Jump to content

सुविचार

Wikiquote कडून
विकिक्वोट
विकिक्वोट
Look up सुविचार in
विकिपीडिया, the free marathi encyclopedia.
सुविचार हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा

स्वर[संपादन]

- - - - - - - - - - अंं - अः

मिश्र[संपादन]

- ॠ - लृ - लॄ

व्यंजन[संपादन]

क वर्ग -
च वर्ग -
ट वर्ग -
त वर्ग -
प वर्ग -
अवर्गीय व्यंजने: य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ ही "अवर्गीय व्यंजने" होत.

क्ष व ज्ञ ही संयुक्त व्यंजने होत.

मुळाक्षर अ[संपादन]

 • "अपयश तात्पुरते असते, परंतु यश कायमस्वरुपी असते.
 • अशा व्यक्तीस शोधा जे आपले जीवन बदलू शकेल, आपले “Relationship Status” नाही.
 • अयशस्वी होण्याचे एक साधे कारण आहे की, अचानक पराजय दिसल्याने मैदान सोडून भागणे. ही चूक प्रत्येक अयशस्वी व्यक्ति करतोच.
वरच्या सुविचारसारखे आणखी मजेदार सुविचार वाचा into marathi या वेब पेज वर!
 • अतिथी देवो भव ॥
 • अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
 • अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
 • अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
 • अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.
 • अति आशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
 • अति तिथे माती.
 • अंथरूण बघून पाय पसरा.
 • अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
 • अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.
 • अन्याय बिनतक्रार सहन कराल तर नविन अन्यायांना उत्तेजन दिल्यासारखे होईल.
 • अज्ञानाची फळे नश्वर असतात, ती सकाळी जन्मतात आणि संध्याकाळी नष्ट होतात.
 • अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे.
 • अहंकार हे अडानीपणाचे लक्षण आहे.
 • अहंकारी माणसाला दुसऱ्याचा अहंकार सहन होत नाही.

मुळाक्षर आ[संपादन]

 • आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते
 • आपण जे पेरतो तेच उगवतं
 • आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
 • आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
 • आयजीच्या जीवावर बायजी उदार
 • आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र
 • आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
 • आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !
 • आधी विचार करा; मग कृती करा
 • आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
 • आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका
 • आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका
 • आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.
 • आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
 • आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
 • आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
 • आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
 • आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
 • आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
 • आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
 • आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
 • आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
 • आधी विचार करा, मग कृती करा
 • आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
 • आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
 • आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
 • आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दुर्मिळ असते.
 • आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
 • आयुष्यातील प्रत्येक घटनेपासून काहीतरी बोध घेण्यासारखा असतो. पण तशी मनोवृत्ति बाळगली पाहिजे.
 • आपल्या कामात आनंद वाटणे हे समृद्धीचे लक्षण आहे.
 • आपण किती गुणी आहोत यापेक्षा आपण किती दोषी आहोत, हे पाहण्यातच मोठेपणा असते.
 • आळस हा माणसाचा खरा शत्रु आहे.
 • आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन सोसायची तयारी असावी लागते.
 • आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.
 • आपले विचार स्पष्टपणे सोप्या भाषेत मांडता येणे ही कला प्रत्येकाला आवश्यक आहे. ती प्रयत्नाने साध्य करा.- डॉ. ग. श्री. खैर

मूळाक्षर इ[संपादन]

 • इतरांकडून कशाचीही अपेक्षा करू नका आणि आपण कधीही निराश होणार नाही ..
 • इतरांवर वर्चस्व गाजवण्यासाठी सामर्थ्यवान होऊ नका, तर स्वत: वर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्यवान व्हा.
 • इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही त्याचे फळ उशिरा का होईना पण भेटते जरूर.

मूळाक्षर ई[संपादन]

मूळाक्षर उ[संपादन]

 • उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
 • उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
 • उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.
 • उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
 • उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

मूळाक्षर ऊ[संपादन]

मूळाक्षर ए[संपादन]

 • एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच!
 • एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही
 • एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
 • एकाने गाय मारली म्हणून दुसरयाने वासरू मारू नये.
 • एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
 • एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.
 • एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
 • एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
 • एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

मूळाक्षर ऐ[संपादन]

 • ऎकावे जनाचे करावे मनाचे.

मूळाक्षर ओ[संपादन]

मूळाक्षर औ[संपादन]

मूळाक्षर ऋ[संपादन]

मूळाक्षर क[संपादन]

 • कसलीच लाज नसणे हीच एक लाजीरवाणी गोष्ट!
 • काही लोक यशाची फक्त स्वप्ने बघतात. इतर लोक जागे होवून ती स्वप्ने पूर्ण होण्यासाठी धडपडतात.
 • क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.
 • कविता म्हणजे भावनांचं चित्र!
 • काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच.
 • केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
 • काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
 • कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात.
 • कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
 • कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
 • कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
 • कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
 • कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर
 • काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
 • काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
 • केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
 • कधीही आशा सोडु नका. आशा हा एक दोर आहे. जो तुम्हांस जीवनात झोके देत असतो.
 • कुणाच्या गुणांची प्रशंसा करण्यात अधिक वेळ दवडण्यापेक्षा त्यांच्यातले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
 • क्रोधाला लगाम घालण्यासाठी मनाइतक उत्तम उपाय नाही.
 • कालच्या व्यर्थ विचारांना, मनोभावनांना, व कर्मांना पूर्णविराम द्या म्हणजे त्याचा अंशमात्र उरणार नाही.
 • क्रोधाच्या सिंहासनावर बसताच बुद्धि तेथून निघुन जाते.
 • क्रोध म्हणजे मधमाशीच्या पोळ्यावर फेकलेले दगड.
 • केलेली मदत कधीही वाया जात नाही.
 • कपडे नाही माणसाचे विचार Branded पाहिजे.
 • कर्म हीच पूजा आहे.
 • कायम तोट्याचा विचार करणारे कधीही नफ्यात येत नाहीत .

मूळाक्षर ख[संपादन]

 • खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची
 • खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
 • खिडकी म्हणजे आकाश नसतं.
 • खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
 • खाजगीत कान उपटा, पण चार-चौघांत कौतुकच करा.
 • खर्च करून सतत वाढतच राहते असे धन म्हणजे विद्या. म्हणून सर्व धनांत विद्याधन हे श्रेष्ठ होय.
 • खूप हुशारी पेक्षा चिमूटभर विवेक श्रेष्ठ असतो.
 • खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.
 • खूप वाचन करा म्हणजे लेखन आपोआप सुचेल

मूळाक्षर ग[संपादन]

 • गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
 • गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
 • ग्रंथ म्हणजे काळाच्या विशाल सगरातून आपणांस घेऊन जाणारी जहाजे.
 • गोडी वस्तूत नसून, वस्तुसाठी केलेल्या श्रमात असते.
 • गमावलेला प्रत्येक क्षण पुन्हा परत येत नाही.
 • गर्दीतले सहभागी बनण्यापेक्षा गर्दीचे कारण बना .
 • गरुडाइतके उंच उडता येत नाही म्हणून चिमणी कधीही उडणे सोडत नाही.

मूळाक्षर घ[संपादन]

 • घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो, म्हणून शिवतंत्र सांगते जोडता नाही आले तर जोडू नका पण आपल्या लोकांना तोडू नका.
 • घोळक्यात चालायची सवय असणाऱ्यांना स्वतःच्या आयुष्याची दिशा कधीच ठरवता येत नाही.

मूळाक्षर च[संपादन]

 • चिंतेसारखे शरिराला जाळणारे दुसरे इतर काहीही नाही. - पंचतंत्र
 • चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
 • चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस
 • चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
 • चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.
 • चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
 • चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.
 • चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
 • चांगली निर्मळ स्पर्धा निरोगी असते पण मत्सर हा प्राणघातक आजार असतो.
 • चूका या होणारच , मात्र त्या कळताच कबूल करून प्रायश्चित घेणे, हे शाहाण पणाचे लक्षण आहे.
 • चित्र ही हाताची कृति आहे तर चरित्र ही मनाची कृति आहे.
 • चुका आणि अपयश हा प्रगतीचा भाग असतो.
 • चमत्कार हे नेहमी मेहनत करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात होतात.

मूळाक्षर छ[संपादन]

 • छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

मूळाक्षर ज[संपादन]

 • जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
 • जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
 • जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.
 • जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही
 • जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.
 • जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
 • जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
 • जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही
 • जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
 • जगी सर्व सुखी असा कोण आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.
 • जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
 • जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
 • जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
 • जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो.
 • ज्याचा शेवट गोड, ते सगळेच गोड!
 • जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !
 • ज्याची चांगुलपणावर श्रद्धा आहे त्याला कशाचेही भय नाही.
 • जगाने माझ्यासाठी काय केले,हे पाहण्याअगोदर मी जगासाठी काय केले हे आगोदर विचारात घ्यावे.
 • ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
 • जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
 • ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
 • ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.
 • ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही.
 • जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
 • जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.
 • ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
 • जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !
 • जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
 • जे ज्ञान प्राप्त होते, त्याचप्रमाणे कृती करणे हे ज्ञानाचे खरे सार्थक आहे.
 • जो मनुष्य कोणत्याही भौतिक कारणांमुळे विचलित होत नाही, त्यानेच अमरत्व प्राप्त करून घेतले असे म्हणावे लागेल.
 • जीवनात ठरलेल लक्ष्य साध्य करायचं तर, थोडा धोका हा पत्करायला हवाच.
 • जीवन फुलासारखे असू द्या पण ध्येय मात्र मधमाशीप्रमाणे ठेवा.
 • जगण्याच्या आनंदापेक्षा जगवण्याचा आनंद अधिक असतो.
 • जिथे संघर्ष असतो,तिथे प्रगती असते.
 • जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या सवयी आपला वेळ बदलतात.

मूळाक्षर झ[संपादन]

 • झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.

मूळाक्षर ट[संपादन]

 • टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.
 • टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या
 मित्रांपासून सावध राहा.

मूळाक्षर ठ[संपादन]

 • ठरवून केलेली मैत्री गरज असेपर्यंतच टिकते.

मूळाक्षर ड[संपादन]

 • डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही , भाषा गोड असेल तर माणूस तुटत नाहीत.

मूळाक्षर ढ[संपादन]

 • ढिगभर आश्वासनांची खैरात करण्यापेक्षा ओंजभर मदत खूप मोलाची असते.

मूळाक्षर ण[संपादन]

मूळाक्षर त[संपादन]

 • तुमचे कर्तुत्व तुम्हाला शिखरावर पोहोचवेल. पण तुमचे चारित्र्य कायम तुम्हाला तिथे ठेवेल.
 • तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
 • तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
 • तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
 • तुलना करावी पण अवहेलना करू नये.
 • तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
 • तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असे तोवरच टिकतं.
 • तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
 • तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
 • तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.
 • तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार
 • तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचंय ते आजच ठरवा.
 • त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या
 • तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
 • तुमच्या जिभेवर तुम्ही ताबा ठेवा की तुम्ही सारे काही जिंकलेत.
 • तडजोड कशी करावी हे जाणणाराच जगावे कसे हे जाणतो.
 • तुमच्या मर्यादा , या फक्त तुमच्या कल्पना आहेत.
 • तारुण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

मूळाक्षर थ[संपादन]

मूळाक्षर द[संपादन]

 • दिसामाजी काही तरी ते लिहावे| प्रसंगी अखंडीत वाचीत जावे॥- समर्थ रामदास
 • दु:खातसुद्धा एक फार चांगली गोष्ट आहे. दु:ख फार लांबले तर त्यात तीव्रता रहात नाही व दु:ख जर तीव्र असेल तर ते लांबत नाही.
 • द्वेषाने द्वेषाला कधीच जिंकता येत नाही.
 • दु:ख कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत रहा.
 • देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे
 • दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
 • दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.
 • दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
 • दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.
 • दुःखातील दुःखीताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.
 • दुर्लभ, घाई आणि स्तुती हे विद्येचे तीन शत्रू आहेत.
 • दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच परावर्तित करतो.
 • दुसऱ्यांच्या वेदना त्यांना समजतात ज्यांच्या स्वतःच्या संवेदना जिवंत असतात.
 • दोष काढणे सोपे पण ते सुधारणे अवघड आहे.
 • दुसऱ्याच्या राजवाड्यात गुलामी करण्यापेक्षा , स्वतःच्या झोपडीत राज्य केलेले कधीही चांगले.
 • दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला तर नाहीसा होतो.

मूळाक्षर ध[संपादन]

 • धैर्य आणि विनयशीलता हे असे धन आहेत की ढोंगी लोकांना त्याची नक्कल करता येत नाही.
 • धावत्या पाण्याला मार्ग सापडतो, त्याप्रमानेच प्रयत्न करणाऱ्यालाच मार्ग मिळतो. म्हणून प्रयत्नांची कास कधीच सोडु नये.
 • धोका पत्करायचा पण आंधळेपणान नाही. नीट सराव करून संतुलन साधत.
 • ध्येयाचा ध्यास लाभला , म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.
 • धैर्य धरणाऱ्याला नेहमी सुवार्ता ऐकण्यास मिळते.
 • ध्येय उंच असेल तर झेपही उंच घ्यावी लागेल.
 • ध्येयाविना जीवन निरर्थक आहे.

मूळाक्षर न[संपादन]

 • न मागता देतो तोच खरा दानी
 • नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
 • नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
 • नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
 • नम्रता हा सर्व सद्गुणांचा पाया होय.
 • नाही हा शब्द जोपर्यंत तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
 • नात्यात ओढ हवी ओढाताण नाही.
 • निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते.

मूळाक्षर प[संपादन]

 • प्रशंसा - स्वीकारायला आणि करायला शिका.
 • प्रार्थना म्हणजे मनाचं स्नान.
 • प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
 • प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा.
 • प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस
 • परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिद्धीस जात नाही.
 • परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी
 • प्रायश्चित्तासारखी दुसरी शिक्षा नाही.
 • परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.
 • पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.
 • पोहरा झुकल्या शिवाय विहिरीतले पाणी पोहऱ्यात जात नाही.
 • पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
 • प्रेमाला आणि द्वेषाला ही प्रेमानेच जिंका.
 • प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवत असतो.
 • प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
 • पूर्वग्रह सोडून दुसऱ्याच्या चित्तवृत्ती समजण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला कधीच दुसऱ्याचा राग येणार नाही.
 • प्रगतीसाठी नेम हवा, नियम हवा, पण तो आपणहुन स्वीकारलेला हवा.
 • प्रत्येक कार्य सुरुवातीला अवघडच् असते, पण प्रयत्नानीं ते सिद्ध होते.
 • प्रत्येक क्षण हा शेवटचाच आहे, असे समजून सत्कार्यासाठी घालवावा.
 • प्रयत्न हा परिस आहे त्यामुळे नरकाचेही नंदनवन होते.
 • प्रशंसा हे असे हत्यार आहे की ज्यामुळे शत्रु पण मित्र बनु शकतो.
 • प्रखर बुद्धिमत्तेपेक्षा शुद्ध चरित्र श्रेष्ठ आहे.
 • पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण शाबासकी आणि धोका दोन्ही पाठीमागूनच मिळतात.
 • परिस्थिती बदलण्याची ताकद केवळ कृतीमध्ये असते.
 • पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत पडलेलं नाही.
 • पैसा नसल्यावर नाती गडद तर पैसा आल्यावर तीच नाती धुसर दिसायला लागतात.

मूळाक्षर फ[संपादन]

 • फळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
 • फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास
 • फांदीला फुलांची ओझं कधीच वाटत नाही.

मूळाक्षर ब[संपादन]

 • बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का
 • बाह्यशत्रूरूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.
 • बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
 • बुद्धि ही हत्यारासारखी असते. त्याला वारंवार काम दिले तर ती प्रभावी राहते नाहीतर गंजून जाते.
 • बऱ्याच ग्रंथाचे वाचन करण्यापेक्षा

काही ग्रंथाचे मनन करणे चांगले.

मूळाक्षर भ[संपादन]

 • भीतिला टाळाल- तर ती वाढत जाते. भीतीचा सामना कराल, तर ती पळून जाते.
 • भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते.
 • भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
 • भक्तिन भरलेले जीवन दिव्य व त्यागमय असते, तर आसक्तीने भरलेले जीवन हीन व भोगमय असते.
 • भीति एकाच गोष्टीची वाटली पाहिजे, ती म्हणजे गलिच्छ किंवा खोटे कृत्य करण्याची.
 • भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
 • भेटेल त्याला खुश करत गेल्यास आपल्या पदरात मात्र निराशाच पडते .

मूळाक्षर म[संपादन]

 • मरावे परी कीर्तीरूपी उरावे.
 • माणसान कसं कर्दळीच्या पानासरखं असावं, आयुष्यात कितीही सुखं-दुख: अंगावर पडली तरी ती ओघळून पडावीत अगदी अलिप्त!
 • मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते
 • मूर्ख माणसे,मेल्यानंतर स्वर्गाला जाण्याची वाट बघतात,तर सूज्ञ माणसे या पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
 • मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
 • माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
 • मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
 • माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक
 • मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
 • मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
 • माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.
 • मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
 • माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
 • मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
 • मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.
 • मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
 • मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच
 • माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
 • मोठी मने तत्वविचारांची चर्चा करतात, सामान्य मने घटनांची चर्चा करतात, तर क्षुद्र मने व्यक्तींची चर्चा करतात.
 • मार्गातील अडचणी बाजूला सारून जो पुढे पाउल टाकतो त्यालाच यश मिळते.
 • माणसाचे श्रेष्ठत्व त्याच्या जन्मावरून ठरत नसते, तर त्याच्या गुणधर्मावरून ठरते.
 • माणुसकीला लाथाडून जिवंत राहण्यापेक्षा माणुसकीचे रक्षण करता करता मृत्युला कवाताळण्यातच आनंद असतो.
 • मनुष्य जार प्रामाणिक असेल तर त्याचे त्याच्यातील उणीवा क्षम्य ठरतात.
 • मोठमोठी काम ही शक्तिने नव्हे तर सहनशक्तिने केली जातात.
 • माता आणि मातृभूमि यांचा विसर पडु देऊ नका , टी तुमची देवता आहे.
 • मोठा मोबदला घेणारा शिक्षक म्हणजे अनुभव.
 • माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनःस्थिती चांगली असावी लागते.
 • मैत्री ही नात्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे.
 • मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर मिळतेच.

मूळाक्षर य[संपादन]

 • यशस्वी होणारे विजयाप्रती जागरूक राहतात, आणि अयशस्वी पराजया प्रती सचेत राहतात.
 • यशस्वी लोक वेगळ काही करत नाही. ते मार्ग बदलता पण लक्ष नाही.
 • यशस्वी लोक अयशस्वी लोकांपेक्षा वेगळे विचार करतात. म्हणून तसेच विचार करा जसे यशस्वी लोक करतात. तुम्हीही यशस्वी लोकांसारखे व्हाल.

आणखी सुविचार पाहा. into marathi या वेबपेज वर.

 • यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती - आत्मविश्वास.
 • यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
 • यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
 • या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
 • यश हे साध्य नव्हे तर जीवन प्रवासातील एक टप्पा आहे.
 • योग्य निर्णय घ्यायचे तर हवा अनुभव, जो मिळतो चुकीचे निर्णय घेऊनच!
 • योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी सयंम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे.

मूळाक्षर र[संपादन]

 • रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन
 • रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
 • रागाचे सांत्वन मनात करावे, परंतु त्याचे दिग्दर्शन मुळीच करू नये, कारण रागाइतका मोठा शत्रु कोणी नाही.
 • राजाप्रमाणे जीवन जगण्यासाठी आधी गुलामाप्रमाणे मेहनत करावी लागते.
 • राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी ‌

मूळाक्षर ल[संपादन]

 • लोक तुमचा "सल्ला" मानत कधीच नाहीत. ते तुमचे "उदाहरण" घेतात.
 • लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म! पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता, हे तुमचे कर्म!
 • लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.
 • लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
 • लहान सहान बाबतीत मतभेद असले तरी महत्वाच्या बाबतीत सहमत होणे, हे विचारी माणसाला मित्र बनवितात.

मूळाक्षर व[संपादन]

 • वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस
 • वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
 • व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्विकारा.
 • विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
 • विद्या विनयेन शोभते
 • व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
 • वृक्ष व फुलझाडे लावून त्यांची जोपासन कारणे, हे देवाच्या सनिद्ध्यात राहण्यासारखे आहे.
 • विसरणे हां मानवी धर्म आहे पण क्षमा करणे हां दैवी गुण आहे.
 • विचार म्हणजे चैतन्यशक्तिचा आविष्कार,

जीवनाला आकार देणारा कुंभार होय.

 • विद्या हे असे साधन आहे , की ते दिल्याने वाढते आणि लपवून ठेवले तर कमी होते.
 • विद्यार्थी फ़क्त ज्ञानासाठीच हापापलेला हवा.
 • विश्वास ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे.
 • विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

मूळाक्षर श[संपादन]

 • शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
 • शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
 • शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम
 • शीलाशिवाय विद्या फुकाची आहे
 • श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
 • शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे
 • शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
 • शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.
 • शास्त्र वाचून नव्हे, तर त्यानुसार आचरण करुण माणूस विद्वान होतो.
 • शिक्षणाला निति आणि चरित्राचे अधिष्ठान हवे.
 • शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे त्याला प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
 • शरीराला श्रमाकडे ,बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण होय .
 • शिक्षणावर केलेली गुंतवणूक उत्तम व्याज मिळवून देते.
 • शांत स्वभावाचा माणूस कधीही कमजोर नसतो.
 • शांत राहण्यासारखे दुसरे शहाणपण कोणतेही नाही.
 • शांततावादच खरा मानवतावाद आहे.

मूळाक्षर ष[संपादन]

मूळाक्षर स[संपादन]

 • सत्य हे पाहणार्‍यांच्या वा ऐकणार्‍यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं ! ते नेहमीच जसं असतं तसंच पुढं येतं. उगवत्या सूर्यासारखं !
 • स्वत:ची इच्छा पूर्ण न झाल्याने अस्वस्थ होणारी माणसं किती आहे हे मोजण्याची गरज नाही , आणि दुसर्‍याची इच्छा आणि गरज पुरी करता आली नाही म्हणून अस्वस्थ होणारा विरळाच !
 • संसार हा मोडक्या वस्तू नीट करण्याचा कारखाना आहे. तेथे मोडक्या वस्तू जितक्या जास्त असतील तितकी शिकणार्‍याला संधी जास्त असते.
 • समस्या कोणत्याही दिशेने येवू द्यात, त्या समस्येवरचे समाधान तुमच्याकडुन जावू द्या!
 • सत्याने मिळतं तेच टिकतं
 • स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.
 • स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.
 • स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.
 • सामुदायिक वृत्तीविन, जगी टिकेल प्राणी कोण? जगावे, जगवावे, जीव-वन, ही खरी जीवनकला - संत तुकडोजी महाराज
 • सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
 • स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
 • सहल म्हणजे मानसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.
 • स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.
 • संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
 • समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे.
 • सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
 • संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
 • सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
 • स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता
 • सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
 • सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
 • सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
 • स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
 • स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
 • स्वतःसाठी जगण्याचा आनंद आहे; पण दुसर्यांसाठी जगण्याचा आनंद अधिक आहे.
 • सेवा ही मनुष्याची स्वाभाविक वृत्ति आहे. आणि तीच जीवनाचा आधार आहे.
 • स्वभाषेचि अभिवृत्ति व उत्कर्ष हे स्वराष्ट्राच्या उन्नतीचे एक प्रमुख साधन आहे.
 • सत्य बोलाल तर तुमचे शब्द अंकुरतील, सत्याने वागाल तर तुमचे जीवन उदात्त व श्रेष्ठ होईल.
 • संघर्षात आनंद असतो कारण त्यामुळे जिवंतपणा टिकतो.
 • संसारात चिखल्या माशासारखे राहा, तो चिखलात राहतो, पण त्याचे अंग नेहमी स्वच्छ असते.
 • संघर्षाच्या झाडालाच यशाची फुले येतात.
 • स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं.
 • समाधान म्हणजे अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस!
 • स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील मधुर्याने माणसे जोडली जातात.
 • सावलीची किंमत जाणून घ्यायची असेल तर उन्हातच जावे लागेल.
 • सत्याचा शेवट सुख , समाधानाच्या मार्गाने जातो.
 • समोरच्याचा पराभव करण्यापेक्षा त्याचं मन जिंका तो सर्वात मोठा विजय असेल.
 • सुंदर अक्षर हा एक सुरेख दागिना आहे.

मूळाक्षर ह[संपादन]

 • हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला
 • हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
 • हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
 • हसा, खेळा पण शिस्त पाळा.
 • हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !
 • हसण्याचे मोल कळण्यासाठी आधी रडावे लागते.
 • हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत. पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो. नाही लवकर बोलल्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे!
 • हिंमत नाही तर किंमत नाही विरोधक नाहीत तर प्रगतीही नाही.

मूळाक्षर क्ष[संपादन]

 • श्रवण, भाषण, वाचन, निरीक्षण आणि लेखन एवढे दुर्मीळ अलंकार परमेश्वराने दिले असताना इतर आभूषणांची गरजच काय ?
 • क्षमा म्हणजे चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्याने दिलेला सुगंध.

मूळाक्षर ज्ञ[संपादन]

 • ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; ज्ञान तुमचेच रक्षण करते
 • ज्ञानाची तळमळ आतून येऊ द्या, म्हणजे अभ्यासातील खरा आनंद तुम्हाला अनुभवता येईल.
 • ज्ञानाशिवाय भक्ति आंधळी आहे व भक्तिशिवाय ज्ञान कोरडे आहे.
 • ज्ञान हे सर्व सन्मानांचे, पराक्रमाचे, बलाचे व ऐश्वर्याचे बल आहे.
 • ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा.
 • ज्ञानेंद्रियांवर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होय‌.
 • ज्ञानाचा प्रसार म्हणजेच समानतेचा विस्तार .
 • ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ते ज्ञान विष आहे.
 • ज्ञान ही खरी शक्ती आहे.
 • ज्ञानाचे अंतिम लक्ष्य सुंदर चारित्र्य निर्माण करणे हेच असले पाहिजे.

हे सुद्धा पहा[संपादन]