोडे खाई भाडे.
घोडे खाई भाडे, जीन खांद्यावर.
सर्वच व्यवस्था चुकीची. - घरच्या देवाला उपाशी आणि बाहेरच्याला तुपाशी.
घरच्यांकडे दुर्लक्ष करून बाहेरच्यांना जवळ करणे. - घेणे न देणे, कंदील लावून जाणे.
- घाण्याचा बैल .
एखाद्याला सारखे कामाला जुंपणे. - घर चंद्रमौळी पण बायकोला साडीचोळी.
- घराची कळा अंगण सांगते.
- घरात घरघर चर्चा गावभर.
मुळाक्षर च
[संपादन]- चढेल तो पडेल.
गर्वाने ताठलेल्या मनुष्याचे केव्हातरी पतन होतेच. - चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाही.
कर्तृत्व सिद्ध केल्याशिवाय मान सन्मान होत नाही. - चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे.
प्रत्येक माणसाला आपले अधिकार सिद्ध करायची संधी कधी न कधी मिळतेच. 'हर कुत्ते के भी दिन होते हैं।' - चार सुगरणी तरी सैपाक अळणी.
So many cooks spoil the broth. - चालत्या गाडीला खीळ घालणे.
सुरळीत चाललेल्या कार्यात विघ्न आणणे. - चिलटांची लढाई आणि नुसती बडाई.
- चोर सोडून सन्याश्याला फाशी./सुळी.
दोषी माणसाला सोडून निर्दोष/निरपराध माणसाला शिक्षा करणे.
संस्कृतपर्यायः -चौरापराधे माण्डव्यदण्ड:।
- चोराच्या उलट्या बोंबा.
अपराधी असून ही निरपराध आहे, असा कांगावा करणे.
संस्कृतपर्यायः - स्वयमशुद्ध: परान् आशङ्कते।
- चोराला चावला विंचू चोर करेना हुं की चुं.
- चोराच्या मनात चांदणे.
अपराधी असल्यामुळे पकडले जाण्याची भीती मनात असणे. - चोरांची पावले चोरत जाणे.
समव्यवसायी व्यक्तींना एकमेकांचे गुणदोष माहित असतात. - चोराच्या हातची लंगोटी.
ज्याच्याकडून बरेच काही मिळण्याची अपेक्षा असते, अशा माणसाकडून थोडेसे काही जरी मिळाले तरी समाधान मानावे लागते. - चोरावर मोर.- चोर तो चोर, वर शिरजोर.
कांगावा करणे. - चोरावर मोर, शेरास सव्वाशेर.
सवाई माणूस भेटणे, वरचढ व्यक्ती भेटणे. - चिंती परा येई घरा.
दुसऱ्याचे वाईट चिंतले असता तेच वाईट आपल्याबाबतीत घडते. - चामडी जाईल पण दमडी जाणार नाही.
अतिशय कंजुषपणा करणे. उष्ट्या हाताने कावळा हाकलणार नाही. - चुकला फकीर मशिदीत.
एखादी व्यक्ती विवक्षित ठिकाणी सापडते.
मुळाक्षर छ
[संपादन]- छडी लागे छमछम विद्या येई घमघम.- शिक्षकाने शिक्षा केल्याशिवाय विद्या मिळत नाही.
- छिद्र असे घरावरी , किरण पडे भीतरी .
मुळाक्षर ज
[संपादन]- जंगलात नाही वावर आणि गावात नाही घर.
- जगाच्या कल्याणा संताची विभुती.- संत सज्जनांच्या शिकवणुकीमुळे साऱ्या लोकांचे कल्याण होते.
- जनाची नाही तरी मनाची तरी जरा.- इतर कोणाशी नाही तरी स्वतःशी प्रामाणिक राहावे.
- जनात बुवा आणि मनात कावा.- एखाद्या व्यक्तीविषयी मनात दुष्ट भावना असून ही त्याच्याशी सर्वांसमोर मात्र आदराने वागणे.
- जन्मा आला हेला, पाणी वाहता मेला - कोणतेही कर्तृत्व न दाखवता जगणे.
- जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठिण.- ज्या व्यक्ती मानाने, कर्तृत्वाने, अधिकाराने मोठ्या असतात, त्यांना तसे वागताना अनेक अडचणींना, अपमानांना, विरोधाला तोंड द्यावे लागते.
- जलात राहून माशाशी वैर कशाला?- भोवताली जशी परिस्थिती असेल तसेच वागावे लागते, कोणाशी ही शत्रुत्व करू नये. 'वारा वाहील तशी पाठ फिरवावी.'
- जळतं घर भाड्याने कोण घेणार? - ज्या गोष्टीत मोठे दोष असतात, त्या गोष्टी पत्करायला, स्वीकारायला कोणी तयार होत नाही.
- जळत्या घराचा पोळता वासा - ही म्हण अशी हवी. - बडा घर पोकळ वासा. म्हणजे दिखाऊ मोठेपणा.
- जवा येतील चांगली येळ, गाजराच बी व्हतय केळं.
- जशास तसे.- समोरचा माणूस जसा वागेल तसेच आपण त्याच्याशी वागावे. चांगल्याशी चांगले तर वाईटाशी वाईट वागावे. शठं प्रति शाठ्यं ।
संस्कृतपर्यायः - 1 अपराधानुरूपो दण्ड:।2 वचनानुरूपं प्रतिवचनम्।3 शठे शाठ्यम्।
- जशी कामना तशी भावना.- मनात जशी इच्छा निर्माण होते, त्याप्रमाणेच भावना ही निर्माण होते.
- जशी देणावळ तशी धुणावळ.- जसे दाम मोजाल, तसेच काम करून मिळते.
- जशी नियत तशी बरकत.-- जशी वृत्ती तसे फळ. चांगल्या माणसाचे नेहेमी चांगले होते.
- जसा गुरु तसा चेला.- गुरू जर उत्तम असेल तर शिष्य ही उत्तम तयार होतो.
- जसा भाव तसा देव.- मनात श्रद्धा असेल तरच देव प्रसन्न होतो. मनात देवाविषयी शंका असेल
तर काम झाले तरी ही समाधान मिळत नाही.
- जळात राहून पाण्याशी वैर नको - परिस्थितीशी मिळतेजुळते घेऊन राहणे चांगले.
- जाईचा डोळा नि आसवांचा मेळा.
- जातीच्या सुंदराला सर्व काही शोभते.- सौन्दर्य, गुणवत्ता ज्याच्या जवळ असते, त्याने किती ही साधे राहिले तरी ही त्याला ते शोभून दिसते.
संस्कृतपर्यायः -किमिव हि मधुराणां मण्डनं नाकृतीनाम्?
- जामात दशम ग्रह.- ही म्हण संस्कृत आहे-- 'जामातो दशमो ग्रहः । - आकाशातील नवग्रहांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी काही न काही पूजाअर्चा, व्रतवैकल्ये केली जातात. त्याप्रमाणे जावई रुसू नये म्हणून त्याला सतत काही ना काही भेटवस्तू द्यावी लागते. म्हणून त्याला दहावा ग्रह असे म्हटले जाते.
- जातीसाठी खावी माती.
- जात्यातले रडतात सुपातले हसतात.- जोपर्यंत दुसऱ्यावर संकट, अडचणी आलेल्या असतात, तोपर्यंत आपण सुखात राहण्याची वृत्ती. तीच परिस्थिती आपल्यावर ही केव्हा ना केव्हा येणारच असते, असे मनात ही येत नाही. धान्याचे जे दाणे जात्यात भरडले जात असतात, ते जणू काही रडत असतात. आणि त्याचवेळी सुपातले दाणे जे पाखडले जात असतात, ते जणू काही हसत असतात अशी कल्पना येथे केलेली आहे.
- जात्यावर बसले की ओवी सुचते.- काम अंगावर पडले की ते आनंदाने कसे करायचे हे ही शहाण्या माणसाला आपोआप सुचत जाते.
- जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही.- मुलाची मुंज करून गळ्यात जानवे घातले की तो मुलगा ब्राह्मण होतो असे समजले जाते. परंतु जर त्याने काही विद्या, ज्ञान संपादन केलेच नाही तर त्याचे ब्राह्मण असणे केवळ नावापुरतेच राहते. म्हणजे बाह्य संस्कारांनी व्यक्तीला पात्रता प्राप्त होत नाही तर त्यासाठी मेहनत करावी लागते.
- जाळाशिवाय नाही कढ अऩ माये शिवाय नाही रड.- जसे विस्तव पेटवल्याशिवाय पदार्थ शिजत नाही.(त्याला कढ येत नाही.)तसेच माया, प्रेम असल्याशिवाय दुसऱ्याचे दुःख समजत नाही.
- जावई पाहुणा आला म्हणून रेडा दुध देईल काय?- जावई मनुष्य किती ही मानाचा असला, त्याची मर्जी राखलीच पाहिजे असे वाटत असले तरी त्यामुळे घरातील परिस्थिती बदलता येत नाही.
- जावई माझा भला आणि लेक बाईलबुध्या झाला.- जावई जर आपल्या मुलीचे खूप कौतुक करत असेल तर तो फार चांगला माणूस म्हणून त्याचेही कौतुक होते, पण आपला मुलगा जर त्याच्या बायको चे म्हणजे आपल्या सुनेचे कौतुक करत असेल तर तो मात्र बायकोच्या तंत्राने चालणारा म्हणजे बाईलबुध्या ठरतो.
- जावयाचं पोर हरामखोर.- आपली मुलीची मुले म्हणजे जावयाची मुले ही त्यांच्याच घरी म्हणजे जावयाच्या घरीच जास्त रमतात. इतकेच नव्हे तर आजोळी घडलेल्या गोष्टीविषयी तक्रारी सुद्धा सांगतात.
- जावा जावा आणि उभा दावा.- दोन बहिणींचे एकमेकींशी जसे पटते तसे दोन भावांच्या बायकांचे म्हणजे जावा-जावांचे पटत नाही. कारण त्या वेगवेगळ्या घरातून, वेगवेगळ्या वातावरणातून सासरी आलेल्या असतात.
- जावा जावा हेवा देवा.- दोन सख्ख्या भावांच्या बायका मात्र प्रेमाने एकत्र नांदत नाहीत. त्यांच्यात नेहमीच भांडणे असतात. एकमेकींविषयी असूया, तिरस्कार, राग अशा भावना मनात असतात.
- जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे - स्वतःवर प्रसंग ओढवला म्हणजेच त्यातील अडचणींचे खरे ज्ञान होते.
- जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.- ज्याच्या कडून आपला स्वार्थ साधला जाणार असतो, त्या माणसाची स्तुती करण्याची वृत्ती.
- जिकडे सुई तिकडे दोरा.
- जिच्या घरी ताक तिचे वरती नाक.- घरी ताक असणे म्हणजे समृद्धी असणे. त्यामुळे ज्याच्या कडे पैसे आहेत, त्याच्या शब्दाला मान असतो. दाम करी काम.
- जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उध्दारी.- पाळण्याची दोरी हातात असणे म्हणजे पालनपोषण करणे. आईच आपल्या मुलांचे संगोपन करत असताना त्यांना सुसंकृत करते, शिकवते, घडवते. म्हणजे चांगला नागरिक बनवते. चांगला नागरिक असणे म्हणजे एक प्रकारे जगाचा उद्धार करणे होय. कारण त्यामुळेच समाज सुसंस्कृत होत असतो.
- जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.- माणसाला लागलेल्या वाईट सवयी कधी सुटत नाहीत.
संस्कृतपर्यायः - स्वभावो दुरतिक्रम:।
- जिथे कमी तिथे आम्ही.- कोणाचे ही काहीही काम अडले असल्यास मदतीला सदैव तत्पर असणे.
- जी नाही गोंदणार ती नाही नांदणार.
- जी खोड बाळ ती जन्मकाळा - बालपणी जडलेल्या सवयी जन्मभर राहतात.
- जुनं ते सोनं नवं ते हवं.- जुन्या वस्तुंविषयी प्रेम असतेच, परंतु नव्या वस्तू सुद्धा हव्याशा वाटतात.
- जुने ते सोने.- सर्व जुन्या गोष्टींबद्दल प्रेम असणे.
- जे न देखे रवि ते देखे कवी.- - सूर्यकिरणे जेथे जेथे पोहोचतात, तेथे तेथे प्रकाशाने सर्वकाही उजळून जाते. परंतु त्याला माणसाच्या मनात डोकावता येत नाही. कवी मात्र माणसांच्या भावभावना जाणून कवितेतून त्या व्यक्त करतो. म्हणून त्याची शक्ती सूर्यापेक्षा जास्त आहे असे म्हटले जाते.
संस्कृतपर्यायः - कवि: द्रष्टा रवे: अपि।
- जे पिंडी ते ब्रम्हांडी.-
- जे फुकट ते पौष्टीक.
- जेथे पिकतं तिथे विकतं नाही.- कोणतीही गोष्ट अति होते, मुबलक प्रमाणात मिळते, तेव्हा तिची किंमत कमी होते.
- जेथें नगाऱ्याची घाई तेथें टिमकी काय जाई
- जेवान जेवाव पंगतीत अन मरान मागावं उमदीत.
- जेवीन तर तुपाशी, नाहीतर उपाशी - हटवादीपणाची वागणूक. ही म्हण अशी आहे -- खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी. या ठिकाणी हटवादीपणा बरोबरच खोटी मिजास ही दाखवलेली असते.
- जो गुण बाळा तो जन्म काळा.
- जो नाक धरी, तो पाद करी.
- जो श्रमी त्याला काय कमी.--ज्या माणसाची कष्ट करण्याची तयारी असते त्याला कधीच काही कमी पडत नाही.
- जोकून खाणार, कुंथुन हागणार.
- जोवरी पैसा तोवरी बैसा.- या म्हणीला समानार्थी अशा पुढील दोन म्हणी आहेत.-- दाम करी काम. असतील शिते तर जमतील भुते.जोपर्यंत माणसाजवळ पैसे असतात तोपर्यन्त त्याला मान दिला जातो.
- ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी - एकमेकांची पक्की ओळख असणाऱ्या व्यक्ती.
- ज्या गावाला जायचे नाही त्या गावचा रस्ता विचारू नये.- उगाच नसत्या चौकश्या करू नयेत.
- ज्याचं करावं भलं तोच म्हणतो आपलचं खर.- हिताची गोष्ट सांगितली तरी ती पटत तर नाहीच, उलट आपलेच म्हणणे बरोबर आहे, असे ठामपणे म्हणणे.
- ज्याचं जळतं त्यालाच कळतं.- ज्याचे नुकसान होते, त्यालाच त्याची जाणीव प्रकर्षाने होते.इतरांना ते दुःख कळत नाही.
- ज्याचं त्याला आणि गाढव वझ्याला.
- ज्याचा त्याला चोप नाही आणि शेजाराला झोप नाही.
- ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी.- नोकराने मालकाशी ईमानदारीने वागावे. त्याला फसवू नये.
- ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी - आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने, उपकार घेतले की लाचारी.
- ज्याची दळ त्याचे बळ.
- ज्याचे पदरी पाप त्याला मुली आपोआप.
- ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल - ज्याचे त्याचे दुःख तोच निवारण करतो.
- ज्याच्या हाती ससा तो पारधी - डोळ्याला प्रत्यक्ष दिसतो तोच पुरावा मानला जातो.
- ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं.
- ज्याला आहे भाकरी त्याला कशाला चाकरी.
- ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल.
- ज्याला समजावा कोरड्या पाटीचा तोच निघाला आतल्या गाठीचा.
- ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार? - पेराल तेच उगवते. चांगले वागलं तर चांगले फळ मिळेल. वाईट वागाल तर वाईट गोष्टीच फळ म्हणून मिळतील.
मुळाक्षर झ
[संपादन]- झालं गेलं गंगेला मिळालं.
- झोपून हागणार उठून बघणार
- झाकली मूठ सव्वा लाखाची - कोणताही दुर्गुण उघड करून दाखवू नये.
संस्कृतपर्यायः - 1 आत्मच्छिद्रं न प्रकाशयेत्।2 रक्षेद् विवरम् आत्मन:।
- झाड जावो पण हाड न जावो.
- झाडाजवळ छाया , बुवाजवळ बाया.
- झाडाला कान्हवले आणि आडात गुळवणी.
मुळाक्षर ट
[संपादन]- टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही - कष्टाशिवाय थोरपण प्राप्त होत नाही.
संस्कृतपर्यायः - हेम्न: संलक्ष्यते ह्यग्नौ विशुद्धि: श्यामिकापि वा।
- टाळी एका हाताने वाजत नाही.--- एकच व्यक्ती कोणत्याही गोष्टीला जबाबदार नसते इतरही गोष्टी तेवढ्याच जबाबदार असतात.
- टक्केटोणपे खाल्ल्यावाचून मोठेपण येत नाही.--बरे वाईट प्रसंगाच्या अनुभवातूनच माणूस मोठा होत असतो.
- टिटवेदेखील समुद्र आटविते.
मुळाक्षर ठ
[संपादन]- ठकास महाठक.
- ठेवले अनंते तैसेची रहावे.--देवाने आपल्याला जसे ठेवले आहे त्यात आनंद मानून राहावे.
- ठोसास ठोसा.
- ठक ठकाला फसवील तो इतरा कां न ठकविल?
- ठकाला ठकविणें हे योग्य करणें.
- ठेंच लागल्यावाचून स्मरण होत नाहीं. --
- ठेवितां उघडे कवाड, चोरीस मिळते सवड.--घराचे दरवाजे उघडे ठेवले तर चोरांना आयती संधी मिळते.
मुळाक्षर ड
[संपादन]- डोळ्यात केर आणि कानात फुंकर - रोग एक अन् उपाय भलताच करणे.
- डोळा तर फुटू नये, काडी तर मोडू नये - कोणाचे मन न दुखवता सौम्यपणे काम करावे.
- डोंगर पोखरला, उंदीर काढणे - अचाट परिश्रम करून क्षुद्र काम साध्य करून घेणे.
- डोंगराएवढी हाव, तिळा एवढी धाव.
- डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही.
मुळाक्षर ढ
[संपादन]- ढवळ्याशेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला - वाईट संगतीने चांगलाही बिघडतो.
- ढुंगणाला नाही लंगोटी आणि मला म्हणा दिपुटी.
- ढोंग धतोरा, हाती कटोरा.
- ढोरात ढोर , पोरात पोरं.
मुळाक्षर ण
[संपादन]मुळाक्षर त
[संपादन]- त वरून ताकभात.
- तळे राखील तो पाणी चाखील - सोपवलेल्या कामातून स्वतःचा थोडा तरी फायदा करून घेतातच.
संस्कृतपर्यायः - रक्षको भक्षयेदेव।
- तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्या झाल्या हरण्या.
- तवा खातो भाकर चुल्हा भुकेला, पोहरा पितो पाणी रहाट तहानलेला
- तहान लागल्यावर विहीर खणणे - आयत्या वेळी कामाला आरंभ करणे.
संस्कृतपर्यायः - सन्दीप्ते भवने तु कूपखननं प्रत्युद्यम: कीदृश:?
- ताकाला जाऊन भांडे लपवणे - आढेवेढे घेऊन मागणे.
- ताकापुरते रामायण.
- ताटावरले पाटावर पाटावरचे ताटावर - श्रीमंती चैनी वृत्ती.
- तुपात तळले, साखरेत घोळले तरी कारले कडू ते कडूच.
- तुझं माझं जमेना अन तुझ्या वाचुन करमेना.
- तुला न मला घाल कुत्र्याला--दोघांमधील भांडणामुळे तिसर्या व्यक्तीचा फायदा होणे.एखादी गोष्टं दोघानाही न मिळता फुकट जाणे.
- तेलही गेले, तुपही गेले, हाती आले धुपाटणे - मूर्खपणाने सर्वच घालून बसणे.
संस्कृतपर्यायः - अतो भ्रष्ट: ततो भ्रष्ट:।
- तेलजीचं तेल जळे मशालजीची --ड जळे.
- तेरड्याचा रंग तिन दिवस.
- तंटा मिटवायला गेला, गव्हाची कणिक करून आला.-- भांडण न संपता अजून वाढणे.एखादी गोष्ट जास्त बिघडणे.
- तोंड दाबून बुक्क्यांचा मार - स्वतःच्या बचावासाठी काही सांगता न येणे.
मुळाक्षर थ
[संपादन]- थंडी येताना मुका घेते आणि जाताना पाया पडते.- थंडीने आरंभी ओठ फुटतात आणि शेवटी पाय फुटतात.
- थांबला तो संपला.--काळाबरोबर जो पुढे जात नाही तो प्रगती करू शकत नाही.
- थेंबे थेंबे तळे साचे - हळू हळू सवय केली तर कालांतराने त्यातून मोठा संग्रह होतो.
संस्कृतपर्यायः - बिन्दुश: पूर्यते सिन्धु:।
- थाट राजाचा, दुकान भाडगुंजाचे.
- थोडक्यात नटावे अन प्रेमाने भेटावे. - आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा आणि समाजातील घटकांशी प्रेमाने वागावे.
- थोरा घराचे श्वान त्याला देती सर्व मान - मोठ्यांचा आश्रय घेतल्याने सामान्यालाही फुकटचा मान मिळतो.
मुळाक्षर द
[संपादन]- दगडापेक्षा वीट मऊ - निरुपाय असल्यास मोठ्या संकटापेक्षा लहान संकट पत्कारणे.
संस्कृतपर्यायः - पाषाणादिष्टिका वरा।
- दगडावरची रेष - दृढनिश्चय.
- दाम करी काम - पैशाने सर्व साध्य होते.
संस्कृतपर्यायः -1 द्रव्येण सर्वे वशा:।2 सर्वे गुणा: काञ्चनमाश्रयन्ते।
- दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत - एकमेकाला पूरक अशा दोन्ही गोष्टी असल्यास उपयोग होतो.
- दात कोरून पोट भरत नसते - मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून भागत नाही.
- दुधाने तोंड पोळल्यास ताकही फुंकून घ्यावे - एकदा अद्दल घडल्यावर सावधगिरीने वागावे.
- दुसर्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही - स्वतःच्या अंगातील मोठे दोषही माणसाला जाणवत नाही.
- दुभत्या गायीच्या लाथा गोड - ज्याच्यापासून फायदा होतो त्याचे दोषही सहन करावे लागते.
- दुरून डोंगर साजरे - कोणत्याही व्यक्तीचे दोष पूर्ण सहवासाशिवाय जाणवत नाही.
- दुष्काळात तेरावा महिना.--कठीणप्रसंगामध्ये अजून जास्त संकटे येणे.
संस्कृतपर्यायः -गण्डस्य उपरि पिटक:
- दुःख रेड्याला न डाग पखालीला.
- दुखणे हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जाते.
- दृष्टीआड सृष्टी - नजरेआड होणाऱ्या गोष्टींचा जास्त ऊहापोह करू नये.
- दिव्याखाली अंधार - स्वतःकडे असलेल्या गुणांचा स्वतःलाच उपयोग होत नाही.
- दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.--वाईट माणसाचे बाह्य रूप चांगले आहे म्हणून जर विश्वास ठेवला तर फसगत होते.
- दिवस गेला उटारेटी, चांदण्यात बसली कापूस वेचीत.--नाकोत्या वेळी नको ते काम करणे.
- दिसतं तस नसतं म्हणून तर जग फसतं.--वाईट माणसाचे बाह्य रूप चांगले आहे म्हणून जर विश्वास ठेवला तर फसगत होते.
- दिवस गेला उठारेटी चांदण्याचे पोहे कुटी.--नकोत्या वेळी नको ते काम करणे.
- दीड दिवसात अन कोल्हं उसात.
- दे माय धरणी ठाय - संकटाने मनाचा धीर सुटणे.
- देवाचं नावं अऩ स्वताच गावं.
- देणं न घेणं आणि कंदील घेऊन येणं.
- देह देवळात अन चित्त पायताणात
- देवाघरचा पवा वाजतो कवा कवा.
- दे दान सुटे गिऱ्हाण.
- दे गा हरी पलंगावरी।
- देखल्या देवा दंडवत - सहजगत्या दाखविलेला आदर भाव - तोंडापुरता आदर.
- देव तारी, त्याला कोण मारी.--ज्याच्यावर देवाची कृपा असते त्याचे कोणी काही वाईट करू शकत नाही
संस्कृतपर्यायः - अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितम्।
- देवाची करणी आणि नारळात पाणी.
- देश तसा वेष, राजा तशी प्रजा - परिस्थितीप्रमाणे वर्तन पालटणे.
संस्कृतपर्यायः - 1 यथा देशस्तथा वेश:।2 यथा राजा तथा प्रजा।
- दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी - मित्र जवळ रहात असूनही बरेच दिवस भेट घडत नाही.
- दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ.
- दोहो घरचा पाहुणा उपाशी - धरसोडवृत्तीमुळे कोणतेच यश पदरी पडत नाही.
- दैव देते आणि कर्म नेते - स्वतःच्या चुकीच्या वागणुकीने नुकसान करून घेणे.
- दृष्टी आड सृष्टी.
- दृष्टी सर्वांवर प्रभुत्व एकावर.
मुळाक्षर ध
[संपादन]- धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय.
- धड गाढव ना ब्रह्मचारी.
- धड हिंदू ना मुसलमान.
- धन असल्या पाताळी, तेज दिसे कपाळीं.
- धन असल्या बहु भय, नसल्याने तापत्रय.
- धावत्यापाठी यश.
- धुतल्या तांदळाला खडा.
- धावल्याने धन मिळत नाही.
- धर्माचे गाई आणि दात का गे नाही - फुकट मिळालेल्या वस्तूमध्ये खोड काढू नये.
- धर्म करता कर्म उभे राहते - परोपकार करण्यास गेले असता संकटात सापडणे.
मुळाक्षर न
[संपादन]- न खाणार्या देवाला नैवेद्य - कोणतीही वस्तू न स्वीकारणाऱ्या आग्रह करणे.
- नवर्याने मारलं आणि पावसाने झोडपलं तरी तक्रार कुणाकडे करायची?
- न कर्त्याचा वार शनिवार - सबब सांगून नेहमी कामाची टाळाटाळ करणे.
- नरो वा कुंजरो.--कोणत्याही परिस्थितीत तटस्थ रहाणे.
- नव्याची नवलाई.--नवीन गोष्टीचे महत्व थोडे दिवस असते.
- नव्याचे नऊ दिवस - कोणत्याही गोष्टीचे नवेपणाचे कौतुक फार टिकत नाही.
- नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न - दुर्दैवी माणसाच्या कामात अनेक संकटे येतात.
- नकटे असावे, पण धाकटे असू नये - धाकट्यावर सगळे अधिकार गाजवतात.
- नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे.
- न लागो पुत्राचा हात पण लागो डोंब्या महाराची लाथ.
- नको तिथं बोटं घालू नये, घातलेच तर वास घेत बसू नये.
- नगाऱ्याची घाय तिथे टिमकीचे काय?
- नमनाला घडाभर तेल.
- नवरा केला सुखासाठी, पैसा नाही कुकासाठी.
- नवरा नाही घरी सासरा जांच करी.
- नवा कावळा शेण खायला शिकला.
- नवी विटी नवे राज्य - कोणत्याही गोष्टीला आरंभ होताना सर्वच गोष्टी पहिल्यापासून सुरू होतात.
- नाकापेक्षा मोती जड - कमी दर्जाचा माणूस शिरजोर होणे.
संस्कृतपर्यायः -गात्राद् गुरु: अलङ्कार:।
- नाक नाही धड अन् तपकीर ओढ
- नाक कापले तरी दोन भोके आहेत.
- नाक दाबले की तोंड उघडते - मर्मावर आघात केल्याशिवाय वठणीवर येत नाही.
- नाकावर पदर अन विशीवर/वेशीवर नजर.
- नागड्या कडे उघडा गेला आणि हिवाने मेला.
- नागिन पोसली आणि पोसणाराला डसली.--वाईट गोष्ट जवळ बाळगल्या वर ती कधी ना कधी उलटतेच
- नागोबा म्हसोबा पेंश्याला दोन, पंचमी झाल्यावर पुजतयं कोण?
- नाचता येईना म्हणे अंगण वाकडे, रांधता/स्वयंपाक येईना म्हणे ओली लाकडे - आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नाव ठेवणे.
- नात्याला नाही पारा, निजायला नाही थारा.
- नाव मोठे लक्षण खोटे - बाहेरचा भपका जास्त, कृतीच्या नावाने शून्य.
- नाव गंगुबाई अऩ तडफडे तहानेने.
- नांव अन्नपुर्णा, टोपल्यात भाकर उरेना.
- नांव गंगाबाई, रांजनात पाणी नाही.
- नांव महीपती, तीळभर जागा नाही हाती.
- नांव मोठे लक्षण खोटे.--नाव मोठे असले तरी त्याप्रमाणे वर्तन नसणे.
- नांव सगुणी करणी अवगुणी.-- नाव चांगले असणे पण कर्म वाईट करणे.
- नांव सुलोचना आणि डोळ्याला चष्मा.
- नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा - नाव मोठे पण कर्तबगारी शून्य.
- नाम असे उदार कर्ण, कवडी देता जाई प्राण.
- नावडतीचे मीठ अळणी - नावडत्या माणसाने केलेली चांगली गोष्टही पसंत पडत नाही.
- नाज़ुक नार चाबकाचा मार
- ना घरचा ना घाटचा.
- नांदणाऱ्याला पळ म्हणायचे आणि पळणाऱ्याला नांद म्हणायचे.
- नारो शंकराची घंटा.
- नालासाठी घोडं.
- नाचले मिरे जोंधळ्याला हार जात नाही - थोर व्यक्तीला वाईट दशा आली तर क्षुद्र माणसामुळे श्रेष्ठत्व लपत नाही.
- नाव्ह्याचा उकरंडा कितीही उकरला तरी केसच निघणार.
- नाही चिरा, नाही पणती.
- नाही निर्मल मन काय करील साबण.
- निर्लज्याच्या गांडीवर घातला पाला गार लागला अजून घाला.
- निजुन हागायचं आणि उठुन बघायचं.
- नेमेचि येतो मग पावसाळा.
- नेशीण तर पैठणी नाहीतर नागवी बसेन.
- न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा.
- निंदकाचे घर असावे शेजारी.
मुळाक्षर प
[संपादन]- पदरी पडले आणि पवित्र झाले - एकदा स्वीकारलेल्या गोष्टीच्या दोषाकडेही दुर्लक्ष करावे.
संस्कृतपर्यायः - 1 अङ्गीकृतं सुकृतिन: परिपालयन्ति।2 प्राप्तं प्राप्तमुपासीत।
- पडतील स्वाती तर पिकतील मोती.
- पडत्या फळाची आज्ञा - इच्छेप्रमाणे एक गोष्ट घडून येणे.
- पडलो तरी नाक वर.
- पहिले पाढे पंच्चावन्न.
- पोटात नाही दाणा आणि म्हणे रामकृष्ण म्हणा.
- पात्र पाहून दान.
- पाण्यात राहून माशाशी वैर करु नये.
- पालथ्या घड्यावर पाणी - निष्फळ श्रम
संस्कृतपर्यायः - अरण्यरुदितं कृतं श्वपुच्छम् अवनामितम्।
- पाचपन्नास आचारी, वरणामध्ये मीठ भारी.
- पाचामुखी परमेश्वर - पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे.
- पादा पण नांदा.
- पाचही बोटं सारखी नसतात.
- पाटलाचं घोडं महाराला भुषण.
- पाण्यात राहून माशाशी वैर?णे
संस्कृतपर्यायः - नक्र: स्वस्थानमासाद्य गजेन्द्रमपि कर्षति।
- पाण्यात म्हैस वर मोल
- पाण्यावाचून मासा झोपा घेई केसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
- पादऱ्याला पावट्याचे निमित्त.
- पाषाणाला पुरणपोळी, माणसाला शिळीपोळी (शिवीगाळी)
- पाहुण्याच्या काठीने साप मारणे.
संस्कृतपर्यायः - परस्य दण्डेन अपरस्य ताडनम्।
- पायावर पाय/पावलावर पाऊल ठेवुन चालणे.
- पायलीची सामसूम, चिपट्याची धामधूम
- पाय धू तर म्हणे तोडे केवढ्याचे ? - जे करायचे ते सोडून भलत्या गोष्टीची उठाठेव करणे.
- पायची वहाण पायीच बरी - जेवढी योग्यता तेवढाच मान द्यावा.
- पी हळद अन् हो गोरी - कोणत्याही कामाचे फळ ताबडतोब मिळेल असा उतावीळपणा करू नये.
- पळसाला पाने तीनच - कोठेही गेले, तरी मनुष्यस्वभाव सारखाच.
- पुढच्यास ठेच मागचा शहाणा - दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो.
- पूर्वेचा सूर्य पश्चिमेला - अशक्य वाटणारी गोष्ट घडून येते.
- पुरूषाचे मरण शेती, बायकांचे मरण वेती.
- पै दक्षणा लक्ष प्रदक्षिणा - द्यायचे थोडे काम मात्र चापून करून घेणे.
- पेरावे तसे उगवते.
- पैशाकडेच पैसा जातो.
- परस्त्री मातेसमान.
- पोकळ वाशांचा आवाज मोठा.
- पंकज वर पाण्याचा मोती होतो.
- पिंडीवर बसला म्हणून विंचवाची गय करुन चालत नाही.
- पिंडी ते ब्रम्हांडी - स्वतःवरून जगाची पारख व्हावी.
- प्रथमग्रासे मक्षिकापातः
- प्रयत्नांती परमेश्वर - प्रयत्नांती अवघड गोष्ट ही साध्य होते.
- प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेलही गळे.
- पिकतं तेथे विकत नाही .
- पुराणातील वानगी पुराणात - शास्त्रवचने ऐकायला बरी असली तरी आचरणात आणणे कठीण.
- पिकले पान केव्हातरी गळून पडणारच.
- पुत्र मागण्यास गेली भ्रतार नवरा घालवून आली.
मुळाक्षर फ
[संपादन]- फार झाले हसू आले - दुःखाचा अतिरेक झाल्यावर खेदाची भावना बोथट होते.
- फुकट दर्शन , देवळात दाटी.
- फुकटचा गाल केला लाल.
मुळाक्षर ब
[संपादन]- बळी तो कान पिळी - बलवान इतरांवर हुकुमत गाजवतो.
संस्कृतपर्यायः - वीरभोग्या वसुन्धरा
- बडा घर पोकळ वासा - खोटा डामडौल मिरवणे.
- बारा लुगडी तरी बाई उघडी.
- बाईल वेडी लेक पिसा, जावई मिळाला तोहि तसा.
- बाजारात तुरी भट भटणीला मारी.
- बाप दाखव नाही तर श्राध्दं कर.- समोरासमोर खरे खोटे करणे.
- बाप तसा बेटा, संडास तसा लोटा
संस्कृतपर्यायः - यथा बीजं तथाङ्कुर:।
- बाप तसा बेटा - बापाचे गुण मुलांच्या अंगी असतात.
- बड्या बापाचा बेटा - वडिलांच्या मोठेपणावर डौल मिरवणारा.
- बाबा गेला आणि दशम्याही गेल्या.
- बाब्या गेला दशम्याही गेल्या - दोन्ही गोष्टींना मुकणे.
- बाइल गेली अन सोपा केला.
- बाळाचे पाय पाळ्ण्यात दिसतात.-लहानपणीच्या गुणावरूनच मोठेपणी ती व्यक्ती कशी होणार ते समजते.
- बाजारात तुरी भट भटणीला मारी - कामा अगोदरच व्यर्थ वादविवादात वेळ घालवणे.
- बावळी मुद्रा देवळी निद्रा - अत्यंत व्यवहारचतुर मनुष्य
- बुडत्याचे पाय खोलात - अडचणी निवारण्यासाठी केलेल्या प्रयत्नात संकटात सापडणे.
संस्कृतपर्यायः - विवेकभ्रष्टानां भवति विनिपात: शतमुख:।
- बुडत्याला काडीचा आधार.- अडचणीच्या वेळी छोटी मदत पण खुप मोठी वाटते.
- बिगारीचे घोडे तरवडाचा फोक - फुकट मिळालेल्या वस्तूची काळजी कोणी घेत नाही.
- बेशरमाच्या ढुंगणाला फुटले झाड तो म्हणतो मला सावली झाली.
- बोलण्यात पट्टराघू, कामाला आग लावू.
- बोलाचीच कढी अऩ बोलाचाच भात.
संस्कृतपर्यायः - वचने का दरिद्रता?
- बोलेल तो करेल काय? गरजेल तो पडेल काय?
- बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.-ज्या व्यक्तीचे बोलणे आणि कृती ह्यात एकसमानता आहे ती व्यक्ती वंदनीय आहे.
- बैल गेला अन् झोपा केला - गोष्ट घडून गेल्यावर त्याच्या निवारणाची सोय करणे.
संस्कृतपर्यायः - निर्वाणदीपे किमु तैलदानम्?
मुळाक्षर भ
[संपादन]- भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी - थोडीशी सवलत मिळताच अधिक गैरफायदा घेणे.
- भरवशाच्या म्हशीला टोणगा - खात्रीदायक वाटणाऱ्या गोष्टीत अपेक्षाभंग होणे.
- भित्याच्या पाठी ब्रह्मराक्षस - भित्रा मनुष्य आपल्या भित्रेपणामुळे जास्त संकटे ओढवून घेतो.
संस्कृतपर्यायः - भीतं भापयते विधि:
- भीक नको, पण कुत्रे आवर - उपकार करायचे नसेल तर निदान अपकार करू नयेत.
- भिकेची हंडी शिंक्याला चढत नाही - दुसऱ्यावर अवलंबून राहणारा सदा दरिद्रीच असावयाचा.
- भुकेला कोंडा अन् निजेला धोंडा - खरी भूक लागली तर जसे अन्न गोड लागते तशी खरी झोप कोठेही लागते.
- भरल्या ब्राह्मणाला दही करकरीत.
- भुकेच्या तापे करवंदीची कापे.
- भुकेला पिकलं काय? अऩ हिरवं काय?
- भले भले गेले गोते खात, झिंझुरटे म्हणे माझी काय वाट?
- भुरट्याला तुरा, तर पोशिंद्याला धतुरा
- भागीचे घोडे किवणाने मेले.
मुळाक्षर म
[संपादन]- मरावे परी कीर्तीरुपे उरावे.- माणसाची जर कर्मे चांगली असतील तर मेल्यानंतर सुद्धा त्याच्या कामासाठी लोकं त्याला कायम लक्षात ठेवतात.उ.दा.बाबा आमटे
- मन चिंती ते वैरीही न चिंती.
- मनी वसे ते स्वप्नी दिसे - मनाची प्रबल इच्छा स्वप्नरूपात दिसते.
- मला नं तुला, घाल कुत्र्याला.-दोघांच्या भांडणात तिसऱ्या व्यक्तीचा फायदा होणे.
- मला पहा अऩ फुले वहा.- स्वतःच स्वतःला मोठेपणा देणे.
- महापुरे जेथे झाडे जाती, तेथे लव्हळी वाचती.
- मनात मांडे पदरात धोंडे - मनोराज्यात असली तरी प्रत्यक्षात काय मिळेल ते पहावे.
- माकड म्हणतं माझीच लाल.
- माकडाच्या हातात कोलीत - खोडकर माणसाला खोड्या करण्यासाठी उत्तेजन देणे.
- माणूस पाहून शब्द टाकावा, अऩ जागा पाहून घाव मारावा.-योग्य व्यक्ती जागा,वेळ पाहून काम साधणे.
- माय मरो पण मावशी उरो.
- माशीची धाव जखमेवर.
- मातीचे कुल्ले वाळले कि पडायचेच.
- मिया मुठभर, दाढी हातभर.
- मी नाही त्यातली अऩ कडी लावा आतली.
- मेल्या म्हशीला शेरभर दुध.
- मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही.
- मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही.
- मोडेन पण वाकणार नाही.- हट्टी असणे.
- मोर नाचला म्हणून लांडोराने नाचू नये.
संस्कृतपर्यायः -न देवचरितं चरेत्
- मोह सुटेना अऩ देव भेटेना.
- म्हननाऱ्यानं म्हण केली, अऩ जाननाराले अक्कल आली.
- म्हसोबाला नव्हती बायको अऩ सटवीला नव्हता नवरा.
- म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो.
- मांडीखाली आरी अन चांभार पोरे मारी
- मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये - चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.
- मुलाचे पाय पाळण्यात दिसतात - मोठेपणी मुलगा कसा वागेल याची लक्षणे लहानपणीच दिसतात.
- मारणाऱ्याचे हात हरवतात पण बोलणाऱ्याचे तोंड धरवत नाही - आपली निंदा बंद करणे आपल्या हातात नसते.
- मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची - दिसण्यात सोपी पण करण्यास अशक्य कृती.
- मुंगीला मुताचा पूर - थोडेसे संकट क्षुद्राला भारी ठरते.
- मुंगी होऊन साखर खावी, हत्ती होऊन लाकडे मोडू नयेत - त्रासदायक मोठेपणापेक्षा सुखदायक छोटेपणा पत्कारणे चांगले.
मुळाक्षर य
[संपादन]- यथा राजा तथा प्रजा - श्रेष्ठ व्यक्तीचा प्रभाव सर्वसामान्य माणसांच्या वागणुकीत दिसतो.
- येळला केळं अऩ वनवासाला सिताफळं.
- येरे माझ्या मागल्या अन कण्या भाकरी चा॑गल्या.
- येडं पेरलयं अन उगवलयं खुळं.
- याची देही याची डोळा.
- या बोटाची थुंकी त्या बोटावर - भामटेगिरी करून दुसऱ्याला फसवणे.
- या हाताचे त्या हातावर - वाईट कृत्याचे ताबडतोब फळ मिळते.
- येरे माझ्या मागल्या, ताककण्या चांगल्या - अनुभवाने पूर्व पदाला येणे.
- यजमान सुस्त आणि चाकर मस्त.-मालकाचे जर लक्ष नसेल तर नोकर माणसेही काम करीत नाही.
- यत्न करून पहावा, फळ देवाधीन.-प्रयत्न करणे माणसाच्या हाती आहे तर फळ देणे परमेश्वराच्या हाती.
- यत्न जोड, आळस मोड.-आळस सोडून काम करावे.
मुळाक्षर र
[संपादन]- रंग झाला फिका आणि देईना कुणी मुका.
- राजा उदार झाला अऩ हाती भोपळा दिला.
संस्कृतपर्यायः -दातृत्वमीदृशं तेषां न गले न च तालुके।
- राजा तशी प्रजा.
- राजा बोले अऩ दल चाले.
- राजाचे जाते अन् कोठावळ्याचे पोट दुखते - क्षुद्रवृत्तीच्या माणसाला दुसऱ्याचा उदारपणाही त्रासदायक होतो.
- राजाला दिवाळी काय ठाऊक? - नेहमी सुखातचैनीत राहणाऱ्यांना दिवस विशेष वाटत नाही.
- रात्र थोडी अन् सोंग फार - कामे पुष्कळ आणि त्या मानाने वेळ थोडा.
- राव गेले पंत चढले
- रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी - रिकामपणी निरर्थक उद्योग करणे.
- रिकामा सुतार बायकोचे कुल्हे ताशी.
- रोज मरे त्याला कोण रडे - वारंवार तीच गोष्ट घडण्याने तिच्यातील स्वारस्य जाते.
संस्कृतपर्यायः - अतिपरिचयादवज्ञा
- रोज घालतंय शिव्या अन एकादशीला गातंय वव्री
- रिकामपणाच्या अंती, अनेक कल्पना सुचती.
- रेडा तर रेडा, म्हणे धारभर ओढा.
- रोख,ठोक,भवानी चोख.
- रिकामा सुतार कुलें तासी.
- रिणको धनकोचा दास.
- रिकाम्या पोटास कान नसतात व रात्रही शहाणपण आणिते.
- रिकामा न्हावी, कुडाला तुंबड्या लावी.
- रोज मरे त्यास कोण रडे.
- रेड्यापड्याचे झुंज, झाडा माडास मरण.
- रहावें तेव्हां रुसूं नये व जावें तेव्हां पुसूं नये.
- रोगाचे घर निरुद्योग, मृत्यूचे घर रोग.
- रोगी मेल्यावरी, वैद्य आला घरी.
- रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं.
- राखणदार दरात नि चोर शिरला घरात
मुळाक्षर ल
[संपादन]- लग्न बघावे करून अऩ घर पहावे बांधून.
- लबाडाचे आमंत्रण जेवल्याबिगर खोटे.
- लहान तोंडी मोठा घास - पात्रता नसताना मोठेपणाच्या गोष्टी बोलणे.
संस्कृतपर्यायः - लघुतुण्डे गुरुपिण्ड:
- लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, संपत्ती, आरोग्य लाभे.
- लकडीवाचून मकडी वळत नाही - मुर्खाला वठणीवर आणण्यासाठी मार देणेच योग्य.
- लगा लगा मला बघा.
- लाखाचे बारा हजार.-मोठे नुकसान होणे.
- लाथ मारेन तिथे पाणी काढीन - कर्तृत्वाने पुरुष कोठेही यशच मिळवितो.
- लेकी बोले सुने लागे - एकास उद्देशून पण दुसर्याला लागेल असे बोलणे.
- लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण - लोकांना उपदेश करणे व आपण त्याविरुद्ध वागणे.
- लंकेत सोन्याच्या विटा - ज्या गोष्टींचा आपल्याला कोणताच उपयोग होत नाही अशी गोष्ट.
संस्कृतपर्यायः - शून्यालये दीपवत्
- लाखाशिवाय बात नाही अन् वडापाव शिवाय काही खात नाही .-उगाच मोठेपण्याच्या बाता मारणे.
मुळाक्षर व
[संपादन]- वराती मागून घोडे.
ddddd
- वळ ऊठला पण संशय फिटला.
- वळणाचे पाणी वळणाला.
- वळचणीचे पाणी आढ्याला चढत नाही - क्षुद्र माणसाने कितीही प्रयत्न केला तरी अशक्य गोष्ट शक्य होत नाही.
- वळचणीचे पाणी वळचणीला.
संस्कृतपर्यायः - प्रकृतिं यान्ति भूतानि
- वाचेल तो वाचेल.- वाचनाने ज्ञान वाढते आणि आपले आयुष्य समृद्ध होते.
- वाजे पाउल आपले म्हणे मागून कोण आले.
- वासरात लंगडी गाय शहाणी - अडाणी लोकांत अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते.
संस्कृतपर्यायः - निरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते।
- वाळूत मुतलं फेस ना पाणी.
- वाचाळ सासु, नाठाळ सून.
- वेळ ना वखत आऩ गाढव चाललय भुकत.
- विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
- वकर थोडा, दिमाख बडा.
- वक्कल, वकील आणि वैद्य.
- वचने कि दरिद्रता.
- वजा वाटोळे,डोईवर गाठोळ.
- वड्याचे तेल वांग्यावर - एकाचा राग दुसऱ्यावर काढणे.
- वडाला आली वडफळे, कावळ्यास आला व्यभिचारी मनी, स्वस्त्रीला तैसें गणी.
- वरण दाटणी आणि बायको आटणी.
- वरमाय शिंदळ, मग वऱ्हाडणीकडे कायबोल?
- वरवर आर्जव करी, घात त्याचे अंतरी.
- वरल्या वैद्याची तुटली दोरी,खालचा वैद्य काय करी?
- वरातीमागे घोडे, व्याह्यामागे पिढे.
- वर्ष साठ,विठोबाने केली पाठ.
- वस्त्रा आड जन नागवे.
- वस्तूची नाही माहिती, असून काय मूर्खाच्या हाती.
- वहूना हली आणि वाफा शिंपला.
- वळवणी आले आणि तळवणी घेऊन गेले.
- वृद्धा नारी पतिव्रता, धवळा नंदी गुणवंता.
- वृक्षामध्ये एक साया, वरकड साऱ्या आया बाया.
- वाईट जागेवर उवा जाता,वाईटपणा येतो माथा.
- वाईटपेक्षा चांगले बोल, चांगल्याने मान हाले.
- वाईट चांगले बोल, त्यांचे समान तोल.
- वाकडीना तिकडी, गावची भाकर.
- वाकडे झाडी, छाया वाकडी.
- वाघ बकरी एके जागी पाणी पितात.
- वाघ म्हटले तरी खातो, वाघोबा म्हटले तरी खातो - एखाद्याशी कसे वागले तरी व्यर्थ ठरते.
- वाघ सापळ्यात सापडे, बायकामुले मारिती खडे.
- वांझेस कातबोळ कशाला?
- वाटण्याच्या अक्षता लावणे.-कोणतेही काम न करणे किंवा होऊ न देणे .
- वाटी नको, करवंटी पाहिजे.
- वाटेचा फाटा, तीन गावचा हेलपाटा.
- वाटे निराळे बसावे.
- वाटी त्याला पाटी.
- वान गाईचा,प्रजापती गाढवाचा.
- वाण्याचा गुळ वाण्याने चोरून खावा.
- वारा पाहून पाट द्यावी. -परिस्थिती पाहून वर्तन करणे.
- वाऱ्याने आले, वावटळीने गेले.
- वाऱ्या वाऱ्या धोपट, खुंटीचा पोपट.
- वाऱ्यावर वरात आणि दर्यावर हवाला.
- वाऱ्याने वाळतो, थुंकीने भिजतो
- वासना तसे फळ.फळ.- इच्छा तसे फळ. चांगल्या इच्छे णे कोणतीही गोष्टं केली कि ती चांगलीच होते.
- वासरात लंगडी गाय प्रधान.-अडाणी लोकांमध्ये अल्पज्ञानी माणूस मोठा असतो, म्हणजेच त्याचे स्थान मोठे असते.
- वाहते गंगेत हात धू.
- वाहिली ती गंगा, राहिले ते तीर्थ.
- वाळकावर सुरी, सुरीवर वाळूक, पण वाळुकच कापले.
- वाळूत मुतले तर फेस ना पाणी.
- विकत श्राद्ध घेऊन सव्य अपसव्य करणे.
- विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर - संसाराचा जंजाळ नसलेली व्यक्ती.
- विणारणीच्या वेदना विणारीण जाणे
- विद्वान सर्वत्र पूज्यते.- ज्ञानी किंवा विद्वान माणसाची सर्वत्र पूजा होतेत्याला योग्य मान दिला जातो.
- विद्वानोको शिंग नही, और मुरखोको पुच्छ नही.
- विद्याधनं सर्वधनं प्रधानं.- सर्व धन संपत्ती मध्ये विद्याधन म्हणजेच ज्ञान हे सर्वश्रेष्ठ होय.
- विनाशकाले विपरीत बुद्धी.
- विरक्तास्य तृण भार्या.
- विशी विद्या, तिशी धन.
- विस्तवामध्ये ओलेही जळेते आणि कोरडेही जळते.
- विस्तवावर तेल घालणार.
- विहिरीत खारे तर पोहऱ्यात कोठून येईल गोडे?
- वीज कडकली पण वडावर पडली.
- वेडा झाला व कामातून गेला.
- वेडी गांड, बोचा भिंगार.
- वेडीचे सोंग घेतले म्हणजे ठाव फोडला पाहिजे.
- वेडेचार,गाढवाला मंगळवार.
- वेड्यांचा बाजार, खुळ्यांचा शेजार.
- वेडे मेजवान्या करिती, शहाणे स्वस्थ बसुनी खाती.
- वेताळाचेच भुतावळ.
- वेलीस दुख नाही, बाळकास दुख नाही.
- वेळ आली पण काळ नाही आला.
- वेळ ना वखत,गाढव गेले भोकत.
- वेळ निघून जातो पण शब्द राहतो.
- वेळेवर वेळ शिम्ग्यावर खेळ.
- वेळेस चुकला तो मुकला.- योग्य वेळी योग्य गोष्टं केली तर उदिष्ट साध्य होते अन्यथा काम होत नाही.
- वैद्यांचे वाटले आणि संन्याशाचे गुंडले कोणास समजत नाही.
- व्यक्ती तितक्या प्रकृती - प्रत्येकाच्या स्वभावछटा वेगवेगळ्या असतात.
- व्यसनेषु सख्यम.
- व्याज दिसे मुद्दल भासे.
- व्याजाच्या आशेने मुद्लाचा नाश.
- व्याजाला सोकला मुदलाला मुकला.
- व्याप तितका संताप - जेवढी जबाबदारी अधिक तेवढी काळजी घ्यावी लागते.
- व्यापार करिता सोळा बारा,उदीम करिता डोईवर भारा.
- व्याप्तीवाचून प्राप्ती नाही.
- व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाही.
मुळाक्षर श
[संपादन]- शहाण्याला शब्दाचा मार.
संस्कृतपर्यायः - सुखतरमाराध्यते विशेषज्ञः
- शिजे पर्यंत दम धरवतो, निवे पर्यंत धरवत नाही.
- शितावरून भाताची परीक्षा - थोड्याशा गोष्टींवरुन मोठ्या गोष्टीची पारख करता येणे.
संस्कृतपर्यायः - पिण्डेन ब्रह्माण्डपरीक्षणं स्यात्।
- शिर सलामत तर पगड़ी पचास.
- शुभ बोल नाऱ्या- मा॑डवाला आग लागली.
- शेरास सव्वाशेर.
- शेळी जाते जिवनीशी, खाणारा म्हणतो वातड कशी - जीव तोडून केलेल्या कामाला पसंती न दाखवता नाव ठेवणे.
- शेंडी तुटो की पारंबी तुटो - अत्यंत दृढ निश्चयाचे काम करणे.
संस्कृतपर्यायः - 1 शापादपि शरादपि 2 येन केन प्रकारेण
- शिळ्या कढीला ऊत.
- शंख आडोशी,शंख पडोशी,शंख शंख्के भाई; शंख घरके व्याह होई तो शंख मिले जावाई.
- शंखोबा तर ओबा, दे दान हजार तर घे तीन हजार,देतोस काय तर घेतोस काय?
- शतं भीष्म.
- शब्दाचा सिंधू पण अकलेचा एक बिंदू.
- शंभर दिवस चोराचे,एक दिवस सांबाचा.
- शंभर शहाणे पण अक्कल एक.
- शंभर सुवेते पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाही.
- शरण आल्यास मरण चिंतू नये.
- शष्प देणे न शष्प घेणे.
- श्ष्पे काढल्याने मढे हलके होत नाही.
- शष्प धुतली म्हणून रेशीम होत नाही.
- शहरातले व्हावे कुत्रे पण गावांध्यातले होऊ नये माणूस.
- शापादपि शरादपि.
- शालजोडीला रकटयाचे ठिगळ.
- शास्त्र संगे आणि चुलीशी हगे.
- शास्त्रात पढवे आणि शेतात खपावे.
- शहाणा नडतो आणि पोहणारा बुडतो.
- शहाण्याचे व्हावे चाकर पण मूर्खाचे होऊ नये धनी.
- शहाण्यास इशारत, मुर्खास टोचणी.
- शहाण्याला मार शब्दाचा - समजूतदार मनुष्याला शब्दाच्या सूचना समजतात.
- शहाण्याचे श्रोते, गाढवाचे चुलते.
- शहाण्याची बलाई दूर.
- शहाण्याची लाथ,मूर्खाची खेव.
- शहाण्यास एक बात, मुर्खाला एक लाथ.
- श्वास तो आस.
- शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाही - कोणत्याही कामासाठी उपजत बुद्धीची आवश्यकता असते.
- शिंक्याचे तुटले अन् बोक्याचे फावले - एखाद्याला पाहिजे होते ते आयते मिळाले.
- '
-
मुळाक्षर ष
[संपादन]- षोडश वर्षा भवेत् कन्या अप्सरा सुंदरी भवेत्.
- '
-
मुळाक्षर स
[संपादन]- सगळं मुसळ केरात.
संस्कृतपर्यायः - अरण्यरुदितं कृतं श्वपुच्छम् अवनामितम्।
- सहा महिने नळकांडात घातले तरी कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.
- सतरा पुरभय्ये अऩ अठरा चुली.
- सतरा साडे तरी भागूबाईचे कुल्ले उघडे.
- सत्या असत्या मन केले ग्वाही
संस्कृतपर्यायः - प्रमाणम् अन्त:करणप्रवृत्तय:
- सत्तेपुढे शहाणपण चालत नाही - मूर्खाच्या हातात सत्ता आल्यावर शहाण्या माणसाचे काही चालत नाही.
संस्कृतपर्यायः - 1 प्रभुर्विभु: स्यात्।2 प्रभोरिच्छा बलीयसी।
- सरड्याची धाव कुंपणापर्यंत.
- साखरेचे खाणार द्याला देव देणार - भाग्यवान माणसाला देवही अनुकूल होतो. त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतात.
- साठी बुध्दी नाठी.
- सात सुगरणी, भाजी अळणी.
- साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण.- मोठी गोष्टं थोडक्यात सांगणे.
- साप म्हणू नये धाकला, नवरा म्हणू नये आपला.
- सासू न सासरा जांच करे तिसरा.
- सासू नाही घरी, नणंद जाच करी.
- सासू मेली ठीक झाले, घरदार हाती आले.
- सासू सांगे सुने बोध, आपण पी ऊन ऊन दुध.
- सासू सुनेची भांडणं, सगळ्या गावाला आमंत्रणं.
- सुईण आहे, तो बाळंत होऊन घ्यावे.
- सुसरबाई, तुझी पाठ मऊ.
- सुख जवां एवढे दु:ख पर्वताएवढे.
- सोन्याहून पिवळे - फार उत्तम.
- स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
- सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही - मानी माणसाचा मानीपणा मोठे नुकसान झाले तरी जात नाही. संस्कृतपर्यायः - स्वभावो दुरतिक्रम:।
- सुंठेवाचून खोकला गेला.
- सकाळी सौभाग्यवती, संध्याकाळी गांगभागीरथी.
- सगळे गलबतांत अर्धी सुपारी माझी.
- सगळे पालखीपदस्थ होतील तर भुई कोण होईल?
- सगळ्यांची पावलें हत्तीचें पावलांत.
- संगतगुण की सोबत गुण.
- संग्याची चेली, मायेशी मात्रागमन.
- संजगनी रोकडी, कंबर कांगे वांकडी?
- सजणा जाय घोकीत राहे, चोरा जाय निचिंत राहे.
- सण ना वार, नकाटीचा बुधवार.
- सत ना गत.
- सणांत सण, नवलाईचा सण.
- सतत कुरडता उंदीर, खंडी मोठाही दोर.
- सत्यमेव जयते.
- सत्पात्री दान
- सदां पीक आणि सदां भीक.
- सदां सावध रहावें, भिऊन आर्जव्या वागावें.
- सद्यांची साळी, पिकवी दुकाळी.
- सज्जन दुःखातें न मानी, दुःख वसे दुर्जनास.
- सतीच्या दारी बत्ती व शिंदळीच्या दारी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.
- सदा मरे त्यास कोण रडे.
- सकट घोडे बारा टक्के.
- सब मिलना पण लंगोटियार नही मिलना.
- सभ्यांस भूषण, चोरांस दूषण.
- स्वभाव वांकडा, तो नीट न होय बापडा.
- स्वभावानें जो चांगला, सदां सुख असे त्याला.
- समर्थाची सांठवण पण दुर्बळाची नागवण.
- संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी - एखादे न होणारे काम असेल तर त्याची मुळापासून तयारी करावी लागते.
- सुपातले हसतात अन् जात्यातले रडतात - प्रत्येकाच्या वाटेला केव्हा ना केव्हा भूक ठरवलेला असतो.
- सगळे मूसळ केरात - मुख्य व महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होणे.
- सोयऱ्यात साडू,हत्यारात माडू आणि भोजनात लाडू - (यातील माडू शब्दाचा कोशगत अर्थ हरिणाच्या दोन जोडलेल्या शिंगाना पोलादी पाती बसविलेले हत्यार असा आहे.)
- '
-
मुळाक्षर ह
[संपादन]- हलवायाच्या घरावर तुळशीपत्र - परभारे दुसर्याची वस्तू तिसऱ्याला देणे.
- हत्ती गेला आणि शेपूट राहिलं.- कामाच्या बहुतेक भाग पूर्ण झालं आणि फक्त थोडे शिल्लक राहिला.
- हा सूर्य हा जयद्रथ.
- हात काढणे
- हात फिरे तिथे लक्ष्मी वसे.
- हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे - जास्त हाव केल्यास फजिती होते.
संस्कृतपर्यायः - श्व: मयूराद् अद्य कपोतो वर:।
- हाताची पाची बोटे सारखी नसतात.
संस्कृतपर्यायः - पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना
- हातच्या कंकणाला आरसा कशाला? - उघड गोष्टीसाठी पुराव्याची गरज नसते.
संस्कृतपर्यायः - प्रत्यक्षदृष्टे न तु मानमन्यत्
- हात दाखवून अवलक्षण - आपणहून ओढून घेतलेले संकट.
- हौस राजाची अन नांदणुक कैकाड्याची.
- होळी जळाली थंडी पळाली .
- हिऱ्या पोटी गार गोटी .
- हजीर तो वजीर - प्रथम हजर राहणाऱ्याला चांगला लाभ मिळतो.
- हाती नाही दाणा, मला कारभारी म्हणा.
- हिंग गेला , वास राहिला.
- हसतील त्याचे दात दिसतील - लोकांच्या टवाळीला घाबरू नये.
- हात ओला तर मित्र भला - फायदा असेपर्यंत मैत्री टिकते.
- हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जाते - एखादे संकट, आजार एकदम येणे व हळूहळू जाणे.
- हपापाचा माल गपापा - लुटलेला माल तसाच लुटला जातो.
- '
-
मुळाक्षर ळ
[संपादन]मुळाक्षर क्ष
[संपादन]मुळाक्षर ज्ञ
[संपादन]- ज्ञान सांगे लोका शेंबुड आपल्या नाका .
- '
-
हे सुद्धा पहा
[संपादन]काजव्याकडून सुर्याची समीक्षा